बैठकीच्या लावणीची ‘मोहना’माया (कलावादिनी)
बैठक सजलेली असते. मऊशार गादीवर पांढरी शभ्र चादर अंथरून, वर तबियतीने पेश येण्यासाठी लोड-तक्क्यांचा इंतजाम झालेला असतो. गाद्या-गिरद्यांसमोर एका तबकात मोठ्या नजाकतीने विड्यांची चळत रचलेली असते. तर दुसऱ्या तबकात काळजात खोलवर जखम करणाऱ्या मोगऱ्याचे बेधुंद वळेसर. साजिंद्यानी वाद्यं सुरात जुळवून ठेवलेली असतात. हुकूम झाला, की फक्त सूर छेडायचाच अवकाश असतो. एक अजीबसा माहौल आकाराला येत [...]