पुष्पा भावे

मुंबई विद्यापीठात अनेक वर्षं मराठी भाषा विषयाच्या अध्यापक म्हणून पुष्पा भावे कार्यरत होत्या. त्यांना महाराष्ट्रातील आघाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व समीक्षक म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांनी दलित व आशियातील अल्पसंख्यांकांच्या समस्यांबाबत विविध परिसंवाद व नियतकालिकांतील लेखनाद्वारे सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी' या संघटनेच्या त्या कार्यकारी सदस्य होत्या. ‘आशिया-युरोपमधील शांततेचे प्रश्न' या विषयावरील चीनमधील परिषदेत व त्याचप्रमाणे श्रीलंकेत अल्पसंख्यांकाच्या समस्येच्या निवारणार्थ गेलेल्या शिष्टमंडळात, प्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग होता. मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘सेहर' संस्थेसाठी त्यांचे योगदान असून नागरी स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सहभाग होता.

लेखकाची पुस्तकं

गुड मुस्लीम बॅड मुस्लीम

इस्लाम, अमेरिका आणि दहशतविरोधी युद्ध यांबाबतचं साक्षेपी विवेचन

जगातिक ख्यातीचे राजकीय समीक्षक, विचारवंत आणि मानववंशशास्त्रज्ञ म्हणून महमूद ममदानी यांचा लौकिक आहे. हॉवर्ड विद्यापीठातून १९७४ साली पीएच.डी केलेल्या महमूद ममदानी यांनी अनेक विषयांवर संशोधनपर व समीक्षापर लेखन केलं असून ‘आफ्रिकन अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स, कोलोनिअलिझम् अँड पोस्ट-कोलोनिअलिझम् अँड द पॉलिटिक्स ऑफ नॉलेज प्रॉडक्शन' या विषयावरील त्यांचा अभ्यास जागतिक चर्चाविश्वात विशेष दखलपात्र ठरला आहे. कोलम्बिया युनिव्हर्सिटीत हर्बट लेहमन प्रोफेसर म्हणून आणि युगांडांच्या ‘मॅकॅरेरे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च' संस्थेचे संचालक व प्राध्यापक म्हणून पदं भूषवलेल्या ममदानी यांचा जागतिक स्तरावरील आघाडीच्या ‘पुरोगामी विचारवंतां’मध्ये समावेश होतो.

अनुवाद:
मुंबई विद्यापीठात अनेक वर्षं मराठी भाषा विषयाच्या अध्यापक म्हणून पुष्पा भावे कार्यरत होत्या. त्यांना महाराष्ट्रातील आघाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व समीक्षक म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांनी दलित व आशियातील अल्पसंख्यांकांच्या समस्यांबाबत विविध परिसंवाद व नियतकालिकांतील लेखनाद्वारे सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी' या संघटनेच्या त्या कार्यकारी सदस्य होत्या. ‘आशिया-युरोपमधील शांततेचे प्रश्न' या विषयावरील चीनमधील परिषदेत व त्याचप्रमाणे श्रीलंकेत अल्पसंख्यांकाच्या समस्येच्या निवारणार्थ गेलेल्या शिष्टमंडळात, प्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग होता. मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘सेहर' संस्थेसाठी त्यांचे योगदान असून नागरी स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सहभाग होता.
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.

चांगला’ मुसलमान कोण? ‘वाईट’ मुसलमान कोण? – हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात ‘गुड मुस्लीम’, ‘बॅड मुस्लीम’ या संकल्पनांचा व ‘राजकीय ओळखीं’चा उद्भवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने ‘शीत युद्धा’नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या ‘गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद.
महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे ‘गुड मुस्लीम’ आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो ‘बॅड मुस्लीम’. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते ‘९/११’च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची ‘धार्मिक ओळख’ आणि ‘राजकीय ओळख’ यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे.
जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक…
‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!

395.00 Add to cart