476 | 978-93-82591-32-0 | Good Muslim Bad Muslim | गुड मुस्लीम बॅड मुस्लीम | इस्लाम,अमेरिका आणि दहशतविरोधी युध्द यांबाबतचं साक्षेपी विवेचन | महमूद ममदानी | Mahmood Mamdani | Pushpa Bhave,Milind Champanerkar | पुष्पा भावे, मिलिंद चंपानेरकर | चांगला’ मुसलमान कोण? ‘वाईट’ मुसलमान कोण? – हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात ‘गुड मुस्लीम’, ‘बॅड मुस्लीम’ या संकल्पनांचा व ‘राजकीय ओळखीं’चा उद्भदवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने ‘शीत युध्दा’नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या ‘गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद. महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे ‘गुड मुस्लीम’ आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो ‘बॅड मुस्लीम’. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते ‘९/११’च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्त्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची ‘धार्मिक ओळख’ आणि ‘राजकीय ओळख’ यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे. जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक… ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम! |
Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 312 | 500 | Good Muslim Bad Muslim_RGB.jpg | Good Muslim Bad Muslim_BackBC.jpg |
होरपळ
सोलापूर येथील मातंग वस्तीत ल.सि. जाधव यांचं बालपण गेलं. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घेतलं आणि भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ‘होरपळ’ या आपल्या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात, हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात. त्यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचं त्यांचं सामर्थ्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे.
साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारं तसेच वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन होरपळ…
Reviews
There are no reviews yet.