बालवाङ्मयाच्या नाना कळा…

‘काय तो जमाना होता…’ ‘आमच्या वेळी असं नव्हतं हं…’ वगैरे वगैरे म्हणत आजच्या काळाला दुगाण्या देण्याची एक सर्वमान्य पद्धत आहे. पण खरं सांगायचं तर, त्या-त्या काळातलं एक प्रकारचं जगणं असतं. त्या जगण्यात काही अधिक, तर काही उणे असतंच. आता मुलांना पडलेल्या सुट्टीचाच विषय घ्या…. वार्षिक परीक्षेतून मुलं मोकळी झाली की, पूर्वी बैठे खेळ, मैदानी खेळ, [...]

पोलीस खात्याला १००० पुस्तकांची भेट : रोहन प्रकाशन व पुण्यभूषण फाऊंडेशनचा उपक्रम

रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या विनोदी साहित्यातील काही निवडक पुस्तकांच्या १००० प्रती या संस्थांतर्फे पोलीस खात्याला भेट देण्यात आल्या.

वाचकांचे प्रतिसाद

बोलकी पुस्तकं फेसबुकमुळे अनेक चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले, त्यांच्यातली वैशिष्ट्यं मनाला मोहवून गेली. या सगळ्यांकडून आजही भरभरून काही ना काही मिळतं….त्यातच पुस्तकं म्हटलं की, गेल्या काही दिवसांत काही मित्र-मैत्रिणींनी अनेक पुस्तकं दिली. त्यांतलाच एक फेसबुकवरचा मित्र म्हणजे फारूक एस. काझी!कुरियर आलं आणि त्यात एकच पुस्तक असावं असं मी गृहीत धरलं. पण जेव्हा वाचण्यासाठी पार्सल उघडलं, तेव्हा [...]

‘सूळकाटा’ या आत्मकथनातला निवडक भाग

…काही लोक माझ्याकडे संशयाने बघू लागले. एका झाडुवालीशी असं विनंती आर्जव करून काय बोलतोय हा टापटीप गृहस्थ, असं वाटून काहीजण माझ्या रोखाने बघू लागले. सुधाला मी म्हटलं, ‘‘सुधा, लोक बघताहेत. चल आत. तिथं बसू. खूप बोलायचंय. तुझ्या भेटीसाठी मी मुद्दाम आलोय. प्लीज चल.”कशीबशी ती तयार झाली. हॉटेलचा एक कोपरा बघून आम्ही बसलो. मी पुन्हा अदबीने [...]

‘होरपळ’ या आत्मकथनातला निवडक अंश

वसंत उलटून गेला की, कडुनिंबाच्या झाडांच्या लिंबोळ्या झडायला लागायच्या. आम्ही मुलं पिशव्या, चिरगुटं घेऊन त्या गोळा करायला धावायचो. ह्या लिंबोळ्या म्हणजे छोटे आंबेच असायचे. लिंबोळ्या पिळून त्यांतली इवलीशी कोय सटकत बाहेर काढण्याचा खेळ आम्ही खेळत असू. दिवसभर लिंबोळ्या गोळा करत फिरत जायचं दूर दूर. त्या गोळा केलेल्या लिंबोळ्या विकून चार पैसे सहज मिळत. वडील सांगत [...]

‘चेटूक’ कादंबरीतील निवडक भाग

…राणी टिपणीसपुऱ्याच्या घरात येईपर्यंत दिघ्यांची स्त्री ओठाणाचा उंबरठा ओलांडून दादांच्या तक्तपोसाजवळ कधी उभी झाली नव्हती. राणीने हे सुरू केलं.“दादा, तुम्ही नागपूरचे मेयर होणार होता ना?” राणीने अमृतरावांना विचारलं.“तुला कोणी सांगितलं?” सुनेचा हा प्रश्न त्यांना धीट वाटला.“आई म्हणाल्या. ह्यांनीपण सांगितलं.”“झालो असतो बेटा आम्ही मेयरही. पण काय करायचंय ते पद घेऊन?” अमृतराव म्हणाले.“दादा, चांगल्या माणसांनी सत्ता नाकारली, [...]