माझा वाचन प्रवास…
जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने एका प्रतिकूल पार्श्वभूमीत वाढलेल्या तरुण वाचनवेड्याचं हे मनोगत...वाचन मला आज फार महत्त्वाचं वाटतं. अवांतर वाचन आयुष्यात खूप मोठा इम्पॅक्ट करत असतं. असंख्य महापुरुषांपासून ते माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांचं आयुष्य वाचनाने बदललं आहे. चांगली पुस्तके आपल्याला खूप काही देऊन जातात. ‘आपण जेव्हा वाचन करत नाही तेव्हा आपलं आयुष्य सीमित राहतं, चौकटीच्या बाहेर जाऊन आपण [...]