फॉन्ट साइज वाढवा

कुठल्याशा सण-उत्सवाला सात-आठ वर्षांच्या कुंजम्माला पुजाऱ्यांनी नखशिखान्त दागिन्यांनी मढवलं. फुलांनी तिचा शृंगार केला आणि तिला मदुराईच्या मीनाक्षीसमोर उभं केलं… देवीने स्वतःचंच रूप प्रक्षालन करण्याचा तो विधी! तेव्हा क्षणभर उपस्थितांनाही प्रश्न पडला, कुठली देवी खरी – शिल्परूपातली की तिच्या समोर उभी असलेली सजीवरूपातली? पण स्वतः कुंजम्माला तेव्हा आणि नंतरही कधी हा प्रश्न पडला नाही… कारण ती होतीच साक्षात् देवकन्या. कुंजम्माचा अर्थच होता मुळी – देवकन्या! पण स्वतः कुंजम्माच कशाला उभ्या जगाने तिला देवकन्या किंवा देवीच मानलं. तुम्हीच सांगा बघू, भारतरत्न एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्यासाठी तुम्ही देवीशिवाय दुसरं कुठलं संबोधन वापरू शकला असता? त्यांचं नाव उच्चारता क्षणी डोळ्यांसमोर उभी राहणारी छबीच एवढी सोज्वळ-सात्त्विक असायची, की त्या साक्षात् देवताच भासत! आणि मग साहजिकच जेव्हा त्यांच्या मुखातून भक्तिसंगीत प्रसवायचं, तेव्हा ती एकप्रकारे देववाणीच वाटायची. त्यांच्या इतकं आवाजातलं समर्पण… अन्यत्र आढळणं अशक्यच! कारण ते केवळ गायन नव्हतं,  तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

…ईश्वराबद्दलची ही निष्ठा कुठून आली असेल सुब्बुलक्ष्मींमध्ये?

त्या वेळी सुब्बुलक्ष्मी यांनी गायलेलं ते भजन मराठी असल्याचं म्हटलं जातं. कारण तेव्हा मदुराई देवस्थान परिसरात तंजावरच्या भोसले राजांचं अधिपत्य होतं आणि तिथे तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मराठी या सर्व भाषा सुखेनैव एकत्र नांदत होत्या. महत्त्वाचं म्हणजे सुब्बुलक्ष्मींच्या घराण्यातील कलापरंपरेला तंजावरच्या भोसले राजघराण्याचा पूर्वापार उदार आश्रय लाभलेला होता.

खरंतर हा प्रश्नच फिजूल आहे… त्यांचा जन्मच मुळी मदुराईच्या मीनाक्षी मंदिर परिसरात झाला. उच्चरवात देवीची आरती सुरू असताना, अखंड घंटानाद सुरू असताना, मंदिराचे पुजारी देवीला पंचारती, धुपारती दाखवत असतानाच, सुब्बुलक्ष्मींचा जन्म झाला. ती तारीख होती १६ सप्टेंबर १९१६. साहजिकच  तो देवत्वाचा अंश त्यांच्यात उतरला होता की काय कुणास ठाऊक! बहुधा त्यामुळेच त्यांच्या गळ्यातून अखंड देववाणी-देवगाणी प्रसवली असावीत… अन् त्यात कुंजम्मा ऊर्फ मदुराई षण्मुखवाडिवु सुब्बुलक्ष्मी, म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी मातृपरंपरेने देवदासी होत्या. देवदासी परंपरेतून आलेला कलावारसा सुब्बुलक्ष्मी यांच्या रक्तातच होता. त्यांची आई षण्मुखवाडिवुअम्माळ प्रख्यात वीणावादक होत्या, तर त्यांची आजी अक्कम्माळ व्हायोलिनवादक म्हणून त्यांच्या काळात लोकप्रिय होत्या. म्हणजे एकीकडे ईश्वरसान्निध्य आणि दुसरीकडे कलासान्निध्य अशा संगमातून सुब्बुलक्ष्मींचं गाणं आकाराला आलं होतं…

बालपणीच्या सुब्बुलक्ष्मी – देवकन्या!

कुणी काही रीतसर शिकवण्याआधीच मंदिरातील गायनाचा खोलवर संस्कार छोट्या सुब्बुलक्ष्मींवर झाला आणि वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच त्या पहिल्यांदा गायल्या. स्थळ होतं – मदुराईतील सेतुपती शाळेचं सभागृह. खरंतर तिथे कार्यक्रम होता सुब्बुलक्ष्मी यांच्या आईच्या वीणावादनाचा. परंतु मध्येच कुणीतरी गंमत म्हणून छोट्या कुंजम्माला उचलून व्यासपीठावर बसवलं आणि गा म्हटलं. तर कुंजम्माने एखाद्या तयार गवयाप्रमाणे ताला-सुरात भजन गायला सुरुवात केली आणि भजन संपताच उडी मारून ती खेळायला पळालीदेखील. त्या वेळी सुब्बुलक्ष्मी यांनी गायलेलं ते भजन मराठी असल्याचं म्हटलं जातं. कारण तेव्हा मदुराई देवस्थान परिसरात तंजावरच्या भोसले राजांचं अधिपत्य होतं आणि तिथे तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मराठी या सर्व भाषा सुखेनैव एकत्र नांदत होत्या. महत्त्वाचं म्हणजे सुब्बुलक्ष्मींच्या घराण्यातील कलापरंपरेला तंजावरच्या भोसले राजघराण्याचा पूर्वापार उदार आश्रय लाभलेला होता.

मात्र सुब्बुलक्ष्मींना गायनाची पहिली मोठी संधी मिळाली ती वयाच्या अकराव्या वर्षी, मदुराईपासून जवळच असलेल्या तिरुचिरापल्ली मंदिरात. ते साल होतं – १९२७. राष्ट्रीय काँग्रेसचे दक्षिणतले तेव्हाचे एक नेते एफ. जी. नटेशा यांनी ही मैफल आयोजित केली होती. या मैफलीला अनेक मान्यवर उपस्थित होते, त्या सगळ्यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्या गाण्याची प्रशंसा केली. केवळ घरातल्या घरात आई-आजीकडून मिळालेल्या सांगीतिक वारशावर सुब्बुलक्ष्मींनी दाखवलेली गाण्याची ही चुणूक लक्षणीय होती.

तिरुचिरापल्ली येथे झालेल्या या मैफलीमुळे षण्मुखवाडिवुअम्माळ यांच्या नजरेत लेकीची गायकी भरली. हिला गाणं शिकवलं, तर एक दिवस ही नक्की नाव काढील, हे त्यांनी ओळखलं आणि काही दिवसांतच मदुराईतला बाडबिस्तरा आवरुन त्यांनी कुंजम्मासह चेन्नई, म्हणजे तेव्हाचं मद्रास गाठलं. कारण मद्रास हे तेव्हा कर्नाटक संगीताचं तीर्थक्षेत्र होतं. मद्रासला आल्यावरच प्रसिद्ध गायनगुरू सेम्मनगुडी श्रीनिवास अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली सुब्बुलक्ष्मी यांचं कर्नाटक संगीताचं शिक्षण सुरू झालं. सोबतच हिंदुस्तानी संगीतातील प्रसिद्ध गायक नारायणराव व्यास यांचीही तालीम लावली. त्यामुळे एकीकडे त्यागराज परंपरेतील उत्तम कर्नाटकी गायकी, तर दुसरीकडे ग्वाल्हेर घराण्याची गोड लडिवाळ गायकी, असा दुहेरी मिलाफ सुब्बुलक्ष्मींच्या गळ्यात झाला. अर्थात सगळ्या प्रकारचं गाणं त्यांच्या गळ्यावर चढलं, तरी सुब्बलक्ष्मींना कायम खुणावत होतं, ते भक्तिसंगीतच. कारण जन्मतः त्यांच्यावर ज्या गाण्याचा संस्कार झाला, ते मदुराईच्या मंदिरातील भक्तिसंगीतच होतं.

सुब्बुलक्ष्मी यांचा आवाज सुंदर होताच, त्याबरोबरीनं उमदं देखणेपणही त्या जन्मजातच घेऊन आल्या होत्या. त्यामुळे त्या विशीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांच्याकडे सिनेमासाठी विचारणा होऊ लागली. मात्र सिनेमाकडे त्यांचा ओढा कधीच नव्हता. तरीही तिरुचिरापल्ली येथे जाहीर गायनाची पहिली संधी देणारे एफ. जी. नटेशा अय्यर यांना त्या नाही म्हणू शकल्या नाहीत. परिणामी १९३८ साली मद्रासमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेवासदनम्’ या चित्रपटात सुब्बुलक्ष्मी पहिल्यांदा नायिकेच्या भूमिकेत झळकल्या. त्यानंतर अशाच काही कारणास्तव त्यांनी ‘शकुंतला’ हा सिनेमा स्वीकारला. या सिनेमात त्यांनी शकुंतलेची भूमिका केली होती. तर त्यानंतर आलेल्या ‘सावित्री’ या सिनेमात त्यांनी चक्क नारदाची भूमिका केली होती. तसंच १९४५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मीरा’ या तमिळ सिनेमात त्यांनी मीरेची भूमिका साकारली. त्यांच्या या तमिळ मीरेला फार लोकप्रियता मिळाली नाही. परंतु १९४७ साली या तमिळ मीरेचीच हिंदी आवृत्ती प्रदर्शित झाली आणि संपूर्ण देशभरात सुब्बुलक्ष्मी म्हणजे मीरेचा आधुनिक अवतार मानल्या जाऊ लागल्या. सिनेमातील त्यांचं शालीन सौंदर्य पाहून आणि त्यांच्या आवाजातली मीरेची हृदयद्रावक भजनं ऐकून अनेकांनी खरोखर मीराबाईच पुन्हा जन्माला आल्याचा समज करून घेतला होता.

लोकांना भारावून टाकण्याची ताकद मीराबाईच्या भजनात तर होतीच, पण त्याहून अधिक सुब्बुलक्ष्मींच्या आवाजात होती आणि मंगलमय सौंदर्यातही होती. निसर्गाने दिलेल्या आपल्या आवाजाची, आपल्या सौंदर्याची ही ताकद सुब्बुलक्ष्मींना तेव्हाच कळली बहुधा… आणि त्याक्षणी त्यांनी सिनेमात काम करणं थांबवलं. आता फक्त गाणं आणि तेही भक्तिसंगीत, हाच आपला निजिध्यास असला पाहिजे, अशी त्यांनी खूणगाठच मनाशी बांधली… तेव्हापासून भारतीय भक्तिसंगीताचा गाभारा उत्तरोत्तर उजळतच गेला.


Rahe-Na-Rahe-Hum-Cover
मृदुला दाढे-जोशी लिखित रसिकप्रिय पुस्तक… रहें ना रहें हम…

चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्यं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं विशद करणारं गाजलेलं पुस्तक….

खरेदी करा


सिनेमात काम करत असताना आणि संगीताच्या जाहीर मैफली सुरू असतानाच १९३६ साली एका कार्यक्रमात त्यांची गाठ कल्की सदाशिवम् यांच्याशी पडली. सदाशिवम हे स्वातंत्र्यसेनानी आणि दक्षिणेतील प्रसिद्ध नेते राजगोपालाचारी यांचे अनुयायी होते. पहिल्या भेटीतच सदाशिवम व सुब्बुलक्ष्मी यांची मनं जुळली होती. मात्र त्यांचा विवाह व्हायला १९४० साल उजाडावं लागलं. सुब्बुलक्ष्मी सदाशिवम् यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आणि ते त्यांच्या आयुष्यातलं एक महत्त्वपूर्ण वळण ठरलं. त्यांनी सुब्बुलक्ष्मींना खाजगी गायनमैफलींतून बाहेर काढून सार्वजनिक क्षेत्रात आणलं. आणि तेव्हापासून सुब्बुलक्ष्मींचा खऱ्या अर्थाने कायापालट झाला. अर्थात सुब्बुलक्ष्मींनीही त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. गायनातच नव्हे, तर वैवाहिक आयुष्यातही. सदाशिवम यांचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि त्यांना दोन लहान मुलंही होती. तसंच त्यांची लहान भाचीही त्यांच्याकडेच होती. मात्र त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. ही माहिती सदाशिवम् यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्यापासून लपवून ठेवलेली नव्हती. त्यामुळे सुब्बुलक्ष्मी यांनी समजून-उमजूनच सदाशिवम् यांच्याशी लग्न केलं आणि केवळ त्यांनाच स्वीकारलं असं नाही, तर त्यांच्या मुलांनाही आपलंसं केलं आणि आपलं म्हणूनच वाढवलं. ती मुलंही त्यांना आयुष्यभर प्रेमाने अमूपट्टी म्हणत राहिले. सदाशिवम् यांच्या दोन मुलांपैकी राधा तर सुब्बुलक्ष्मी यांच्याकडेच गाणं शिकून पुढे मोठी गायिका झाली आणि जोपर्यंत तिची अमूपट्टी गात होती, ही राधा मागे बसून तिला साथ करत होती.

सिनेमा सोडून गाणं हेच आपलं भागधेय म्हणून स्वीकारल्यानंतर मग सुब्बुलक्ष्मी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. तेव्हापासून नाकात दोन बाजूंना दोन चमक्या, कानात हिऱ्यांच्या दोन कुड्या, कपाळावर कुंकू आणि खांद्यावरून घेतलेला हातभर पदर… हेच सुब्बुलक्ष्मींचं आणि भारतीय भक्तिसंगीताचं रूप राहिलं आहे. पूर्णपणे भक्तिसंगीताकडे वळण्याआधी सुब्बुलक्ष्मींनी खरंतर विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायली होती. सुरेल आवाजाची गायिका म्हणून त्यांचं नावही होऊ लागलं होतं. परंतु ही सगळी ओळख पुसून भक्तिसंगीत हेच त्यांनी आपलं कार्यक्षेत्र मानलं आणि मग त्या खरोखरच भारतीय भक्तिसंगीताचा सर्वोच्च सूर बनल्या. भक्तिसंगीत ऐकावं, तर त्यांच्याच गळ्यातून निघणाऱ्या नितळ, निकोप, निष्पाप आणि निष्कलंक आवाजातून, असं तमाम दुनियेला वाटू लागलं. प्रातःकाली संस्कृतमध्ये म्हटलं जाणारं सुप्रभातम हे व्यंकटेश स्तोत्र तर त्यांची ओळखच बनून गेलं. तीच गत विष्णु सहस्रनामाची… जणू सुब्बुलक्ष्मींच्या आवाजातलं हे गायन कानावर पडलं नाही, तर प्रत्यक्ष देवांनाही जाग येणार नाही!

सुब्बुलक्ष्मींच्या आवाजातील-भावनेतील ही सच्चाई हेच त्यांच्या गाण्याचं सामर्थ्य होतं. म्हणूनच केवळ दक्षिण नव्हे, तर संपूर्ण भारत, आणि अखिल विश्व त्यांच्या गाण्याच्या प्रेमात पडलं. त्यांच्या गाण्यासाठी कान आसूसणारे काही कमी नव्हते. खुद्द गांधीजी सुब्बुलक्ष्मींच्या गाण्याच्या प्रेमात होते. त्यांना सुब्बुलक्ष्मींनी गायलेली भजनं खूप आवडत. विशेषतः सुब्बुलक्ष्मींनी गायलेलं ‘वैष्णव जन तो तेने कहिए…’ हे भजन त्यांच्या आवडीचं होतं. गांधीजी म्हणायचे, ‘इतर कुणाचं गाणं ऐकण्यापेक्षा मला सुब्बुलक्ष्मींचं नुस्तं बोलणं ऐकणंही आवडेल.’ तर सुब्बुलक्ष्मींचं गाणं प्रत्यक्ष ऐकल्यावर एकदा पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, की या स्वरसम्राज्ञीपुढे मी फक्त एक साधा पंतप्रधान आहे…

सात्त्विक सौंदर्य आणि सात्त्विक गाणं, याच्या बळावर जोवर त्या हयात होत्या, त्याच एकमेव भारतीय संस्कृतीच्या सोज्ज्वळतेचं मूर्तिमंत रूप होत्या…! ज्या काळात भारतीय देवदासींच्या वाट्याला अवहेलना आणि अपमानचेच प्रसंग येत होते, त्या काळात देवदासी परंपरेतील एका स्त्रीच्या गायनकलेसमोर संपूर्ण जगाने नतमस्तक व्हावं, हा खरंतर तिच्या मातृपरंपरेचाच गौरव होता… नाही का?

– मुकुंद कुळे


Sundarabai

कलावादिनी लेखमालिकेतील पहिला लेख

‘बाई’ सुंदराबाई!

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…


लक्षणीय पुस्तकं

माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन


नसरीन मुन्नी कबीर

अनुवाद : प्रणव सखदेव


तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचं ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. उस्ताद अल्लारखाँ यांचे सर्वांत मोठे सुपुत्र. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केलं आणि त्यानंतर ते संगीत क्षेत्रातला ‘चमत्कार’ समजले गेले! त्यानंतर कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी तसंच नर्तकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार झाले. याबरोबरच झाकीर यांनी आपल्या सर्जकतेतून जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसंच एकलवादनही केलं. जॉन मॅकलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्यासोबत त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. नसरीन मुन्नी कबीर यांनी झाकीर हुसेन यांच्याशी साधलेल्या या प्रदीर्घ संवादात आपण झाकीर यांची जीवनकहाणी त्यांच्याच तोंडून ऐकतो. त्यांचं बालपण कसं होतं, माहीममध्ये त्यांनी व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, असामान्य प्रतिभेच्या वडिलांकडून त्यांनी वयाच्या चवथ्या वर्षापासून घेतलेले तबलावादनाचे धडे, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबरखॉँ आणि उस्ताद विलायतखॉँ यांसारख्या प्रतिभावंतांसोबत काम करताना आलेले अनुभव, आठवणी आणि किस्से यांतून संगीताचं अनोखं विश्व आपल्यासमोर येतं. यात झाकीर आपल्याला त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान, संगीताबद्दलची त्यांची समज, गुरू-शिष्य नातं आणि तबलावादनावर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम याबद्दल कधी मिश्किलपणे तर कधी समर्पित भावनेने बोलतात. एक विख्यात कलावंत म्हणून अमेरीका व भारत या दोन्ही देशांत आयुष्य व्यतीत करण्याची कसरत त्यांनी कशी साधली आहे याविषयीही ते मोकळेपणाने सांगतात.


295.00 Add to cart
Featured

सून मेरे बंधु रे

एस.डी. बर्मन यांचं जीवन-संगीत


सत्या सरन
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती;
गानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती.
त्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले.
अशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी
केलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे’.
`ये रात ये चाँदनी तू कहाँ’, `जलते है जिसके लिए’, `गाता रहे मेरा दिल’ ते `कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारखी
असंख्य आनंददायी प्रणयगीतं… `वक्त ने किया क्या हंसी सितम’, `जाये तो जाये कहाँ’ यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं…
`ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा’, `सुन मेरे बंधु रे’ सारखी
त्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली गाणी…
त्यांच्या संगीतातील वैविध्याची साक्ष देणारी अगणित गीतं आहेत, परंतु अशा त्यांच्या गीतांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दर्शवणारं आणि त्यामागच्या प्रेरणास्रोतांचा कल्पकतेने वेध घेणारं हे एकमेवच पुस्तक ठरावं.एस.डी.बर्मन यांच्या संगीताचा व त्यांच्या बालपणापासूनच्या व्यक्तिजीवनातील प्रेरणास्रोतांचा अन्वय लावणारं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं सांगणारं मराठी संगीत-रसिकांसाठी एक संग्राह्य असं पुस्तक `सुन मेरे बंधु रे…’



425.00 Add to cart

सुहाना सफर और…

कवी शैलेंद्र यांचा गीतमय जीवन-प्रवास


विजय पाडळकर


हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीताचा सुवर्णकाळ जेवढा संगीतकारांच्या अविस्मरणीय रचनांनी गाजला, तेवढाच तो प्रतिभावान गीतकारांच्या आशयसंपन्न काव्याने बहरला.
सामाजिक आणि वैचारिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या गीतकारांनी प्रेमगीतं, युगुलगीतं आणि मानवी जीवनातल्या सर्वच भावभावना उत्कटतेने व्यक्त करणारी गीतं सर्जनशीलतेने लिहिली आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवांचा वेध घेणारी गीतंही संवेदनशीलतेने रचली.
अशा चतुरस्र गीतकारांमध्ये शैलेंद्र हे महत्त्वाचं नाव! ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘दम भर जो उधर मूँह फेरे’, ‘पान खाएँ सैंया हमारो’, ‘जीना इसी का नाम है’, ‘आज फिर जिने की तमन्ना है’, ‘सुहाना सफर और…’ अशी वैविध्यपूर्ण आशयाची गीतं रचून त्यांनी रसिकांना सहजसोप्या शब्दांत विचारप्रवृत्त केलं, गीतांना तत्त्वज्ञानात्मक डूब देऊन प्रगल्भ केलं आणि तरल गीतांनी रिझवलंही…!
या पुस्तकात गीतकार शैलेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंची ओळख करून दिली आहे. तसंच त्यांच्या गीतांच्या चित्रणाची वैशिष्ट्यंही उलगडून सांगितली आहेत. ‘तीसरी कसम’ हा शैलेंद्र यांनी निर्मिलेला चित्रपट म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय… त्या चित्रपटाची पडद्यावरील आणि पडद्यामागील कहाणीही यात वाचायला मिळेल.
प्रसिद्ध चित्रपट-आस्वादक विजय पाडळकर यांनी घेतलेला शैलेंद्र यांच्या गीतमय जीवनप्रवासाचा हा विविधांगी वेध… ‘सुहाना सफर और…!’


Life and work of veteran lyricist in Bollywood – Shailendra! A reader can revisit the golden era of Bollywood music. Shailendra wrote all kinds of songs for successful films. It also tells about many behind the scene memories of various Hindi film songs. While reading about Shailendra, his life, struggles, how he carved his own niche in the industry, his passion of film making etc. This book is a kaleidoscope for film researchers and critics too.


340.00 Add to cart

हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान

एका प्रतिभासंपन्न अभिनेत्रीचा चित्रपट व जीवनप्रवास तिच्याच शब्दांत


नसरीन मुन्नी कबीर
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


प्रतिभा, आगळं सौंदर्य आणि व्यक्तिरेखा समजून घेऊन त्यात जीव ओतण्याची असामान्य क्षमता व बुध्दिमत्ता या बळावर वहिदा रेहमानने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात (१९५५-७५) गुरू दत्त, विजय आनंद ते सत्यजित राय यांसारख्या महान दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून तिने आव्हानात्मक भूमिका साकार केल्या आणि एकप्रकारे ती पर्यायी स्त्री-प्रतिमांसाठी अवकाश निर्माण करणारी अभिनेत्री ठरली. ‘प्यासा’, ‘गाइड’, ‘अभिजान’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ आदी चित्रपटांतील तिच्या सघन-सजीव व्यक्तिरेखा अविस्मरणीय व कायमस्वरूपी ठसा उमटवणार्‍या ठरल्या… आजकालच्या ‘रंग दे बसंती’ किंवा ‘दिल्ली-६’ पर्यंत तो ठसा कायम आहे.
‘आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद- वहिदा रेहमान…हितगुजातून उलगडलेली!


325.00 Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *