भावनांचा गूढगर्भ शब्दाविष्कार…
काहीशी वेगळ्या शैलीची मराठीतील ही तीन पुस्तकं नव्या पायवाटेची चाहूल देणारी आहेत. चांगली किंवा र्वाइट हे त्या पायवाटेवर गर्दी किती होते त्यावर अवलंबून आहे. ‘काळजुगारी’, ‘हाकामारी’ या लघुकादंबऱ्या व ‘परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष’ व ‘तिळा दार उघड’ या दोन दीर्घकथा. ही ती तीन पुस्तकं,एकाच संचात प्रकाशित झालेली. लेखक आहेत हृषीकेश गुप्ते.नव्या पिढीच्या भाषेत लिहिणारे नव्या [...]