371 | 978-93-86493-56-9 | Sulkata | सूळकाटा | L.S. Jadhav | ल.सि. जाधव | प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात. या आत्मकथनाचा गाभा प्रामुख्याने त्रिस्तरीय आहे. पहिला स्तर हा मातंग समाजाची दुःखं, त्यांना सोसावे लागणारे चटके आणि त्याबद्दल लेखकाला असलेली कळकळ याबद्दलचा आहे. दुसरा स्तर हा लेखकाचा तरुण मुलगा अकाली गेल्याने घनव्याकूळ करणाऱ्या दुःखाचा आहे. तर, लेखनाची निर्मितीप्रक्रिया आणि घरात तसेच समाजात लेखकाचं असलेलं स्थान याबद्दल केलेलं परखड भाष्य हा तिसरा आणि महत्त्वाचा स्तर… हे संपूर्ण आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक व त्याच वेळी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दुःख व्यक्त करत राहतं. ते केवळ दुःख व्यक्त करून थांबत नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन, या सगळ्याकडे उदार दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच वेगळ्या उंचीवर पोचतं. सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा, जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारा… सूळकाटा ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 194 | 21.6 | 14 | 1.3 | 230 | समाजरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Social | सामाजिक | 250 | Sulkatacover | SulkatacoverBC.jpg |
कारेनामा
[taxonomy_list name=”product_author” include=”1728″]
औषधं आपल्या सर्वांनाच कधी ना कधी घ्यावी लागतात. पण औषधं तयार होण्यामागचा खटाटोप आपल्याला माहीत नसतो. सुरेश कारे हे इंडोको रेमेडीज या औषध कंपनीचे प्रमुख. लहानपणापासून घरात औषधांच्या आसपासच ते वाढले. ‘‘आमच्या औषधांमुळे लोकांना बरं वाटू दे’’, अशी प्रार्थना करत लहानाचा मोठा झालेला सुरेश कारे नावाचा मुलगा आज इंडोको या पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीचा प्रमुख आहे. इंडोको ही भारतातली एक अग्रगण्य औषध कंपनी बनली ती वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सुरेश कारे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे आणि कल्पकतेमुळे. सुरेश कारे यांच्या स्वयंस्फूर्त कर्तृत्वाचा आलेख रसिल्या शब्दांमध्ये मांडणारं ‘कारेनामा’ हे पुस्तक उद्योजकता व कल्पकता यांच्या जोरावर भरारी घेणार्या एका माणसाची कहाणी सांगतं. गोव्याच्या प्रसन्न आणि निर्मळ संस्कृतीचा वारसा घेऊन आलेल्या सुरेश कारे यांच्या जडणघडणीचा हा प्रवास वाचकांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.
Reviews
There are no reviews yet.