तर करा सुरु (भाग १)
₹120.00
लेखक : राजीव तांबे
प्रिय मुलांनो,
तुम्हाला तुमचे विज्ञानाचे प्रयोग इतरांना दाखवायचे आहेत? प्रयोगातून नवीन प्रयोग शोधायचे आहेत ?
पण एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकवेळी पहिल्याच प्रयत्नात तुमचा प्रयोग यशस्वी होईलच असे नाही. अशावेळी आपले काय चुकतं ? हे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्ही यशस्वी होणारच !
प्रयोग ही सुसंगत कृतींची मालिका असते आणि कृतींमागील कारणे समजून घेतली की प्रयोगातले विज्ञान समजते.
हे पुस्तक यासाठीच तर आहे!
‘तुमच्या हातून झालेली चूक तुम्हाला नव्याने शिकण्याची संधी देते’
ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.
मी तुमच्या ‘प्रयोग पत्रांची’ नेहमीच वाट पाहत असतो.
तुमचा दोस्त,
राजीव तांबे (tarkarasuru@gmail.com)
प्रिय पालक,
या पुस्तकातील प्रयोग मुलांनीच करायचे आहेत.
* प्रयोग करताना काहीवेळा मुलांच्या चुका होतील, पण अशावेळी त्यांना चूक दाखवू नका. तर, त्यांना चूक शोधण्याची म्हणजेच चुकांतून शिकण्याची संधी द्या.
* प्रयोग करताना काहीवेळा मुलांच्या हातून पाणी सांडतं किंवा काहीतरी फुटतं-तुटतं. अशावेळी मुलांना ओरडू नका आणि उपदेश तर अजिबात करू नका. त्याउलट मुलांशी प्रयोगाबाबत बोला.
हे प्रयोग बहुतांश ‘शून्य खर्चाचे’ आहेत. मुलांनी स्वतःहून प्रयोग करावेत यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.
‘शिकणाऱ्या मुलांना तुमच्या सहभागाची नव्हे तर सहवासाची गरज असते’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.
मुलांचा दोस्त,
राजीव तांबे
Reviews
There are no reviews yet.