हास्य-तुषार
निखळ करमणुकीसाठी निवडक चुटक्यांचं हे पुस्तक तुम्हाला नक्कीच हसायला लावेल. बंडोपंतांपासून बर्नार्ड शॉ ह्यांच्या आयुष्यात घडलेले खुसखुशीत विनोद!
देश-विदेशांतील थोरामोठ्यांची संस्कारक्षम वचने
पुरातन काळापासून जगाच्या पाठीवरील विचारवंतांनी व बुद्धिवंतांनी वेळोवेळी अनेक विषयांवर मौलिक विचार वा भाष्य व्यक्त केलेले आहे. स्थळ, काळ अशा बंधनांच्या पलीकडचे असे सर्वव्यापी असणारे हे विचार नेहमीच प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शी ठरतात. या पुस्तकात अशी निवडक सुविचार-सुवचने; ज्ञान, कार्य-कर्तृत्व-कष्ट, निसर्ग, देश, समाज, ध्येय, व्यक्तिमत्त्व, आचरण, मन, आरोग्य, धर्म-ईश्वर इ. विभागात संकलित केली आहेत. उत्तम जीवनमूल्ये सांगणारी देश-विदेशांतील थोरा-मोठ्यांची ही मौलिक सुवचने सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरतील. विद्यार्थी, शिक्षक यांना तर हे पुस्तक बहुमोल ठरणारे असे आहे.
कधी अपेक्षेइतके पाहुणे येत नाहीत, कधी कुणाची भूकच मंदावते, तर कधी घरातील मंडळींचा अचानक बाहेर खायला जाण्याचा बेत ठरतो. अशा वेळी स्वयंपाक तोलूनमापून करूनही काही पदार्थ उरतात. हे पदार्थ दुसर्या दिवशी खायला मंडळी नाखूष असतात आणि ते टाकून देण्याचा विचार मनात येऊ नये, हेही खरेच! पण त्यामुळे पेच कायम राहतो— करायचं काय या शिल्लक पदार्थांचं? मृणाल चांदवडकर या स्वयंपाकात विशेष रुची असलेल्या अनुभवी गृहिणी. त्यांनी गेली काही वर्षें अशा उरलेल्या पदार्थांवर अनेक प्रयोग केले आणि विविध प्रकारच्या उरलेल्या पदार्थांतून नव्याने करता येण्याजोगे पदार्थ कोणते हे शोधले. त्यांची कृती पध्दतशीरपणे लिहून काढली, उरलेल्या पदार्थांच्या उपयोगाचे कल्पकतेने विविध पर्याय तयार केले. हे पर्याय म्हणजेच हे पुस्तक होय! सर्वच गृहिणींना ते वरदान ठरावे.
पाककृती आणि कलाकुसर यात ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले अशा प्रमिला पटवर्धन या खर्या अर्थाने सुगरण आहेत. पाककलेतील निपुणता आणि स्वयंपाकात रस घेणारे यांचे मन यामुळे यांच्या हातच्या पाककृतींना एक वेगळीच चव असते. आपल्या पारंपरिक पदार्थांचा वारसा पुढील पिढयासाठीही जतन व्हावा असा यांचा एक आग्रह आहे म्हणूनच या पुस्तकात यांनी महाराष्ट्रीय पद्धतीच्या चविष्ट ० आमटी ० डाळी ० पालेभाजी ० पिठले ० कडधान्यं ० कढी ० सांबार आणि ० गोड खिरी यांचे विविध प्रकार दिले आहेत. सर्व गृहिणींना व नववधूंना या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.
सर्वच दृष्टीने धकाधकी, दगदग असलेल्या आजच्या जीवनात एखादा विनोद चांगलीच करमणूक करून जातो तसेच काल्पनिक विनोद तात्पुरता आनंद निश्चितच देऊन जातात, परंतु आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, पु.ल. देशपांडे, ना.सी. फडके, मामा वरेरकर, ग.दि. माडगूळकर, चि.वि. जोशी, पंडित नेहरू, रवींद्रनाथ टागोर, मार्क ट्वेन, बर्नाड शॉ, चर्चिल, क्रुश्चेव अशा महान प्रतिभावंतांनी प्रत्यक्ष लिखाणातून, भाषणातून, संभाषणातून, वादविवादातून निर्माण केलेले उत्स्फूर्त, समयसूचक, हजरजबाबी व मार्मिक असे हे विनोद करमणूक तर करतीलच, परंतु उच्च कोटीच्या आनंदाची प्रचिती देतील.
चायनीज पदार्थ घरच्याघरी केल्यास घरी खाल्ल्याचे समाधानही मिळेल आणि पैसेही वाचविता येतील; परंतु त्या पदार्थांची चव आणि वैशिष्टय राखणे जमले पाहिजे म्हणूनच हे अगदी निवडक चायनीज पदार्थांचे खास पुस्तक…यात आहेत
० स्टार्टर्स ० ड्राय डिशेस ० मेन डिशेस ० सूप्स ० राइस ० नूडल्स आणि ० व्हेजिटेरिअन पदार्थांच्या पाककृती