130 | Goshti Purun Uranarya : Part – 7 | गोष्टी पुरून उरणाऱ्या (भाग – ७) | Purushottam Dhakras | पुरषोत्तम धाक्रस | या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 44 | 21.6 | 14 | 0.3 | 60 | Children story | Children | बालसाहित्य | 35 | Goshti Purun Uranarya : Part – 7.jpg | GoshtiPurunUrnarya7BC.jpg |
शेरू
निर्मला मोने
शेरू तसं सांगायला वाघाचं पिल्लू पण खरं तर आम्हा भावंडांपैकीच एक वाटायचा तो आम्हाला. जरा जास्तच लाडका, लाडावलेला. खायला, खेळायला, फिरायला, मस्ती करायला तो आमच्याबरोबर असायचाच; पण गप्पा मारताना, गोष्ट सांगता-ऐकतानाही तो असणं आवश्यक असायचं. निदान त्याला तसं वाटायचं. बोलताना मधे मधे त्याचं नाव घेतलं नाही तर त्याला वाईट वाटायचं. ते त्याच्या चेहर्यावर दिसायचंच. आवडीच्या खेळात त्याचा चेहरा अगदी हसरा व्हायचा, इतका की मिशा वर जायच्या आणि दु:खाची गोष्ट ऐकताना शेरूचे सुस्कारे सगळ्यात मोठयाने ऐकू यायचे. त्याला आमच्या आधीच खाऊ द्यावा लागायचा आणि वर मोठयानीही आपल्या वाटणीतून त्याला आणखी द्यावं असं जणू सांगत तो समोरच बसे. आम्हाला खेळायलाही ओढून नेई. आणि तरी…
Reviews
There are no reviews yet.