कवितेवरची ‘कविता’ – (‘पेन’ गोष्टी)

काही काही कार्यक्रम असे असतात, की त्याविषयी काही लिहू नये, बोलू नये... केवळ असीम शांततेत त्यांचा आठव मनात आणावा आणि तृप्त मनाने ते क्षण पुन:पुन्हा जगावेत. काही लिहू नये, याचं दुसरं एक कारण असं, की अशा अनुभूतीचं शब्दांकन कायमच तोकडं, थिटं वाटतं. जे अलौकिक अनुभवलंय ते शब्दांच्या चौकटींनी बद्ध करणं म्हणजे वेडेपणा आहे, असं मन [...]

गोकर्ण-उडपी एक ‘गीत-प्रवास’! (एकला सोलो रे)

मागच्या दोन दिवसांनी भरभरून दिलेल्या अनुभूतीनं भरलेला खजिना घेऊन मी बंक बेडवरून उठलो. गोकर्ण मंदिर, ओम बीच, पॅराडाइस बीचमध्ये पाहिलेले सी प्लँक्टन्स, याना गुहा, विभूती धबधबा आणि अधेमध्ये पेरलेल्या असंख्य आठवणी मनामध्ये रुंजी घालत होत्या. मला त्या साऱ्या जपत आजचा हा दिवस काल धावती भेट दिलेल्या कुडले बीचवर जाऊन निवांत जगायचा होता. तुम्हाला शांत जगायचं [...]

‘अन्फर्गेटेबल जगजित सिंग’ पुस्तकातील निवडक भाग

‘…जगजित मृदू स्वभावाचा होता. एका शब्दानेही कोणाला दुखवत नसे, मग कृतीने दुखवणं दूरच. पण तोच जगजित गुरूच्या भूमिकेत शिरला की अतिशय कठोर होऊन जाई. शिष्याला जराही दयामाया न दाखवता तालीम घेत असे. चित्राला संगीताचे धडे देतानाही तिच्या आवाजात हवी तशी परिपूर्णता येईपर्यंत जगजितने तिचे स्वरोच्चार, आवाजातील चढउतार आणि गायकीमधील लवचिकता या गोष्टींवर अथक मेहनत घेतली. [...]

साक्षीभावाने केलेला ‘अपवाद’

पूर्व आणि पश्चिम या दोन दिशा एकमेकींविरुद्ध ठाकलेल्या, किंवा एकमेकांकडे पाठ फिरवून उभ्या असलेल्या… जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीतला, एखाद्या कृतीतला विरोधाभास दाखवायचा असतो, तेव्हा नकळतपणे उच्चारलं जातं, “काय आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं!” दोन स्वभाव, दोन वृत्ती यांच्यातील तफावत दाखवतानाही आपण उपरोधाने याच दिशांचा उद्धार करत असतो. तद्वत, दोन संस्कृतीतील तफावतही ‘पूर्व-पश्चिम’ या परिभाषेतच [...]