10 | 978-81-86184-28-8 | Yoga Ek Kalpataru | योग एक कल्पतरू | B.K.S. Iyengar | बी.के.एस. अय्यंगार | योगसाधना व योगासने यांच्या नित्याचरणाने शरीर निकोप होत जाते, तसेच मनही शुध्दतेच्या मार्गाला लागते. धारणा-ध्यान त्याला सदाचाराकडे झुकवते. आसन व प्राणायाम यांच्या नित्यपरिपाठाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल होतो. तो अंतर्मुख होऊन त्याचे विवेक विचार जागृत होतात. हे सर्व कसे घडू शकते, याचाच विचार योगमहर्षी श्री.बी.के.एस.अय्यंगार यांनी या पुस्तकात विविध अंगांनी केला आहे. याच एका साधनेत आपले अवघे आयुष्य व्यतीत करून श्री. अय्यंगार यांनी सिध्द केलेले हे पुस्तक म्हणजे जणू ‘योग-नवनीत’च होय. योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग दिग्दर्शित करणारे एकमेव परिपूर्ण पुस्तक. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 226 | 21.6 | 14 | 1 | 220 | Theory of yoga | Yoga | योग | 175 | Yoga Ek Kalpataru.jpg | yog ek kalptaruBC.jpg |
का चिंता करिशी
चिंतामुक्तीसाठीचा हमखास मार्ग
डॉ.राजेंद्र बर्वे
सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव, भीती, नैराश्य, चिंता, काळजी या समस्या घराघरात जाऊन पोचल्या आहेत.
आपल्या आयुष्याचा मोठा भाग अशा चिंतातुर भावनांनी व्यापलेला असला तरी, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यायला हवी ती काळजी घेत नाही आणि समस्या वाढल्यावर मात्र हताश होऊन जातो.
ताणतणाव, मानसिक आजार याकडे डोळसपणे बघितल्यास अनेक समस्या वेळेत टाळता येऊ शकतात.
डॉ. राजेंद्र बर्वे गेली अनेक वर्ष मानसतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चिंता आणि काळजी अशा विकारांवर मात करण्यासाठी त्यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण केलेलं मार्गदर्शन म्हणजेच हे पुस्तक.
या पुस्तकात मार्गदर्शन करताना डॉ. बर्वे स्वाध्याय, सराव आणि केस स्टडीज् या माध्यमांचाही वापर करतात तसंच वाचकाला पूर्णपणे वाचनप्रक्रियेत सामावून घेतात.
त्यामुळे वाचक ‘केवळ वाचलं आणि सोडून दिलं’ असं न करता पुस्तकात दिलेल्या कृतिसत्राद्वारे मनापासून सहभागी होतो आणि आपल्या संत्रस्त मनस्थितीतून सकारात्मकपणे बाहेर पडतो.
हे पुस्तक वाचा, सराव करा आणि मग तुम्ही स्वतःलाच विचाराल…
का चिंता करिशी ?
Reviews
There are no reviews yet.