गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

‘ढग’ कादंबरीतील काही निवडक भाग

संभ्रमिताची डायरी… जाणिवेच्या मागावर मी वयाच्या चाळीशीनंतर जाणं सुरू केलं. हा शोध मी डायरीतून सुरू केला. माझी डायरी मी फक्त माझ्यासाठीच लिहीत नव्हतो; तर त्यातून माझ्यासाठी आणि वीणासाठी, म्हणजे माझ्या बायकोसाठी काही गोष्टी स्पष्ट करणं हा तिचा उद्देश होता. तिची काही पानं मी वीणाला अधूनमधून वाचून दाखवत असे. ह्या डायरीतल्या एका भागाला मी शीर्षक दिलं [...]

‘ऊन’ कादंबरीमधील निवडक भाग

काळाचा महिमा असा की, एकेकाळी ज्या घरात भारतीय स्वातंत्र्यावर चर्चा झडल्या तिथे धाकट्या काकामुळे हिंदी चित्रपटाचे चोरटे स्वर घुमू लागले. छपरीत बसलेल्या आजोबांना हे अजिबात पसंत नसे. त्यांना तसंही संगीताचं वावडंच. आजोबांच्या रामराज्यात, म्हणजेच महात्मा गांधींच्या कल्पनेतल्या देशात हिंदी चित्रपटांवर आणि त्यांच्यातल्या पांचट गाण्यांवर कायम बंदी असणार होती. त्या मोहंमद रफी आणि मुकेशला सक्तमजुरीची शिक्षा [...]

बेगम नूरजहानने तयार केलेलं ‘इत्र-इ-जहांगिरी’

बादशहा जहांगीरची बेगम नूरजहान ही मोठीच हिकमती आणि महत्त्वाकांक्षी होती. आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या बळावर तिने दुबळ्या आणि व्यसनाधीन बादशहाचा कारभार आपल्या हातीच घेतला. नूरजहानची कर्तबगारी बादशहा जहांगीरला साह्यकारक ठरली. दोघांचाही शेवट शोकात्म ठरला, तरी नूरजहानच्या कर्तबगारीची नोंद इतिहासाला घ्यावीच लागली. नूरजहानची राजकीय कर्तबगारी वादग्रस्त ठरली, तरी ती स्वत: सौंदर्यासक्त असल्याने कलात्मक, शिल्पकलात्मक आणि [...]