महत्त्वाकांक्षी कादंबरीत्रय – चेटूक, ऊन व ढग
ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.
मी आठेक वर्षांचा असताना बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या अठरा जणांच्या कुटुंबात त्यामुळे हलकल्लोळ माजला होता.
काळाचा महिमा असा की, एकेकाळी ज्या घरात भारतीय स्वातंत्र्यावर चर्चा झडल्या तिथे धाकट्या काकामुळे हिंदी चित्रपटाचे चोरटे स्वर घुमू लागले.
राणीसाठी कुठलीही गोष्ट अनुल्लंघनीय नव्हती. एखादी गोष्ट मनात आणली की, ती करायची आणि ओठात आली की, ती बोलायची हा राणीचा खाक्या.