पॉल गोगँ एक कलंदर कलाकार

 


नेत्रशल्यविशारद म्हणून पस्तीसहून अधिक वर्ष प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव असलेल्या डॉ. माधवी मेहेंदळे यांना चित्रकलेत विशेष रुची आहे. त्यांनी एस.एन.डी.टी., पुणे येथून 'मास्टर इन फाइन आर्ट्स पेंटिंग' हा दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केला आहे. 'मास्टर इन व्हिजुअल आर्ट्स' हा अभ्यासक्रमही त्यांनी एस.एन.डी.टी. येथून केला आहे. 'सकाळ', 'लोकसत्ता', 'साप्ताहिक सकाळ', 'अंतर्नाद', 'माहेर' आदी दैनिकांमधून आणि मासिकांमधून त्यांनी ललित लेखन केलं आहे. त्यांची 'आरएक्स', 'दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेलअँजेलो'. 'दृष्टीपटल' आणि 'चेकपॉइंट चार्ली' अशी ललित लेखनाची चार पुस्तकं यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकी 'दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेलअँजेलो' या पुस्तकास महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार व 'दृष्टीपटल' या पुस्तकास पुणे नगर वाचन मंदिर यांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

 

मॉडर्न आर्टचा जनक पॉल गोगँ…. एक जगप्रसिद्ध प्रतिभावान कलाकार….. सिम्बॉलिझम, सिंथेटिझम, क्लाइझोजिनम अशा चित्रकलेतील विविध शैली त्याने विकसित केल्या आहेत. चित्रकलेसोबतच त्याने शिल्पकला (Sculpture), काष्ठशिल्प (Woodcraft), सिरॅमिक या माध्यमांतूनही त्याने प्रचंड निर्मिती केली आहे. अनेक समकालीन चित्रकारांमध्ये गोगँने स्वतःची वैशिष्ट्यं राखली आणि एवढंच नव्हे तर, पिकासोसारख्या कलाकारावरही गोगँच्या चित्रकलेचा प्रभाव दिसून येतो.

या पुस्तकात लेखिका डॉ. माधवी मेहेंदळे यांनी गोगँच्या एकंदर कलाप्रवासाचा आणि कलावैशिष्ट्यांचा मागोवा घेतला आहे. त्यातील अनेक पैलू उलगडले आहेत. कलाविश्वातील त्याच्या मुशाफिरीसोबतच पुस्तकात त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, नातेसंबंधांचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि मनस्वी स्वभावाचाही धांडोळा घेतला आहे. ताहिती बेटावरील वास्तव्य हा गोगँच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय… त्याचेही तपशील पुस्तकात सापडतील.

पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे गोगँच्या कलावैशिष्ट्यांची वाचकांना प्रचिती यावी यासाठी पुस्तकात अनेक तपशिलांसह समाविष्ट केलेली रंगीत चित्रं. चित्रकलेच्या इतिहासात ‘माइल स्टोन’ ठरलेल्या कलाकाराचा सर्वांगीण धांडोळा घेणारं पुस्तक पॉल गोगँ : एक कलंदर कलाकार


 

500.00 Add to cart

मी जयुराणा

…माझी ‘मनोहरी’ कहाणी


शब्दांकन :


बापू आणि मालिनी यांची ‘मॅनलीवुमन’ असलेली जयुराणा आणि मनोहर यांची जयु… तिच्या आठवांचा हा जागर ! ‘हजारो फुलं बहरू दे’ हा स्त्री चळवळीचा नारा बुलंद करणाऱ्या जयुराणा म्हणजे एक अजब रसायन आहे. आरामात राम नाही आणि दामही नाही, असं म्हणत त्यांनी केलेल्या कष्टाचा, श्रमाचा गंध या आत्मकथनात दरवळत राहतो. माणसांशी गोडवा टिकवणारी माणुसकी, प्रेम आणि प्रामाणिकपणाला सतत महत्त्व देणारी जगण्याची तत्त्वं समान असणारं सासर-माहेर मिळाल्यामुळे त्यांचं जगणं सुखकर कसं झालं याचा हा आलेख खरोखरच मनोहारी आहे.

वाद, भांडण, भीतीच्या पल्याड जाऊन केवळ प्रेम आणि विश्वास यांवरच आपण जिंकू शकतो, ती प्रेमभावना निरागस ठेवत, समजून घेत निबिड अंधारातही उजेडाची प्रकाशरेषा उमटवू शकतो! ही प्रकाशरेषा म्हणजे अस्सल जगण्याचा स्रोत यावर अपार विश्वास ठेवत त्यांनी अखंडपणे माणसं जोडली. दोन महिन्यांच्या माधुरीचा इवलासा जीव भुर्र उडून गेल्यावरचा काळीज-कल्लोळ आणि आत्मिक पूर्तता झालेला सुधारक पुरुष मनोहर यांचा स्वेच्छा मरणाचा निर्धार ऐकल्यावर झालेला जीवाचा थरकाप त्यांनी धीरोदात्तपणे पेलला. जीवे साहिलेल्या या टोकाच्या मरण वेणांनंतर दुःख-गुंत्यातून स्वतःला पार करत त्या सुखाचा धागा शोधत राहिल्या. माणसं जोडतच राहिल्या. या जयुराणाचा जीवनविषयक व्यापक दृष्टिकोन आत झिरपत सहजपणे त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतोय… माणूसमळा जपला जातोय…
डॉ. गीताली वि.म.


 

200.00 Add to cart

माझा ब्रँड… आज़ादी !

एकाहरियाणवी मुलीच्या आझाद सफरी


हिचा जन्म हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यातल्या खेडी महम या गावात १९८६ मध्ये झाला. इयत्ता बारावीपर्यंत तिचं घरीच अनौपचारिक शिक्षण झालं. वयाच्या पंधराव्या वर्षी तिने बुद्धीबळामधील राष्ट्रीय विजेतेपद मिळवलं. सोळाव्या वर्षी जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर तिने स्पर्धात्मक बुद्धीबळातून निवृत्ती घेतली. दिल्लीतल्या मिरांडा हाउस कॉलेजमधून इंग्रजी विषयात बी.ए. (ऑनर्स) ही पदवी मिळवली. त्यानंतर एल.एल.बी. ही पदवी घेतली. नंतर इंग्रजीत एम. ए. देखील केले. त्या दरम्यान विविध प्रकारच्या कामांच्या माध्यमातून तिचा क्रीडाविश्वाशी संबंध कायम राहिला. सध्या ती लंडनमधली प्रसिद्ध बुद्धीबळ प्रशिक्षक आहे आणि केंब्रिज विद्यापीठासाठी स्वतः बुद्धीबळ खेळतेही. मनाने 'बॅकपॅकर प्रवासी' असलेली अनुराधा तिच्या भटकंतीचं वर्णन 'यायवरी आवारगी' या मालिकेद्वारे वाचकांपर्यंत पोचवणार आहे.

अनुवाद :

पुण्यात जन्म व शिक्षण. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या निवृत्त प्राध्यापक. वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, डिजिटल या सर्व माध्यमांत काम. सहा भाषांतरित पुस्तकं प्रसिद्ध. वृत्तपत्रं व नियतकालिकांतून नियमित लेखन प्रवास आणि आंतरसांस्कृतिक अनुभवांची विशेष आवड.


परंपरांची ओझी वाहणाऱ्या हरयाणा प्रदेशातली एक मुलगी…अनुराधा. एका क्षणी तिचं मन ‘आज़ादी’ मिळवण्याचा अनुभव घेण्यासाठी बंड करून उठतं आणि ती स्वतःतला एकांत सोबत घेऊन बाहेरच्या जगात प्रवासासाठी निघते… हा प्रवास ती करते, ते ज्ञानप्राप्तीसाठी नव्हे की डोक्यात माहितीची खोगीरभरती करण्यासाठी! तिच्या भ्रमंतीमागे कोणताही विशिष्ट उद्देश नाही. बस, आपल्या आतल्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाता जाता मिळतात का, यासाठीचा हा शोध होऊन जातो. या प्रवासादरम्यान आपल्या आत दडलेल्या अनेक ‘स्थळांना’ ती भेट देत जाते. आपली संस्कृती, समाज आणि आध्यात्मिकता याबाबत स्वतःला प्रश्न विचारत राहते. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे “कोणतीही भारतीय मुलगी ‘चांगली शहाणी मुलगी’ ही साचेबंद चौकट तोडू शकेल का?”

प्रश्नांच्या शृंखलेची उत्तरं शोधत आयुष्याचे आनंदी पैलू अनुभवत ती प्रवास करते…. ‘व्यक्तिगत स्पेस’ची अनुभूती घेते, जी या देशात तिने कधी अनुभवली नसते. बाहेरच्या देशांत हे फिरून हे अनुभव उत्सवासारखे ती साजरे करते. तेच हे अनुभव….

तुम्हालाही आपल्या सभोवतालच्या ‘हिपोक्रसी ला सामोरं जाण्यासाठी हे अनुभव बळ देतील आणि मग तुम्हीही म्हणाल…माझा ब्रँड… आज़ादी !



 

295.00 Add to cart

दि रेड हेअर्ड वुमन

 


अनुवाद :

पुणे विद्यापिठाच्या 'संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा'त संस्कृत आणि 'ललित कला केंद्रा'त संस्कृत व आनुषंगिक विषयांचं सरोज देशपांडे यांनी अनेक वर्षं अध्यापन केलं. जिज्ञासू तसेच जाणकार अशा सरमिसळ वाचक-वर्गासाठी 'संस्कृत साहित्यशास्त्राची तोंडओळख' हे त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. अनुवाद करणं हा त्यांचा छंद असून त्यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. ’अशी काळवेळ’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकासाठी त्यांना २०१० साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.


पौंगडावस्थेत असताना लाल केसांची एक आकर्षक बाई सेमचं लक्ष वेधून घेते. आणि मग तो तिच्या विचाराने पुरता झपाटला जातो…. मनातल्या विचारचक्रात तीच आणि तीच! सेमचे वडील तत्पूर्वी गुढरित्या परागंदा झालेले असतात. शिक्षणासाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी सेम इस्तंबूलजवळ विहीर खणणाऱ्या मास्टर महमूत यांच्या हाताखाली काम करत असतो. सेमच्याच एका चुकीमुळे झालेल्या अपघातात महमूत दगावतो का…?

आता कथानक वेगळंच वळण घेतं….

कादंबरीचं कथानक जसजसं पुढे सरकतं, तसतसे नात्यातले गुंते गहन होत जातात. राजा इडिपसची ग्रीक पुराणकथा आणि रुस्तम व सोहराबर पर्शियन पुराणकथा यांची समांतर पातळीवर या गुंत्याशी लेखक सांगड घालत राहतो.

त्यामुळे या कादंबरीला वेगळे आयाम प्राप्त होतात….. वाचकांची उत्कंठा पानागणिक वाढत जाते. पुराणकथांची सांगड घालण्याचं प्रयोजन त्यांचं कुतूहल वाढवत जातं….. कोण होती ती लाल केसांची बाई? महमूतविषयीचं वास्तव काय होतं ? ग्रीक पुराणकथा पेरण्याचं प्रयोजन कोणतं?

नोबल पारितोषिकविजेते लेखक ओरहान पामुक यांची बेस्टसेलर कादंबरी…



 

275.00 Add to cart

मनसमझावन

 


संग्राम गायकवाड भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी. सध्या पुण्यामध्ये आयकर आयुक्त म्हणून कार्यरत. सीओइपीमधून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतल्यानंतर थोड्या कालावधीसाठी स्वयंसेवी संस्थेमध्ये काम. त्यानंतर मुंबई, कोल्हापूर, धारवाड, दावणगेरे येथे आयकर विभागांतर्गत विविध पदावर नेमणूक. कर प्रशासनातील सुधारणा, धोरणनिर्मितीच्या प्रक्रिया, अंमलबजावणीच्या रचनांमधील सुधारणा हे अभ्यासाचे विषय. विविध नियतकालिकं आणि दैनिकांमधून कविता, कथा आणि लेख प्रकाशित. 'सिलेक्टेड एसेज ऑफ डॉक्टर एस. एस. कलबाग या पुस्तकाचं संपादन. 'विज्ञानाश्रम' या विषयावरील डॉक्युमेंटरीच्या निर्मितीमध्ये सहभाग. साहित्य, समाजशास्त्र, इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, भटकंती, पक्षीनिरीक्षण, इत्यादी विषयांची आवड.. 'आटपाट देशातल्या गोष्टी' ही कादंबरी २०१८ साली प्रकाशित. या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा उत्कृष्ट कादंबरीसाठीचा 'दिवदत्त पाटील पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'वा. म. जोशी स्मृती पुरस्कार' आणि महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 'श्री. ना. पेंडसे पुरस्कार' प्राप्त.

या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात.

एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. ती वाचताना उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसतो आहोत, याचं भान वाचकाला येतं.. ‘हिंदू’, ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक, सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’ चा शोध ही कादंबरी घेते. हिंदू-मुस्लिम सहजीवनाची कल्पना मूळच्या सोशिक, उदार, सहिष्णु अशा पारंपरिक लोकधर्माला अनुसरल्याने प्रत्यक्षात येईल की त्यासाठी आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, असा कळीचा प्रश्न लेखकाने या कादंबरीत उपस्थित केला आहे.

डॉ. नीतीन रिंढे


 


375.00 Add to cart

अंक निनाद २०२३

अमेरिकेतून प्रकाशित होणारा पहिलावहिला जागतिक दिवाळी अंक.


‘आंतरराष्ट्रीय कथास्पर्धा’ हे आमच्या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. या कथास्पर्धेसाठी महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्जनशील लेखक कथा पाठवतात. प्रतिभाशाली आणि मान्यवर परीक्षक त्यांमधून छापण्याकरता पहिल्या तीन क्रमांकांसाठी सर्वोत्तम कथा निवडतात.

‘अंक निनाद’ ही लेखनाची आणि वाचनाचीही एक प्रयोगशाळा आहे. साहित्यप्रकार व विषय यांच्यातील वैविध्य हे या अंकाचे बलस्थान! यंदाच्या अंकात वाचा अमेरिकेतील मराठी माणसांच्या वेगळ्या वाटा.

300.00 Add to cart

सॉक्रेटिस कधी मरत नसतो

 


१ नोव्हेंबर १९५४ रोजी भिवनी (हरियाणा) येथे जन्मलेले माधव कौशिक हे हिंदी साहित्यविश्वातील बहुआयामी लेखक म्हणून ख्यातकीर्त आहेत. गझल, कविता, खंडकाव्य, कथा, समीक्षा, अनुवाद, बालसाहित्य, संपादन इत्यादी साहित्यप्रकारांत उल्लेखनीय लेखन, ‘आइने के शहर’, ‘किरण सुबह की’, ‘सपने खुली निगाहो के’, ‘अंगारों पर नंगे पाव’, ‘सारे सपने बागी है’ इत्यादी त्यांचे गझल संग्रह रसिकप्रिय. ‘सबसे मुश्किल मोड पर’, ‘एक अदद सपने की खातीर’ इत्यादी कवितासंग्रह प्रकाशित. ‘सुनो राधिका’, ‘लौट आओ पार्थ’, ‘मौसम खुले विकल्पो का’ इत्यादी खंडकाव्य ‘खिलौने मिट्टी के’, ‘आओ अंबर छू ले’ इत्यादी बाल वाचकांसाठी पुस्तके. इंग्रजी आणि पंजाबीतून काही अनुवाद, हरियाणवी, हिंदी कवितांचे संपादन कार्य. ‘ठीक उसी वक्त’, ‘रोशनवाली खिडकी’ कथासंग्रह… अशी त्यांची हिंदी साहित्यातील ग्रंथसंपदा सांगता येईल. साहित्यविषयक उपक्रमांच्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी परदेशातील जोहान्सबर्ग, शारजा, अबुधाबी, मेक्सिको इत्यादी शहरांना भेटी दिल्या आहेत. सर्वसामान्य मध्यमवर्गाचे जीवन आपल्या लेखनातून चितारतांना त्यातील माणूसपण अधोरेखित करणे, प्राक्कथांचा आधार घेत समकालीन विषयांना मुळापासून घुसळून काढणे, आपल्या अनुभवांच्या मांडणीकरिता विविध आणि चपखल अशा अभिव्यक्तीच्या वाटा शोधणे आणि त्यातून एक कवी, लेखक म्हणून आपले इप्सित उचलून घेणे ही लेखक म्हणून असलेली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण समजली जातात. हरियाणा साहित्य अकादमीचा ‘बालमुकुंद गुप्त सन्मान’, ‘महाकवी सूरदास सन्मान’, पंजाबच्या भाषा विभागाद्वारे दिला जाणारा ‘शिरोमणी हिंदी साहित्य सन्मान’, ‘अखिल बलराज साहनी पुरस्कार’, केंद्रीय हिंदी साहित्य संस्थानचा ‘सुब्रह्मण्य भारती पुरस्कार’, हरियाणा साहित्य अकादमीचा ‘जीवनसाधना पुरस्कार’, प्रयाग येथील हिंदी साहित्य संमेलनाद्वारा ‘साहित्य वाचस्पती सन्मान’ इत्यादी महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. सध्या ते केंद्रीय साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत

भावानुवाद :

मराठी साहित्यक्षेत्रात कथाकार, कादंबरीकार, समीक्षक म्हणून सुपरिचित आजवर जवळजवळ तीस पुस्तकांच लेखन त्यात विशेषतः कादंबरी आणि कथा या प्रांतात अधिक लक्षवेधी लेखन. ‘कोंडी’, ‘उत्तरायण’, ‘पडघम’, ‘अश्वमेध’, ‘होळी’, ‘पांढर’ इत्यादी कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय. ‘वर्तमान’, ‘दाही दिशा’, ‘शहामृग’, ‘तद्भव’, ‘चंद्रोत्सव’, ‘ओल्या पापाचे फुत्कार’, ‘भवताल’ इत्यादी कथासंग्रह ‘महाभारताचा मूल्यवेध’, ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे, सत्त्वाशोधाच्या दिशा’, ‘संदर्भासह’, ‘त्रिमिती’ ही समीक्षणात्मक पुस्तके, ‘गोत्र’ हे व्यक्तिचित्रणं अशी त्यांची काही पुस्तके सांगता येतील. ‘पडघम’, ‘अश्वमेध’ आणि ‘होळी’ ही त्यांची राजकीय, सामाजिक त्रयी म्हणून विशेष उल्लेखनीय. त्यांच्या लेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तीन ‘वाङ्मय पुरस्कारांसह’, ‘लोकमत पुरस्कार’, ‘रणजित देसाई पुरस्कार’, ‘अ. वा. वर्टी पुरस्कार’, ‘आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार”, ‘शांताराम कथा पुरस्कार’, ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार’, ‘यशवंतराव चव्हाण साहित्य आणि संस्कृती प्रतिष्ठानचा पुरस्कार’, ‘महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार’, लाभशेटवार प्रतिष्ठानचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ इत्यादी मानाचे मिळाले आहेत. पुरस्कार सद्यकालीन समाजवास्तवाच्या विविध स्तरांचा सम्यक आणि तटस्थ शोध घेत त्यातील विविध ताणतणावांचा, प्रश्नांचा शोध घेत त्यामागील माणसाच्या वर्तनाचा, त्याच्या अंतर्बाह्य संघर्षाचा आणि त्याच्या भावविश्वाला मुळापासून हादरवून सोडणाऱ्या भवतालाचा आलेख मनःपूर्वकपणे आणि कलात्मक तटस्थाने मांडणे ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. प्राक्कथांचा, आर्ष महाकाव्याचा समकालाशी अन्वय शोधण्याची त्यांची लेखनप्रकृती विशेष उल्लेखनीय अशी आहे. अमळनेर येथे होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शोभणे यांची निवड झाली आहे.


हिंदी साहित्यविश्वातील आणि विशेषतः काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे नाव म्हणून माधव कौशिक यांच्याकडे पाहिलं जातं. गझल, भावकविता, खंडकाव्य इत्यादी काव्यप्रकारांत त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे मानले जाते. जवळ जवळ पंचवीस कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. पौराणिक कथानकांतून समकालीन वास्तवाचे आणि भावभावनांचे चित्रण करण्याचे त्यांचे कसब निश्चितच अव्वल असे आहे. कविता या वाङ्मयप्रकारासोबतच त्यांच्या गद्यलेखनाचा आणि बालसाहित्याचाही विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.

कथाकार म्हणून त्यांनी मोजके लेखन केले असले तरी त्यांच्या कथा या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या आहेत. त्या लघुकथा या प्रकारात मोडणाऱ्या कथा आहेत. जगण्यातील सामान्य घटना, सामान्य माणसांच्या जीवनातील अनवट प्रसंगातून, घटनांतून उभे राहणारे पेचप्रसंग आणि त्यातून जीवन समजून घेण्याचा माधव कौशिकांचा प्रयत्न अधिक आश्वासक आणि अर्थपूर्ण वाटतो.

मराठीतील प्रथितयश कथाकार, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी या कथांचा केलेला मराठी भावानुवाद भाषिक अडसरांना बाजूला सारत मानवी जीवनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालेला आहे.

मराठी वाचकांना वेगळी अनुभूती देणारा कथासंग्रह….



 

240.00 Add to cart

आपत्तीचक्र… बोध किल्लारी भूकंपाचा

किल्लारी भूकंप..
तीस वर्षानंतरचा किल्लारी परिसर
पुनर्वसनाचा ताळेबंद

आपत्तीचक्राचा विळखा


प्रकाशित पुस्तकं 1) 'डळमळले भूमंडळ' 'लॉरी बेकर' 'स्वामीनाथन भूकमुनीचा ध्यास 'बखर 2) पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची' 'विश्वाचे आर्त' 3) “न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात' सफाई कामगारांची सांगितली न गेलेली कथा - 4)लॉरी बेकर टूथ इन आर्किटेक्चर' विवेकींची संगती 5)ग्रेटाची हाक 'तुम्हाला ऐकू येतेय ना?' बोलिले जे... संवाद एलकुंचवारांशी 6)ऐकता दाट पृथ्वीचं आख्यान ग्रंथाचिया द्वारी 7) निसर्गकल्लोळ मानवी अविवेकाचे अंतरंग पुस्तकांचे झालेले अनुवाद १)ग्रेटा कॉलिंग कॅन यु हिअर मी? डॉ. मधुकर देशपांडे : - 2)जो कहें संवाद एलकुंचवार से डॉ. गोरख चोरात 3)एलकुंचवार अवरूनन्दिर्गे संवाद चंद्रकांत पोकळे, पुरस्कार 1) कोलकाता येथील दै. 'स्टेट्समनचा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार 2)'लॉरी बेकर'साठी महाराष्ट्र फाऊंडेशनचा उत्कृष्ट वैचारिक ग्रंथ पुरस्कार 3)दिल्ली येथील प्रेम भाटिया मेमोरियल ट्रस्टचा सर्वोत्तम पर्यावरणीय 4)पत्रकार पुरस्कार 'बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची' 5)महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार 6) 'विश्वाचे आर्त'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार 7)पद्मश्री विठ्ठलराव विखेपाटील समाजप्रबोधन पुरस्कार 8)केसरी मराठा ट्रस्टचा न. चि. केळकर ग्रंथोत्तेजक पुरस्कार संबोधन महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ सदस्यांसमोर 'हवामान बदल, आव्हाने आणि उपाययोजना मार्च २०१८ - पर्यावरण व हवामानविषयक अमेरिका, फ्रान्स, सेनेगल, इंडोनेशिया, बांगला देश पाकिस्तान व नेपाळ आदी जागतिक परिषदांमधील सहभाग

३० सप्टेंबर १९९३ची रात्र किल्लारी आणि परिसरातल्या रहिवाश्यांसाठी काळरात्रच ठरली! भूकंपांच्या हादऱ्यांनी काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं… जगाचं लक्ष वेधलं गेलं… काही तासांत तत्कालीन मुख्यमंत्र्यासह सगळं प्रशासन कामाला लागलं, मदतीचा ओघ सुरू झाला आणि नंतर ‘भव्य’ पुनर्वसनही झालं….

लेखक, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी या भूकंपानंतर झालेलं बचतकार्य, मदतकार्य, पीडितांची अवस्था, त्यांची मानसिकता आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अशा अनेक गोष्टी या पुस्तकात सविस्तर चित्रित केल्या आहेत. तसंच किल्लारी भूकंपाला आता काही वर्षं झाल्यानंतर तिथल्या पुनर्वसनाच्या स्थितीचाही चिकित्सक लेखाजोखा मांडला आहे.

या निमित्ताने देऊळगावकर यांनी आपत्ती ही दैनंदिन घटना झालेल्या आजच्या काळात जोखीम निवारण व उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यासाठी सूत्ररूप सुचवण्या केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक केवळ किल्लारीपुरते मर्यादित राहत नाही, तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाकडे एका व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला लावते.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची निकड अधोरेखित करणारं, डोळ्यांत अंजन घालणारं पुस्तक….

आपत्तीचक्र… बोध किल्लारी भूकंपाचा!



 

430.00 Add to cart

बारीक बारीक आवाज वाढत चाललेत


शिक्षण: बी.कॉम., बी.पी.एड. अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर खेळाडू म्हणून विविध स्पर्धामधून सहभाग वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमात शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम. → 'संचार, सोलापूर 'तरुण भारत' अशा वृत्तपत्रांमधून काम केल्यावर 'अंतर्नाद' मासिकाच्या संपादकीय विभागात सलग १० वर्ष कार्यरत. 'साहित्यसूची' मासिकात सदर लेखन तसंच संपादन. मनोविकास प्रकाशनात संपादक तसेच त्यांच्या 'इत्यादि' या दिवाळी अंकांच संपादन. आकाशवाणीत नैमित्तिक निवेदक, आकाशवाणी, दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमासाठी अनेक विषयांवर लेखन, निवेदन तसेच अनेक मान्यवरांच्या मुलाखती. 'सप्तसूर माझे' या संगीतकार अशोक पत्की यांच्या आत्मचरित्राचं नेहा वैशंपायन यांच्यासह शब्दांकन. वृत्तपत्रं, मासिकं, दिवाळी अंकांतून सातत्याने लेखन वेगवेगळ्या माध्यमांसाठी अनेक मान्यवर लेखकांच्या शंभराहून अधिक मुलाखती. 'ललित'मध्ये दशकातील साहित्यिक या मालेत समकालीन महत्त्वाच्या युवा साहित्यिकांच्या मुलाखतींचे सदर. सध्या 'अक्षरधारा' या दिवाळी वार्षिकाचे संपादन. चित्रकला, संगीताची विशेष आवड.

बारीक बारीक आवाज वाढत चाललेत या स्नेहा अवसरीकर यांच्या पहिल्यावहिल्या कथासंग्रहात माणसामाणसांतल्या नात्यांचे विविध अविष्कार पाहायला मिळतात.

कुठे काका-पुतण्यातल्या पारंपारिक नात्याच्या पलीकडे जाणारं, आपल्या पुतण्याबरोबरचं आत्मीय नातं जपणारे केशवकाका तर कुठे स्वतःच्या एकाकी आयुष्याचं प्रतिबिंब एका कबुतराच्या पिल्लात पाहून त्याच्याशी नातं जोडणाऱ्या वृंदाताई. कधी आपल्या दिवंगत सावत्र सासूचा केवळ फोटो पाहून तिच्याशी नातं जुळवलेली नंदी तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचं भान आल्यावर स्वतःशीच नातं जोडणारी ‘मी’.

नवऱ्याला आलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या मेल्स वाचून हादरून गेलेली एखादी सुभद्रा अखेर कुठलीच नाती संपूर्णपणे आपली असणार नाहीत, हे समजून घेते तर एखादी रश्मी काही नाती निर्घृणपणे तोडावी लागतात, याचं भान ठेवून ईश्वरबरोबरच आपलं नातं मर्यादित अंतरावर राखण्याची शहाणीव दाखवते. एकीकडे युनियनद्वारे संपूर्ण भारतातल्या रेडिओ स्टेशन्सवर काम करणाऱ्या स्टाफशी नातं जोडू पाहणारी राधिका तर दुसरीकडे रेडिओतल्या आपल्या सहकाऱ्याबरोबर निर्माण झालेलं अबोल, अस्फुट नातं मनातच ठेवत त्याच्यापासून दूर होणारी इशा ….

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उमलणाऱ्या आणि मिटणाऱ्या…. अशा या तरल नात्यांच्या कथा वाचकांच्या मनात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांच्या स्मृती जाग्या करतील.

सुबोध जावडेकर



250.00 Add to cart

बहुगुणी मसाले


देशी आणि परदेशी मसाल्यांचा इतिहास विज्ञान व दैनंदिन वापर


डॉ. वर्षा जोशी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी., भौतिकशासत्रात एम.एस्सी. केलं असून, अमेरिकेतील पर्डू विद्यापीठातून एम.एस., शिवाय पुणे विद्यापीठातून एम.फिल आणि पीएच.डी. केलं आहे. डॉ. वर्षा जोशी यांची भौतिकशास्त्र विषयावरची सोळा पुस्तकं आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजीतून सर सी.व्ही. रामन यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं लिहिली आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर व संशोधन कार्यावर आधारित पुस्तकं आणि प्रौढ साक्षरांसाठी पुस्तिकाही मराठीत लिहिली आहे. ‘वाद्यांमधील विज्ञान’, ‘स्वयंपाकघरातील विज्ञान’, ‘सौंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत’, ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’, ‘साठीनंतरचा आहार व आरोग्य’, ‘करामत धाग्या-दोऱ्यांची' अशी त्यांची विज्ञानावर आधारित पुस्तकं प्रकाशित असून त्यांच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.

हळद, लवंग, दालचिनी, मिरी, हिंग…. अशा विविध मसाल्यांविना आपलं खाद्यजीवन (परिणामी सगळं आयुष्यच!) ‘बेचव’ होईल, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही! विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकात आपल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या मसाल्यांचे रासायनिक गुणधर्म, आरोग्याला होणारे फायदे, त्यांचा वापर कसा करायचा याबद्दलची उपयुक्त माहिती अभ्यासपूर्ण आणि रंजकरीत्या सांगितली आहे. तसंच आपल्या खाद्यसंस्कृतीत अलीकडे ‘मिसळून गेलेल्या’ परदेशी हर्ब्सचाही आढावा घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक ‘मसालेदार’ तर आहेच,

पण ते आपल्या मनात मसाल्यांच्या वापराबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनही जागवतं. भारतीय पाकसंस्कृतीचा ‘प्राण’ असलेल्या मसाल्यांची ‘ऑथेंटिक’ माहिती देणारं पुस्तक….बहुगुणी मसाले!



 

225.00 Add to cart

गोल्पे विभोर

विश्वाच्या उत्पत्तीच्या रंजक इतिहासापासून भविष्यात विश्व कसं असेल इथपर्यंत


बाणी बसू याचा जन्म ११ मार्च १९३९ रोजी झाला. प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, अनुवादिका, समीक्षक, बालसाहित्यिक आणि प्राध्यापिका म्हणून त्या बंगालमध्ये ओळखल्या जातात. ‘आनंदमेला' आणि 'देश' या नियतकालिकांमधून त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. त्यांच्या अनेक कथा व कादंबऱ्यांवर चित्रपट व टीव्ही सिरिअल्स बनवल्या गेल्या आहेत. त्यांना ‘ताराशंकर अवॉर्ड’, ‘आनंद पुरस्कार', 'सुशीलादेवी बिर्ला पुरस्कार', ‘साहित्य सेतू' आणि ‘साहित्य अकादमी' असे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

अनुवाद :

सुमती जोशी यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४९चा. त्यांचं वास्तव्य मुंबई येथे आहे. दादरच्या आय.इ.एस. मुलींच्या शाळेतून त्या प्रथम क्रमांकाने एस.एस्सी. उत्तीर्ण झाल्या. त्यांनी मायक्रोबायॉलॉजी या विषयात मुंबई विद्यापीठातून बी. एससी. केलं आहे. एन.टी.एस. च्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र या विषयाचं गेली एकवीस वर्षं अध्यापन करत आहेत. वयाच्या अठ्ठावनाव्या वर्षी त्यांनी बंगाली भाषा शिकायला सुरुवात केली. दर वर्षी एक याप्रमाणे आद्य, मध्य आणि अंत्य या तीन परीक्षा विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्या. शेवटच्या परीक्षेत म्हणजे वयाच्या साठीत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. २०१० सालापासून त्यांनी बंगाली साहित्याचा अनुवाद करण्यास सुरुवात केली. आधुनिक बंगाली साहित्यातले गेल्या अर्धशतकातले उत्तम लेखक आणि त्यांच्या कलाकृतींचा आनंद मराठी वाचकांना घेता यावा हा त्यांचा अनुवाद करण्यामागील उद्देश आहे. आजपर्यंत त्यांनी अनुवादित केलेले अनेक कथा संग्रह, कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. 'उत्क्रांती' या पुस्तकासाठी त्यांना विज्ञान विभागातला राज्य पुरस्कारही (२०१०) प्राप्त झाला आहे.


बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर



 

275.00 Add to cart

गल्पेर बागान

विश्वाच्या उत्पत्तीच्या रंजक इतिहासापासून भविष्यात विश्व कसं असेल इथपर्यंत


बाणी बसू याचा जन्म ११ मार्च १९३९ रोजी झाला. प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, अनुवादिका, समीक्षक, बालसाहित्यिक आणि प्राध्यापिका म्हणून त्या बंगालमध्ये ओळखल्या जातात. ‘आनंदमेला' आणि 'देश' या नियतकालिकांमधून त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. त्यांच्या अनेक कथा व कादंबऱ्यांवर चित्रपट व टीव्ही सिरिअल्स बनवल्या गेल्या आहेत. त्यांना ‘ताराशंकर अवॉर्ड’, ‘आनंद पुरस्कार', 'सुशीलादेवी बिर्ला पुरस्कार', ‘साहित्य सेतू' आणि ‘साहित्य अकादमी' असे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

अनुवाद :

सुमती जोशी यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४९चा. त्यांचं वास्तव्य मुंबई येथे आहे. दादरच्या आय.इ.एस. मुलींच्या शाळेतून त्या प्रथम क्रमांकाने एस.एस्सी. उत्तीर्ण झाल्या. त्यांनी मायक्रोबायॉलॉजी या विषयात मुंबई विद्यापीठातून बी. एससी. केलं आहे. एन.टी.एस. च्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र या विषयाचं गेली एकवीस वर्षं अध्यापन करत आहेत. वयाच्या अठ्ठावनाव्या वर्षी त्यांनी बंगाली भाषा शिकायला सुरुवात केली. दर वर्षी एक याप्रमाणे आद्य, मध्य आणि अंत्य या तीन परीक्षा विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्या. शेवटच्या परीक्षेत म्हणजे वयाच्या साठीत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. २०१० सालापासून त्यांनी बंगाली साहित्याचा अनुवाद करण्यास सुरुवात केली. आधुनिक बंगाली साहित्यातले गेल्या अर्धशतकातले उत्तम लेखक आणि त्यांच्या कलाकृतींचा आनंद मराठी वाचकांना घेता यावा हा त्यांचा अनुवाद करण्यामागील उद्देश आहे. आजपर्यंत त्यांनी अनुवादित केलेले अनेक कथा संग्रह, कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. 'उत्क्रांती' या पुस्तकासाठी त्यांना विज्ञान विभागातला राज्य पुरस्कारही (२०१०) प्राप्त झाला आहे.


बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर



 

275.00 Add to cart
1 2 51