‘झुरांगलिंग’ कादंबरीतील निवडक भाग

मोबाइल इंटरनेटमुळे गूगल सर्च असं म्हणताच वाट्टेल ती माहिती तुमच्या डोळ्यापुढे चमकत राहते. झुरांगनं इंटरनेटवरनं लदाखची माहिती मिळवायला सुरुवात केली. ती बरीचशी ‘तिथं कसं जा? काय पाहा? काय त्रास होतो? काय काळजी घ्या?’ अशी पर्यटनयुक्त होती. ‘कसं जा?’ यामध्ये त्याला इंट्रेस्ट होता. तो उत्साहाने ती माहिती वाचायला लागला. जायचे पर्याय असे होते, संपूर्ण आरामदायक पण [...]

मला ‘जिवंत’ ठेवणारी वास्तवातली पुस्तकं…

बघता बघता ‘रोहन’मध्ये आठ वर्षं पूर्ण झाली. ऑफिसच्या आजूबाजूची बरीचशी लोकं आता परिचयाची झालीत, नजरेखालून ढीगभर पुस्तकं घालून डोळ्यांवर चष्मा चढलाय, काम करताना एकावर एक अनेक चहाचे कप रिचवून अ‍ॅसिडिटीसुद्धा मागे लागलीये. थोडक्यात काय, ‘संपादक’ म्हणून चांगलाच गुटगुटीत अनुभव पाठीशी जमा झालाय. माझी वाचनाची आवड आणि वाचकाला उत्तमोत्तम वाचायला मिळत राहावं; अशी प्रामाणिक इच्छा, निव्वळ [...]