गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

नाद-लय-ध्वनीची जमलेली शब्दमैफल

‘अनुनाद’ हे अरुण खोपकरांचे ‘मॅजेस्टिक’ प्रकाशनाने प्रकाशित केलेले नवे पुस्तक म्हणजे त्यांनीच या पुस्तकातील एका लेखात म्हटल्यांप्रमाणे ‘रूप पाहता लोचनी’ या स्वरूपाचे देखणे ग्रंथरूप आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक विकास गायतोंडे यांनी हे रूप सजवलं आहे. बहुविध कलांवर मनस्वी प्रेम करत मुलगामी लेखन करणाऱ्या खोपकरांचे हे नवे पुस्तक त्यांच्या आधीच्या पुस्तकाच्या मालिकेतला कळसाध्याय आहे.त्यांचे ‘गुरुदत्त : तीन [...]

‘असा घडला भारत’ या ग्रंथामधील निवडक भाग

१५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्याची पहाट… ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारताचं वसाहतीकरण साधल्यावर इ.स. १८५८मध्ये भारतीय वसाहतीची सूत्रं अधिकृतपणे पूर्णत: इंग्लंडच्या राजाकडे सोपवली गेली होती. अखंड भारतावर साम्राज्यवादी सत्ता लादणाऱ्या ब्रिटिश सरकारने प्रदीर्घ अशा स्वातंत्र्य लढ्यानंतर आणि हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर अखेरीस १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ‘१४ ऑगस्ट, १९४७च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य बहाल केलं [...]

‘भारत : समाज आणि राजकारण’ – प्रास्ताविक : गोविंद तळवळकर

आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून साकार झालेलं ‘भारत : समाज आणि राजकारण' हे पुस्तक आम्ही नुकतंच प्रसिद्ध केलं आहे. सुप्रसिद्ध अभ्यासक प्रा. जयंत लेले यांनी घेतलेल्या अनेक मुलाखतींचं रचनाबद्ध संकलित व संपादित स्वरूप म्हणजेच हा ग्रंथ होय. या पुस्तकाला दिवंगत विचारवंत गोविंद तळवळकर यांचं प्रास्ताविक लाभलं [...]

रोखठोक, बेधडक तरीही आनंद देणारं ‘नाइन्टीन नाइन्टी’

जे पुस्तक वाचून आपल्या मनाला आनंद वाटतो, जे पुन्हा वाचावंसं वाटतं, ज्याच्या स्मरणरंजनातही मजा येते, असं पुस्तक माझ्यासाठी आवडतं असतं. अलीकडेच अशा आनंद देणाऱ्या पुस्तकाची गाठभेट झाली. भान हरपून मी ते वाचतच राहिले. सचिन कुंडलकरचं ‘नाइन्टीन नाइन्टी’ हे ते पुस्तक. मला नेहमीच आनंद शेअर करायला आवडतं म्हणून हे लेखन. हे पुस्तक शीर्षकापासून वेगळेपण जपणारं, कुतुहल [...]

ध्येयवादी स्त्री-डॉक्टरचे विलक्षण अनुभव

भारतीय आरोग्यसेवेची एक दुखरी नस आहे- खेडेगावांत आणि दुर्गम भागांत डॉक्टरांची तुटपुंजी संख्या आणि दवाखान्यांची वानवा! सरकारी आरोग्यसेवा असते, पण त्यात औषधांचा, साधनसामुग्रीचा, विशेष वैद्यकीय उपचारांचा गंभीर तुटवडा असतो. ही वस्तुस्थिती बदलण्याचे स्वप्न एक डॉक्टर तरुणी पाहते. घरच्यांचा, मित्र-मत्रिणींचा विरोध पत्करून बिहारसारख्या सामान्यजनांना भयप्रद वाटणाऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय घेते. तिथल्या मागास भागातील अभावग्रस्त परिस्थितीशी लढत [...]

ड्रेक पॅसेज : लाटांचं तांडव

‘एन्ड ऑफ द वर्ल्ड’ पुस्तकातील निवडक अंश ड्रेक पॅसेजच्या अक्राळ-विक्राळ रूपाबद्दल बरंच ऐकलं, वाचलं होतं. निसर्गाचं भयानक तांडव खऱ्याखुऱ्या अर्थाने तिथे पहायला व अनुभवायला मिळतं. आता क्रुझ सफरी खूपशा सुरक्षित झाल्या असल्या तरीही ड्रेक पॅसेजमधला प्रवास भल्या-भल्यांच्या पोटात भीतीचा गोळा आणतो, तर सर्वसामान्य प्रवाशांचं काय? व मनुष्यवस्ती नसलेल्या ‘अंटार्टिंक’ या सातव्या खंडावर आयुष्यात एकदातरी पाय [...]