नाटक हा माझ्या अत्यंत जवळचा विषय! खूप दिवसांपासून नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या काही अवलिया कलाकारांबद्दल लिहावंसं वाटत होतं. नाटकात तरुण कलाकार काम करत नाही, असं काहीजण म्हणत असताना अनेक तरुण कलाकार आज नाट्यक्षेत्रात अभिनव प्रयोग करताना दिसत आहेत.
आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि बक्षिसं मिळवूनही प्रत्यक्षात बोलताना काही लोक किती साधे असतात हे या कलाकारांशी बोलताना लक्षात आलं. पाय जमिनीवर असणं म्हणजे काय, हे समजून घ्यायचं असेल तर या लोकांसारख्या अनेकांशी संपर्कात राहणं गरजेचं आहे.
शाळा-कॉलेजमध्ये असताना यांनी नाटकांत कामं करायला सुरुवात केली आणि त्यानंतर हे सगळे मालिका, सिनेमा, व्यावसायिक नाटकं, वेबसिरीज, जाहिराती अशा अनेक माध्यमांत काम करत आहेत. मात्र, असं असूनही त्यांनी अजूनही नाटकांत काम करणं थांबवलेलं नाही.
व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ते नाटकांशी अजूनही जोडले गेले आहेत. अशा काही कलाकारांबद्दल या सदरातून…
- गौरांग कुलकर्णी