कसोटी पाहणारं वर्ष आणि भविष्यवेध

प्रवासात जेव्हा बरंच मोठं अंतर पायी चालून कापायचं असतं, किंवा त्यात मोठा चढ पार करायचा असतो, तेव्हा नकळतपणे मागे नजर जातेच. किती अंतर कापून झालं? किती शिल्लक राहिलं असावं? किंवा कितीसा चढ पार केला गेला? अजून किती पार करायचा शिल्लक आहे? असं एक तुलनात्मक गणित मनात चालू असतंच. आणि ‘अरे वा, नाही म्हणता म्हणता बरंच [...]

मनाची ‘लॉकडाउन’ स्थिती ‘अनलॉक’ करण्यासाठी…

लॉकडाउन केलेली गोष्ट ‘अनलॉक’ करण्यासाठी चावी लागणारच. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक कारणांसाठी, अनेक प्रकारची, अनेक आकारांची कुलुपं वापरावी लागतात. वापरली नाहीत तरी, आपल्या मानसिक समाधानासाठी तरी, त्यांची उपलब्धता आपण ठेवत असतो. या कुलुपांत घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावणाऱ्या मोठ्या आणि प्रगत कुलुपापासून प्रवासाला जाण्यासाठीच्या छोट्या एअरबॅगला लावण्याचं छोटं तकलादू कुलूप असू शकतं. या दोन टोकाच्या [...]

स्वातंत्र्याचीही संकल्पना बदलणारा विषाणू…

व्यक्तिगत स्वातंत्र्याविषयी सर्वसाधारणपणे लोक जरा संवेदनशील असतात, ‘सेन्सिटिव्ह’ असतात. आपल्या स्वातंत्र्यावर कोणाला किती आरूढ होऊ द्यायचं याची मनात जी काही चौकट ठरवली असेल, समजा, ती चौकट कुणी कधी पार केली तर, एखादी व्यक्ती आवेशाने म्हणतेही, ‘‘मी स्वतंत्र वृत्तीचा माणूस आहे. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणारा नाही. वेळप्रसंगी मी माझ्या स्वातंत्र्याची किंमत मोजायला तयार आहे…’’ परंतु, प्रत्यक्ष [...]