लाजवाब चिकन


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील मांसाहारी रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब चिकन.
चमचमीत रसदार व सुके प्रकार


40.00 Add to cart

लाजवाब पुलाव-बिर्याणी


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील रुचकर रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब पुलाव-बिर्याणी.
भाताचे स्वादिष्ट व्हेज-नॉनव्हेज प्रकार.


40.00 Add to cart

लाजवाब फिश


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील मांसाहारी रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब फिश.
चमचमीत रसदार व सुके प्रकार.


50.00 Add to cart

लाजवाब भाज्या


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील रुचकर रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब भाज्या.
चविष्ट रसदार व सुके प्रकार


40.00 Add to cart

लाजवाब मटण


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील मांसाहारी रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब मटण.
चमचमीत रसदार व सुके प्रकार.


40.00 Add to cart

लाजवाब मिष्टान्न


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील स्वादिष्ट रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब मिष्टान्न.
बहारदार देशी गोड पदार्थ


40.00 Add to cart

लो कॅलरी खासियत


उषा पुरोहित


आपल्याला कोणताही विकार नसला तरी शरीरस्वास्थ्य राखणे, स्थूलता टाळणे आणि शरीरयष्टी प्रमाणबद्ध ठेवणे केव्हाही चांगलेच आहे. यासाठी उत्तम उपाय म्हणजे आहारनियमन अर्थात डायटिंग! परंतु डायटिंग करताना आपल्या खाण्यातून काही आवश्यक अन्नघटक कमी पडून शारीरिक संतुलन बिघडू शकते व इतर काही समस्यांना तोंड देण्याची वेळ येते. मात्र वगळावे लागतील असे पदार्थ थोडया वेगळ्या पद्धतीने केल्यास या पदार्थांच्या सेवनाचा आनंद कायम राहून अन्नघटकांचे संतुलनही राखता येईल.
उषा पुरोहित यांनी शरीराला आवश्यक उष्मांक आणि आरोग्य-घटकांचा विचार करून, नेहमीच्या पद्धतीत बदल करून यात सर्व प्रकारच्या पदार्थांच्या कमी उष्मांकाच्या पाककृती दिल्या आहेत. आहारातील वैविध्य कायम ठेवून यात चविष्टपणा राखूनही आहार-नियमन साधणार्‍या या पाककृती सर्वांनाच फलदायी ठरतील!


100.00 Add to cart

वाटीतील तिखट-गोड पदार्थ


प्रमिला पटवर्धन


पाककृती आणि कलाकुसर यात ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले अशा प्रमिला पटवर्धन या खर्‍या अर्थाने सुगरण आहेत. पाककलेतील निपुणता आणि स्वयंपाकात रस घेणारे यांचे मन यामुळे यांच्या हातच्या पाककृतींना एक वेगळीच चव असते. आपल्या पारंपरिक पदार्थांचा वारसा पुढील पिढयासाठीही जतन व्हावा असा यांचा एक आग्रह आहे म्हणूनच या पुस्तकात यांनी महाराष्ट्रीय पद्धतीच्या चविष्ट ० आमटी ० डाळी ० पालेभाजी ० पिठले ० कडधान्यं ० कढी ० सांबार आणि ० गोड खिरी यांचे विविध प्रकार दिले आहेत. सर्व गृहिणींना व नववधूंना या पुस्तकाचा निश्‍चितच उपयोग होईल.


25.00 Add to cart

विवाहसोहळा व रुखवताचे पदार्थ


मंगला बर्वे


विवाह-समारंभ हा आपल्या घरातील अतिशय आनंदाचा समारंभ. तो जबाबदारीने व यथासांग पार पडावा, त्यात कुठेही गडबड, गोंधळ होऊ नये अशी सर्वांची इच्छा असते. हल्लीच्या कुटुंबात घरात अनुभवी वडीलमंडळी असतात असे नाही. त्यामुळे कुठली कामे व ती कशी करावी ह्याचा प्रश्‍न अनेकांपुढे पडतो. ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन ह्या पुस्तकाची मांडणी केली आहे.
लग्न ठरवताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष पुरवावे, घरगुती पत्रे कशी लिहावी, साखरपुडा कसा साजरा करावा, साखरपुडयाला काय मेनू ठरवावा, लग्नपत्रिकेतील मजकूर कसा असावा ह्याविषयी खूप माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.
विवाहविधीसाठी कोणत्या वस्तू व किती प्रमाणात लागतील त्याची सविस्तर माहिती दिली आहे. त्याखेरीज मंगलाष्टके, उखाणे, मुलीचे मनोगत व रुखवताचे नानाविध प्रकार दिले आहेत. लग्नाच्या वेळी मुलीसाठी काय तयारी करावी तेही सांगितले आहे.


75.00 Add to cart

विविध पदार्थ उरल्यासुरल्यातून


मृणाल चांदवडकर


कधी अपेक्षेइतके पाहुणे येत नाहीत, कधी कुणाची भूकच मंदावते, तर कधी घरातील मंडळींचा अचानक बाहेर खायला जाण्याचा बेत ठरतो. अशा वेळी स्वयंपाक तोलूनमापून करूनही काही पदार्थ उरतात. हे पदार्थ दुसर्‍या दिवशी खायला मंडळी नाखूष असतात आणि ते टाकून देण्याचा विचार मनात येऊ नये, हेही खरेच! पण त्यामुळे पेच कायम राहतो— करायचं काय या शिल्लक पदार्थांचं? मृणाल चांदवडकर या स्वयंपाकात विशेष रुची असलेल्या अनुभवी गृहिणी. त्यांनी गेली काही वर्षें अशा उरलेल्या पदार्थांवर अनेक प्रयोग केले आणि विविध प्रकारच्या उरलेल्या पदार्थांतून नव्याने करता येण्याजोगे पदार्थ कोणते हे शोधले. त्यांची कृती पध्दतशीरपणे लिहून काढली, उरलेल्या पदार्थांच्या उपयोगाचे कल्पकतेने विविध पर्याय तयार केले. हे पर्याय म्हणजेच हे पुस्तक होय! सर्वच गृहिणींना ते वरदान ठरावे.


25.00 Add to cart

शाकाहारी २०२ भात व भाज्या

मंगला बर्वे


जगात सर्वत्र भात हा अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्याकडे प्रत्येक जेवणात भाताला महत्त्वाचं स्थान आहे. प्रस्तुत पुस्तकात भाताच्या पेजेपासून ते विविध प्रकारचे पुलाव, बिर्याणी, खिचडी, वडाभात यांच्या १०१ लज्जतदार रेसिपीज् दिल्या आहेत. आपल्या आहारात भाज्या क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा करतात त्यामुळे भाज्यांनाही जेवणात महत्त्वाचं स्थान आहे. भाज्यांच्या मूळ चवी लक्षात घेऊन रोजच्या स्वयंपाकात करायच्या वेगवेगळ्या १०१ रेसिपीजही या पुस्तकात दिल्या आहेत.


60.00 Read more

संपूर्ण पाककला – फक्त शाकाहारी आवृत्ती

सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच


उषा पुरोहित


मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन

सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!


260.00 Read more

साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या


मंगला बर्वे


आपला कुठलाही धार्मिक उत्सव, कुठलाही समारंभ जेवणाखाण्याशिवाय पुरा होत नाही. आपण कुणाही आप्तेष्टांना किंवा स्नेही मंडळींना भेटलो की त्यांना जेवायचे आमंत्रण देतो. ह्या जेवणामुळे आपण आपली मैत्री दृढ करत असतो.
खूप पदार्थ टेबलावर मांडलेले असतात, तेव्हा पाहुणे मंडळी पदार्थ पाहून तृप्त होतात. पाहुण्यांना किती अगत्याने बोलवले गेले आहे ह्याची जाणीव होते.
पाहुणे अगदी तृप्त होतील अशा विविध पाककृती उदा. कोकणातील मेजवानी, दाक्षिणात्य-चिनी-गुजराथी-बंगाली मेजवानी, संक्रांत विशेष मेजवानी अशा अनेक रेसिपीज् लेखिकेने दिल्या आहेत.


75.00 Add to cart

सूप्स


सुजाता चंपानेरकर


‘आइस्क्रीम्स व डेझर्टस्’ या पुस्तकाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सुजाता चंपानेरकर यांचे हे नवे पुस्तक. नाविन्यपूर्ण तसेच प्रचलित चवींची शाकाहारी व मांसाहारी अशी विविध सूप्स त्यांनी या पुस्तकात दिली आहेत. काटेकोरपणे परंतु सोप्या भाषेत त्यांनी केलेले मार्गदर्शन गृहिणींना निश्‍चितच उपयुक्त ठरेल.


40.00 Read more

सॅलड्स व कोशिंबिरी

वसुमती धुरू


कोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्‍या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत.
वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.


60.00 Add to cart

सोया खासियत

पौष्टिक सोयाबीनच्या विविध लज्जतदार पाककृती


उषा पुरोहित


चीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे. त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. अशा या पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात…

सोया खासियत!


45.00 Add to cart
1 3 4 5