हातात हात घालून फिरणारे सोबती…प्रवास व वाचन

एप्रिल-मे महिने हे पर्यटनाचे आणि पर्यटन म्हटलं की, प्रवास आला. माझ्या मते, प्रवास आणि वाचन यांचं एकमेकांना पुरक असं नातं असतं. परंतु, पर्यटनासाठी होणाऱ्या प्रवासात वाचन होणं कठीण असतं. कारण बहुतेक वेळा तुमच्यासोबत कुटुंब असतं, मित्रपरिवार असतो. अशा वेळी एकलकोंड्यासारखं वाचन करत बसायचं हे ‘स्पॉइल स्पोर्ट’ असण्याचं लक्षण; आणि मुख्य म्हणजे पर्यटनाचा उद्देशच वेगळा असतो, [...]

ही फलनिष्पत्तीही नसे थोडकी…

पस्तीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी नवी ‘बजाज-चेतक’ स्कूटर घेतली होती. नवी स्कूटर लवकर मिळावी यासाठी त्या काळात काय करायला लागायचं पहा… सहा हजार रुपयांच्या मूल्याइतकं फॉरेन एक्सचेंज भरून गाडीचं बुकिंग करायचं आणि गाडीची डिलिवरी प्रायॉरिटीमध्ये मिळवायची. मी हे फॉरेन एक्सचेंज मिळवण्याची सोय केली, तेव्हा कुठे ‘फक्त’ दीड-एक वर्षात चेतक स्कूटर माझ्या हाती लागली. कंपनीची [...]

ड्रेक पॅसेज : लाटांचं तांडव

‘एन्ड ऑफ द वर्ल्ड’ पुस्तकातील निवडक अंश ड्रेक पॅसेजच्या अक्राळ-विक्राळ रूपाबद्दल बरंच ऐकलं, वाचलं होतं. निसर्गाचं भयानक तांडव खऱ्याखुऱ्या अर्थाने तिथे पहायला व अनुभवायला मिळतं. आता क्रुझ सफरी खूपशा सुरक्षित झाल्या असल्या तरीही ड्रेक पॅसेजमधला प्रवास भल्या-भल्यांच्या पोटात भीतीचा गोळा आणतो, तर सर्वसामान्य प्रवाशांचं काय? व मनुष्यवस्ती नसलेल्या ‘अंटार्टिंक’ या सातव्या खंडावर आयुष्यात एकदातरी पाय [...]

इन्शुरन्सचं महत्त्व

‘जेपीज् भटकंती टिप्स’ पुस्तकातील निवडक भाग हल्ली बहुतेक देशांच्या व्हिसासाठी अर्ज करतानाच ‘ओव्हरसीज् मेडिक्लेम इन्शुरन्स’ची कागदपत्रंही जोडावी लागतात. परदेशात वैद्यकीय सेवा खूप महाग असते. त्यामुळे आपल्या मुक्कामाच्या संपूर्ण कालावधीचा वैद्यकीय विमा काढून घ्यावा. त्यात थोडीही काटकसर करण्याचा प्रयत्न होऊ नये. त्यामुळे काय परिस्थिती ओढवते हे पुढील उदाहरणांवरूनच अधिक स्पष्ट होईल – १) आमच्या सोसायटीतील एक [...]

‘दिलसे’… ‘मन’से !

सगळ्या कार्पोरेट क्षेत्रात ‘आउट ऑफ द बॉक्स’ ही संकल्पना, ही फ्रेज फार लोकप्रिय आहे. प्रत्येक वरिष्ठ त्याच्या त्याच्या हाताखालच्यांना सतत हेच सांगत असतो, ‘‘थिंक आउट ऑफ द बॉक्स!’’ प्रत्यक्षात त्या वरिष्ठालाही काही माहिती नसतं की, म्हणजे नेमकं काय? कारण ज्यांना आपण ‘आउट ऑफ द बॉक्स’ कल्पना म्हणू शकतो, त्या शेकड्यानं किंवा डझनानं जन्माला येत नसतात. [...]

प्रवासाची वेगळी ‘नजर’

प्रवासवर्णनात विविध प्रकार दिसून येतात. दहा दिवसांत आठ देश बघितल्यावर इंटरनेटवरील माहितीच्या आधारे लिहिलेलं प्रवासवर्णन, ऑफबीट ठिकाणांची भटकंती करून वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेली निरीक्षणं, प्रवासातील अनुभवांच्या अनुषंगाने केलेलं लिखाण आणि आणखी इतर काही प्रकार… वस्तुत: कन्डक्टेड सहलींमधून तुम्ही खूप काही पाहू शकत नाही, खूप काही अनुभवू शकत नाही. त्या देशाला, जागेला तो केलेला केवळ भोज्जा असतो. [...]