गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

‘काळजुगारी’ कादंबरिकेतील निवडक भाग

ती पाच माणसं होती. पाचही जणांचा पोशाख समान होता. प्रत्येकाने अंगावर पिवळसर रंगाचा कुर्ता घातला होता. अंगाखाली पंजाबी लोक घालतात तसा काळ्या रंगाचा पायजमा होता. गळ्यात मोठाल्या मण्यांच्या माळा होत्या. पोरगेल्याशा दिसणाऱ्या नुकत्याच वयात येऊ पाहणाऱ्या त्यांच्या एका साथीदाराचा अपवाद वगळता चौघांनाही दाढ्या होत्या. अंगापिडाने एखाद्या पूर्ण वाढ झालेल्या घोड्यागत दिसणारा त्यांचा म्होरक्या पुढे झाला [...]

वाचकांचे समाजमाध्यमांवरील प्रतिसाद

लैंगिकतेचा वेध घेणाऱ्या दीर्घकथा नुकतीच रोहन प्रकाशनाने हृषीकेश गुप्तेंची तीन पुस्तकं प्रसिद्ध केली. या पुस्तकांचा आकार आणि निर्मिती खूपच देखणी आहे. गुप्तेचं ‘परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष' हे पुस्तक त्याच्या नेहमीच्या पुस्तकांपेक्षा जरा हटके आहे.एक स्त्री विधवा होते आणि नंतर तिला भेटलेले पुरुष, एक स्त्री म्हणून त्या त्या पुरुषांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तीदेखील त्यांच्याकडे कशा [...]

आजच्या युगातील वाचनानंद…

‘बदल’, ‘परिवर्तन’ हे जीवनाचे अविभाज्य घटक होत. आपलं जे काही आयुर्मान असतं, त्या दरम्यान आपल्याला अनेक बदलांना सामोरं जावं लागतं. आता याला ‘सामोरं जावं लागतं’ असं म्हणावं, की ‘या बदलांचे आपण साक्षीदार असतो’ असं म्हणावं हा ज्याच्या-त्याच्या आलेल्या अनुभवांचा प्रश्न आहे; आणि काही प्रमाणात ज्याच्या-त्याच्या सभोवताली बघण्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. खरं म्हटलं तर दोन्ही प्रकारच्या [...]

प्रगल्भ होत गेलेल्या कथा… घनगर्द

२०१८ सालचा ‘लोकमंगल साहित्य पुरस्कार' हृषीकेश गुप्ते यांच्या ‘घनगर्द' या कथासंग्रहाला मिळाला. त्या वेळी प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, लेखक गणेश मतकरी यांनी घनगर्दबद्दल लिहिलेलं हे टिपण… मराठी साहित्याचा अवकाश हा प्रामुख्याने दोन प्रकारच्या आशयाला वाहिलेला आपल्याला दिसतो, कौटुंबिक आणि सामाजिक. त्यामुळे या दोन आशयसूत्रांमधेच आपल्या साहित्याने लक्षवेधी कामगिरी बजावली असली, तरीही या विषयांच्या परिघात राहणं, हीच [...]