अल्बर्ट आईन्स्टाईन

 


अमर चित्र कथा


अल्बर्ट खूपच लहान होता तेव्हा अभ्यासाबद्दल आवड नसल्यामुळे त्याचे पालक व शिक्षक निराश झाले. मुख्य म्हणजे, त्याला भाषणात अडचणी आल्या आणि दुर्लक्ष केले. अल्बर्टला शाळेत ज्या प्रकारचे शिक्षण मिळत होते त्याचा राग होता तारखा आणि मजकूर लक्षात ठेवणे इ. परंतु तो जसजसा मोठा होत गेला तसतसा लवकरच हे स्पष्ट झाले की, अल्बर्ट सामान्य व्यक्ती नव्हता. १९०५ हे साल त्याच्यासाठी “जादुई वर्ष” म्हणून ओळखले जाते, त्यावर्षी त्यांनी एक नव्हे तर चार नवीन संशोधन पेपर चार भित्र विषयांवर प्रकाशित केले. एका रात्रीत तो, त्याच्या पिढीतील सर्वात प्रसिद्ध वैज्ञानिक झाला.


 

90.00 Add to cart

गणपती

 


गणपती बाप्पाचं नाव घेतलं, की डोळ्यांपुढे बाप्पाचं गोजिरवाणं रूप उभं राहतं. भारतात सर्वत्र गणपती विघ्नहर्ता म्हणून पूजनीय आहे. म्हणूनच प्रत्येक शुभकार्यारंभी समस्यांचं निवारण करणाऱ्या लाडक्या बाप्पाला वंदन केलं जातं. मनोभावे त्याची पूजा केली जाते. गणपतीच्या जन्माची कथाही रंजक आहे. बाप्पाच्या जन्मानंतर लगेचच त्याचं आणि भगवान शंकराचं युद्ध झालं होतं, त्यात कोण विजयी ठरलं? काय घडलं? हे सांगणारी लाडक्या बाप्पाच्या जन्माची ही चित्ररुपी कथा!


90.00 Add to cart

जे. आर. डी टाटा

 


अमर चित्र कथा


एक नामांकित राष्ट्रीय विमान सेवा, जगप्रसिद्ध वैज्ञानिक आणि वैद्यकीय संस्था, चहापासून ते ट्रक आणि सौंदर्यप्रसाधनांपासून ते सामान्य मीठापर्यंतच्या देशाच्या गरजा भागविणारे औद्योगिक साम्राज्य त्याने इतके कसे साध्य केले असेल ? फक्त आणि फक्त कठोर परिश्रम, नम्रता आणि परंपरेचे मूल्य, त्याचबरोबर होती प्रगतीची दुर्दम्य इच्छाशक्ती… शिवाय, त्याच्या या साहसाच्या स्वभावाची उंची कुशलतेने चालविलेल्या विमानांपेक्षा सुद्धा अधिक होती.


 

90.00 Add to cart

रवींद्रनाथ टागोर

 


अमर चित्र कथा


विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे बंगाली साहित्यविश्वात आमूलाग्र बदल घडून आले. टागोर हे प्रतिभावान कवी, चित्रकार, कादंबरीकार आणि मोठे समाजसुधारक होते. त्यांना फक्त पुस्तकी शिक्षण पटत नसे, म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करण्यासाठी त्यांनी आश्रम व्यवस्थेवर आधारित एक शाळा ‘शांतिनिकेतनमध्ये’ सुरु केली. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या या असामान्य व्यक्तीचे हे प्रेरणादायी जीवनचरित्र !


 

90.00 Add to cart

वीर सावकर

 


अमर चित्र कथा


ब्रिटिश राजसत्तेला हादरवून सोडणारे जे महान क्रांतिकारक भारतभूमीत जन्मले, त्यांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शीयं सहनशीलता, त्याग आणि अपार बुध्दिमत्ता व प्रतिभा या गुणांचे अभूतपूर्व दर्शन त्यांच्या जीवनात घडले. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा भोगण्यास ब्रिटिश सत्तेने भाग पाडले. अत्यंत भयावह अशा या शिक्षेला सावरकर कसे सामोरे गेले, त्याची अत्यंत प्रेरणादायक अशी ही चित्रकथा.


 

90.00 Add to cart

सुभाषचंद्र बोस

 


अमर चित्र कथा


“जय हिंद! “या सुभाषचंद्र बोस यांच्या युद्धाच्या आरोळीने भारतीयांच्या मनात आशा निर्माण केली. जपानी युद्धकैद्यांच्या छावण्यांमधील भारतीय सैनिक तसेच देशातील स्वातंत्र्यप्रेमी तरुण त्यांच्या आवाहनामुळे प्रेरित झाले होते. संपत्ती आणि सुखसोयींसह जन्माला आलेला हा तेजस्वी विद्वान जन्मजात नेलाही होता. त्यांच्या कल्पना आणि प्रयत्नांनी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून दिले.


 

90.00 Add to cart

सोनेरी मुंगूस

 


अमर चित्र कथा


महर्षी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारत या महाकाव्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यात होते. महाभारतात कौरव आणि पांडव यांच्यातील युध्दाचेच केवळ वर्णन नाही, तर अनेक लहान-मोठया नीतिकथा, बोधकथा यांचाही त्यात समावेश आहे. सोनेरी मुगुस, कबुतराचे बलिदान आणि ब्राम्हणाचा गुरू खाटिक या अशाच काही बोधकथा. या कथा वाचून तुमच्या ज्ञानात भर पडेल, आणि मनोरजंनही होईल.


 

90.00 Add to cart

हत्तींच्या गोष्टी


प्राण्यांना बोलता येत नसलं तरी त्यांच्या आचरणातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. हत्तीच्या या गोष्टी प्राणीविश्वाची सफर घडवून आणतात आणि काही बोधही देतात. क्षुल्लक लोभाच्या मोहाला बळी पडणाऱ्या माणसांना लाजवणारी हत्तींची दयाळू वृत्ती या पुस्तकातील काही कथांमधून दिसते. पण हाच हत्ती जेव्हा लहान प्राण्यांना त्रास देतो तेव्हा हत्तीच्या शक्तीपुढे न झुकता चिमुकल्या मुंग्याही युक्तीने त्याला धडा शिकवतात. या जातक कथा बाचून हत्तींच्या विश्वात रममाण व्हा, पण योग्य बोध घ्यायला विसरू नका.


 

90.00 Add to cart

हुशार बिरबल


मुघल राजा अकबराच्या दरबारी असणाऱ्या नवरत्नांपैकी एक म्हणजे बिरबल, बिरबल अतिशय चतुर आणि मुत्सद्दी होता. अकबर अनेक अवघड प्रश्न विचारून बिरबलाच्या चातुर्याची आणि हुशारीची परीक्षा घ्यायचा आणि बिरबल अचूक उत्तर देऊन अकबराला निरुत्तर करायचा. बिरबलाने अनेक लष्करी मोहिमांचे नेतृत्व केले, तसेच राज्यकर्त्यांशी मुत्सद्दीपणे व्यवहारही केला. तो योग्य न्यायनिवाडा करत असे. हुशार बिरबलाच्या या कथा फक्त मनोरंजन करत नाहीत, तर मनात आदर्श मूल्यांची पेरणीही करतात. त्याच या अकबर-बिरबलाच्या कथा !


 

90.00 Add to cart

इम्प्रेसिव्ह इंग्लिश


बी.के. गर्दे


व्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा ‘प्रभावी इंग्रजी’चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता

  • नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल.
  • नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍यांसाठी.
  • व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी.
  • परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी
  • इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्‍यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी.
  • चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी.
  • भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी.
  • कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त.

90.00 Add to cart