फॉन्ट साइज वाढवा

यश म्हणजे काय? स्पर्धा नेमक्या कोणत्या आणि किती? आपलं सध्याचं सर्व जगणं हे एका महाकाय स्पर्धेसारखं जगत आहोत का आपण?

अमुक मुलाला इतके मार्क्स; मला त्याहून अधिक हवेत, अमुक मुलाला इतक्या मैत्रिणी; मला अधिक का नाहीत? अमुकचा पगार इतका; मला तेवढा पुरणार नाही! शेजारचे फिरायला गेले, त्यांनी चार नवे देश बघितले, आम्ही त्याहून अधिक बघणार…

आयुष्याच्या अनेक पातळ्यांवर ही अशी स्पर्धा, ईर्षा आपण अगदी क्षणोक्षणी अनुभवत असतो. अर्थात, ती तितकीशी गरजेची गोष्ट आहे का?

ह्या स्पर्धेचा शेवट काय? कसा? ह्यांचा निकाल कधी आणि कोण लावतं?

क क्षण थांबून या साऱ्याचा सारासार विचार केला तर त्यातला फोलपणा समजू लागतो. मुळात ही असली उथळ स्पर्धा एका गृहीतकांवर बेतली आहे, ती म्हणजे आपल्यात वाटलेलं सुख, श्रीमंती, आनंद साजरा करायचे क्षण, सगळं सगळं मर्यादित आहे! जणू दहाच लोकांचे टेबल आहे, आणि मग ह्या सर्व स्पर्धां त्या मर्यादित जागांकरता आहेत! हा दृष्टिकोन, ही समज हीच मुळी संकुचित वृत्तीतून येते. त्या समजातून अनेक समज रुजत जातात, कमतरतेचे, ओरबाडून घेणाऱ्या स्वार्थी वृत्तीचे आणि जिंकण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याचे. आणि हे सगळं रास्त आहे, गरजेचे आहे हेही कुठेतरी पटत जातं. त्याने होतं काय की संपूर्ण समाजाची शक्ती ही त्या स्पर्धेत खर्ची पडू लागते. त्या स्पर्धेतून डोकं वर काढून सभोवतालचे उदंड, अमर्याद शक्यतांचे जग दिसतच नाही. अन्याय हा नेमका कोणावर होतो आहे ते सहजी  समजत नाही.

मघाच्या दहा जणांच्या टेबलाच्या उदाहरणात बघितलं तर असं दिसेल की, जर १००० विद्यार्थी असतील आणि दहा जागा असतील, तरी त्या दहा जागांसाठी पराकोटीची स्पर्धा उत्पन्न होणं स्वाभाविक आहे. दहा जागा असतील आणि त्यातल्या तीन महिलांसाठी राखीव असतील, तर त्या ५०० महिलांत मैत्री, सलोखा अशक्य आहे.

या बाहेरच्या स्पर्धेचे संदर्भ आपल्याला आतून अधिक कोते, खुजे आणि सिनिकल (शंकेखोर) बनवत राहतात, तर स्वतःच्या शक्यतांच्या ध्यासाची स्पर्धा आपल्याला अधिक सशक्त, खोल रुजलेलं आत्मभान देऊन जाते.

दहा जागा असतील, त्यातल्या चार जागा कोणत्या गटांसाठी राखीव असतील तर त्या सर्व १००० लोकांमध्ये शांतता, प्रेम, विश्वास कदापि होणे नाही, कारण प्रत्येक जण धास्तावलेला! त्या दहात पोहोचेल तोच यशस्वी, मग तिथे आपण का नसावे ह्या इर्षेने पेटलेला… आता ह्यातून थोडं मागे सरकूया. समजा, दहा जणांऐवजी अशी दहा दहा जणांची शंभर टेबलं असली तर? जागा संपली तरी नवीन टेबलं निर्माण करण्याची एक खात्रीशीर सोय असली तर? टेबलं नसले तरी इतर अनेक खुर्च्या असल्या तर? थोडक्यात, सगळ्यांसाठी सगळं उदंड असेल तर? मग सगळी भांडणं, ईर्ष्या संपेल. दुरावे, दुस्वास मिटतील? हा भोळसट आदर्शवाद नव्हे तर निराळा दृष्टिकोन आहे. स्वतंत्र विचार आहे. कुठेतरी बाहेरच्या जगातल्या आपल्याला अल्पावधीत समजलेल्या अर्धवट धूसर दृश्याला अंतिम सत्य म्हणून न स्वीकारता, निराळे वास्तव बघण्याचं धारिष्ट्य देणारा विचार! म्हणूनच समाजाची मागणी ही नसावी की, त्या दहा जागांतले आरक्षण कमी जास्त करा, मागणी ही हवी की, जागा एक हजार करा. टेबलं वाढवा, नव्हे, ती निर्माण करण्याचा विचार ज्यातून तयार होईल ते शिक्षण मिळवा! शब्द इथे ‘मिळवा’ आहे, ‘द्या’ नाही. कारण जर स्पर्धेपलीकडे जाऊन जगायचे असेल, तर तो प्रवास व्यक्तिगत अधिक असणार आहे. इथून पुढचा स्पर्धेचा दृष्टिकोन हा बहिर्मुख नसून अंतर्मुख असेल. स्पर्धा नाहीशी होणार नाही. मात्र तिच्यातून दुरावा, हेवेदावे कमी होतील. स्पर्धा ही स्वतःशीच असेल. स्वतःच्या अमर्याद शक्यतांना शोधून काढण्याची स्पर्धा असेल. कालच्या तुमच्या क्षमतांपेक्षा आजच्या वाढलेल्या क्षमतांशी चढाओढ असेल. काल जर एक मैल चाललात तर महिनाभरात, वर्षभरात, दहा वर्षांत किती सातत्याने, हळूहळू वाढत जात किती मैल चाललात ह्याची स्पर्धा स्वतःशीच करू लागाल!


रोहन प्राइम

वाचकांसाठी एक खास सभासद योजना!

‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…

अधिक माहिती जाणून घ्या..

250.00Add to cart


सभोवतालच्या उदंडतेतून किती कण वेचू शकाल ह्याची स्पर्धा असेल. एक हजार जागा कशा तयार होणार ह्या प्रश्नाला उत्तर देणारा हा प्रवास असेल. त्या एक हजारात नाही मिळाली कोणाला जागा, तर स्वतःची जागा निर्माण करण्याचे बळ ज्या सातत्यपूर्ण सवयी देतील; त्यातून ही बाहेरची स्पर्धा, तिच्यामागचे धावणे, सारेच संपेल. कारण प्रत्येकजण अमर्याद शक्यता घेऊनच आलेला आहे. त्या शक्यतांच्या सीमांपर्यंत आपण स्वतःला कधी जाऊच देत नाही.  बाहेरच्या, इतरांच्या क्षमतेला अखेरचे मापक मानून स्वतःला खुजे करण्यात अवघा जन्म घालवतो. या बाहेरच्या स्पर्धेचे संदर्भ आपल्याला आतून अधिक कोते, खुजे आणि सिनिकल (शंकेखोर) बनवत राहतात, तर स्वतःच्या शक्यतांच्या ध्यासाची स्पर्धा आपल्याला अधिक सशक्त, खोल रुजलेलं आत्मभान देऊन जाते.

लक्षात असू द्या की स्पर्धेत धावणारे घोडे, गाड्या अथवा उंट हे जिंकले किंवा हरले तरी स्पर्धेच्या पातळीवर उठू शकत नाहीत, ना की ते स्वतः धनाढ्य होतात. मात्र त्यांच्यावर मालकी हक्क सांगणारी मंडळी ही धनवान होत जातात.

त्यामुळे स्पर्धा बहिर्मुख असून अंतर्मुख करणारी हवी. मर्यादित जागांसाठी नसून अमर्याद शक्यतांवर विश्वास जागवणारी हवी!

– प्राजक्ता पाडगांवकर


नावीन्यपूर्ण बदल घडवताना

११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या… त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास…

अशक्य कोटीतील वाटाव्या अशा गोष्टी शक्य करून दाखवणार्‍या ११ भारतीय कंपन्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास या पुस्तकात तपशिलात दिला आहे. या उपक्रमांनी नावीन्यपूर्ण बदल घडवले आणि उद्योगजगतातील संदर्भ बदलून टाकले आहेत… त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख देणारे हे नावीन्यपूर्ण पुस्तक सर्वांना निश्चितच रोचक वाटेल, प्रेरणादायी वाटेल…

खरेदी करा


या सदरातले इतर लेख

यश आणि प्रभुत्व

ज्या यशाचं भरभरून कौतुक होतं, ज्याच्या आहारी बहुतांश समाज जातो, ते यश किती खुजं आणि फसवं आहे, हे समजून येईपर्यंत पुष्कळदा खूप उशीर झालेला असतो.

लेख वाचा…


कंपाउंडिगची गंमत

आयुष्यातले दररोज निवडलेले प्रत्येक पर्याय हे चक्रवाढ व्याजासारखे वाढत असतात, त्यामुळे आपल्या वेळेची, फोकसची (एकाग्र चित्ताची) गुंतवणूक अगदी निगुतीने करायलाच हवी!

लेख वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *