फॉन्ट साइज वाढवा
माणूस हा प्राणी फार इंटरेस्टिंग आहे. विचार करण्याची, निर्मितीची, सर्जनाची देणगी लाभलेला माणूस परिस्थितीनुरूप बदलतो, कधी आपल्या सोयीनुसार परिस्थिती बदलतो, पुढे पुढे जाण्याचा मार्ग काढत राहतो, सहजी हार मानत नाही.
किती माणसं आजूबाजूला दिसतात, जी चाकोरी सहज बाजूला सारून देतात, ठरलेल्या रस्त्यांकडे पाठ फिरवून, नवे मार्ग धुंडाळतात, किंवा चाकोरी स्वीकारूनदेखील त्यात स्वतःच्या मनाचा कौल घेत काम करत राहतात… अनेक महिने, अनेक वर्षं! थकत नाहीत, कंटाळत नाहीत, निराश होऊन काम सोडून देत नाहीत.
या सदरात अशाच काही इंटरेस्टिंग माणसांबद्दल, त्यांच्या पठडीमध्ये न बसणाऱ्या कामांबद्दल जाणून घेणार आहोत. यापैकी काहींविषयी माहिती असेल, पण त्यांच्या कामाविषयी माहिती नसेल, काही व्यक्ती तर अपरिचित असतील… या लोकांचं काम तर समजून घेऊच. पण त्याहीपेक्षा त्यांचा प्रवास कसा आहे, त्यांची स्वप्नं काय होती, ती पूर्ण होत आहेत का, कम्फर्टझोनची चौकट मोडून शून्यापासून नवी सुरुवात करण्यामागची ऊर्मी काय असते, एका क्षणी आव्हानं, धोके, असुरक्षितता यांची अजिबात भीतीच का उरत नाही, यांच्या सर्जनाची विचार प्रक्रिया असते तरी कशी… हे सारं समजून घेऊ. त्यांच्या कामाची ओळख होईलच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कामामागचा विचार समजून घ्यायला हवा, त्यांच्या प्रवासात ते कसे समृद्ध होत गेले, घडत-बिघडत गेले, हे जाणून घेणार आहोत.
यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटवण्याचा प्रयत्न आहे. कला, पर्यावरण, शिक्षण, फोटोग्राफी, पर्यटन आणि इतर अनेक! आज सगळीकडूनच झाकोळून आलेल्या वातावरणातही या लोकांचा प्रवास सुरूच आहे. पुढे पुढे जात राहण्याच्या त्यांच्या उमेदीला ही दाद आहे. थांबला तो संपला, असं आपण म्हणतोच. यांचा प्रवास आपल्याला हेच सांगेल. प्रवासात भेटणारी माणसं, अपरिचित ठिकाणं, बरे-वाईट अनुभव याबद्दल आपल्याला कौतुक वाटेल आणि पटेल – मंझिलसे बेहतर हैं रास्ते !
– नीता कुलकर्णी
(संपादिका, अनुवादिका व अभिवाचक म्हणून कार्यरत)
—
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
मंझिल से बेहतर है रास्ते
या सदरातील पहिला लेख…
खाद्यसंस्कृतीची संशोधिका : शिल्पा परांडेकर
महाराष्ट्रातल्या ५०० गावांचा प्रवास एकटीने करून शिल्पाने विस्मृतीत गेलेले, जाऊ पाहणारे शेकडो पदार्थ आणि त्यांच्या कृती समजून घेऊन त्यांची नोंद केली आहे.
मल्हार हा मूळ चिपळूणचा! तिथलाच रहिवासी. त्याच्या घरामागे वशिष्ठी नदी वाहाते. त्यामुळे पाण्याची ओढ त्याला जन्मजात आहे….
संधीने दार ठोठवलं तर ते पटकन उघडायलाही अनेकदा धाडस करावं लागतं. योगिनीने ते केलं….
शेतीव्यवसायला नवी दिशा देणारी ‘पल्लवी’
महाराष्ट्राची ही माहेरवाशीण तिथे आसामात शेती आणि शेतीपूरक अनेक व्यवसाय करते.
वास्तुचित्र : वारसा आणि स्थापत्याचे अचूक कॉम्पोझिशन
शिक्षण आणि व्यवसायाने आर्किटेक्ट असणाऱ्या आणि अॅनिमेशनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनुपला नुसतं ‘फोटोग्राफर’ म्हणणं योग्य ठरणार नाही