304 | 978-81-932336-3-4 | Man Ulgadatana | मन उलगडताना | मनातल्या गुंतागुंतीवर मनोविकारांवर टाकलेला प्रकाश | Dr. Vijaya Phadnis | डॉ. विजया फडणीस | मन असे कसे, कांद्याचे पापुद्रे जसे!’ कोण्या अज्ञात कवीच्या या ओळी मनाचं यथार्थ वर्णन करतात. मात्र थांग न लागणार्या मनाची मानसशास्त्रीय संकल्पना आणि पद्धती यांच्याद्वारे चिकित्सा केल्यास अनेक मनोव्यापारांचा वेध घेता येतो. ३५ वर्षांहून अधिक काळ मानसतज्ज्ञ आणि समुपदेशक म्हणून काम करणार्या डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहातून मनुष्यस्वभाव, मनोविकार, मानसोपचाराच्या विविध पद्धती आदींचा वेध घेतला आहे. विशेष म्हणजे फ्रॉइडचे स्वप्नाचे सिद्धान्त, रिअॅलिटी थेरपी आदी मानसशास्त्रीय संकल्पना किंवा डिप्रेशनसारखे मनोविकार आदी गोष्टी विशद करताना त्यांनी आपल्या लेखांना अनुभवांची जोड दिली आहे. त्यामुळे हे लेख माहितीपूर्ण, तसंच मर्मदृष्टी देणारे व रंजक झाले आहेत. या लेखांमधून फडणीस यांनी विविध मानसोपचारतंत्राचा वापर कसा करावा, हेही साध्या-सोप्या शब्दांत सांगितलं आहे. त्यामुळे वाचकांबरोबरच मानसशास्त्राचे विद्यार्थी व शिक्षक यांनाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. स्वभावाचे विविध नमुने मांडणारा, सकारात्मक वास्तववादी दृष्टिकोन देणारा मौलिक लेखसंग्रह… मनं उलगडताना ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 204 | 21.6 | 14 | 1 | 230 |
Dr. Vijaya Phadnis, having more than 35 years of experience in fields of psychology and counseling, has discussed the human nature, various psychological disorders and different types of therapies in this book. The detailed information about these disorders, coupled with her vast experience has made these articles richer and interesting. This book is not only useful for common reader but also for psychology students and professors.
|
Psychology | मन:स्वास्थ्य | 200 | Mana_ulagadtana | mana_ulagadatanaBC.jpg |
गोष्टी मनाच्या
आनंदी जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन
[taxonomy_list name=”product_author” include=”392″]
हे पुस्तक आहे, विविध वयोगटातल्या मुलांचे पालक, सामान्य वाचक, समुपदेशक, मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि अध्यापक
या सार्यांसाठी ! आजच्या पालकांपुढची आव्हानं असोत किंवा वयाच्या विविध टप्प्यांवर परिस्थितीनुरूप प्रत्येकाला करावं लागणारं समायोजन असो…प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याजवळ असतं व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे ते प्रत्यक्षात आणताही येतं असा विश्वास हे पुस्तक देतं.
सकारात्मक आणि आनंदी व्यक्तिमत्त्वासाठी नियोजन कसं करायचं, किंवा ओसीडी, एडीएचडी, स्किझोफ्रेनिया यांसारखे गुंतागुंतीचे मनोविकार नियंत्रणात कसे ठेवायचे
याबाबतचं उद्बोधक मार्गदर्शन या पुस्तकात वाचायला मिळेल. मुख्य म्हणजे, डॉ. विजया फडणीस यांच्या मानसोपचार क्षेत्रातील तब्बल चार दशकांच्या समुपदेशनाच्या अनुभवांची जोड पुस्तकाला लाभली आहे. या क्षेत्रात . फडणीस यांनी केलले चौकटीबाहेरचे प्रयोग व रुग्णांच्या ‘सक्सेस स्टोरीज’ हे तर या पुस्तकाचं बलस्थान आहे. वनातील ताणतणाव कमी करण्यासाठी आवश्यक अशा पुढील काही बाबींविषयी हे पुस्तक मार्गदर्शन करतं :
* यशाची परिभाषा * वेळेचं नियोजन * संवादाचे महत्त्व
* रागावरील नियंत्रण * नाती जपण्याची गुरुकिल्ली
* ठामपणा * निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं नियोजन
एकूणात समंजस आणि आनंदी जीवनासाठी मनाच्या व्यवस्थापनाच्या या ‘गोष्टी मनाच्या’ निश्चितच सर्वांसाठी वरदान ठरतील !
Reviews
There are no reviews yet.