335 | 978-93-86493-18-7 | Ladha ‘Taklelya’ Striyancha | लढा टाकलेल्या स्त्रियांचा | परित्यक्ता आंदोलनाचा वेध आणि स्त्री-पुरुष समतेचा शोध | Adv. Nisha Shivurkar | अॅड. निशा शिवूरकर | नवर्याने सोडलेल्या बायकांचा प्रश्न आपल्या समाजात खूप जुना आहे. अगदी पुराणकाळापासून सीता, अहिल्या यांसारख्या परित्यक्तांची उदाहरणं आपल्या परिचयाची आहेत. आजही आपल्या समाजात परित्यक्तांसाठी `टाकलेली’, `सोडलेली’, `बैठीली’ असे अत्यंत अपमानकारक शब्द सहजपणे वापरले जातात. घटस्फोट न देता-घेता इच्छेविरुद्ध हाकललेली विवाहित स्त्री म्हणजे `परित्यक्ता’. `ज्याची-त्याची वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाब’ असं म्हणून टाळला जाणारा हा प्रश्न वास्तविक एक गंभीर सामाजिक समस्या आहे. अलीकडील काळात हा प्रश्न ऐरणीवर आणला तो समता आंदोलनाने. या आंदोलनाच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्यांसाठी दिलेल्या लढ्यांचा विविधांगी आढावा या पुस्तकात घेतला आहे. त्याशिवाय परित्यक्तांच्या बोलक्या कहाण्या, परित्यक्ता होण्यामागची कारणं, स्त्री-पुरुष समानतेसाठी आवश्यक असे पोषक विचार आणि रचनात्मक व संघर्षात्मक कार्यामधून टिपलेल्या नोंदी या सर्वाचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळेल. पुस्तकाच्या लेखिका अॅड. निशा शिवूरकर या हाडाच्या कार्यकत्र्या असून त्यांनी या प्रश्नावर गेली अनेक वर्षं अनेक स्तरांवर झपाटल्यागत काम केलं आहे. या प्रश्नाची धग जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या लिखाणात व्यापक असा सहानुभाव आहे. माणूस म्हणून आपल्या जाणिवा रुंदावणारं हे पुस्तक शिवूरकरांनी ओघवत्या आणि थेट शैलीमध्ये लिहिलं आहे. सामाजिक भान देणारा एक अभ्यासपूर्ण दस्तऐवज… अर्थात लढा `टाकलेल्या’ स्त्रियांचा |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 248 | 21.4 | 13.9 | 1.3 | 280 | True stories of abandoned wives and the eye opening study of their protest for their rights. The book also tries to find answers to the issue of inequality in Man Woman relationships. | समाजरंग | Social | सामाजिक | 300 | Ladha Takalelya Striyancha Cover | LadhaStriyanchaCoverBC.jpg |
गुड मुस्लीम बॅड मुस्लीम
इस्लाम, अमेरिका आणि दहशतविरोधी युद्ध यांबाबतचं साक्षेपी विवेचन
महमूद ममदानी
अनुवाद : पुष्पा भावे, मिलिंद चंपानेरकर
चांगला’ मुसलमान कोण? ‘वाईट’ मुसलमान कोण? – हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात ‘गुड मुस्लीम’, ‘बॅड मुस्लीम’ या संकल्पनांचा व ‘राजकीय ओळखीं’चा उद्भवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने ‘शीत युद्धा’नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या ‘गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद.
महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे ‘गुड मुस्लीम’ आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो ‘बॅड मुस्लीम’. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते ‘९/११’च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची ‘धार्मिक ओळख’ आणि ‘राजकीय ओळख’ यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे.
जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक…
‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!
Reviews
There are no reviews yet.