307 | 978-81-932336-9-6 | Sukhane Jaganyasathi | सुखाने जगण्यासाठी | सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन | Dr. Vijaya Phadnis | डॉ. विजया फडणीस | आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव, धावपळ आणि घाईगडबडही कधी नव्हे इतकी वाढली आहे. अशावेळी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीचं नीट आकलन करून त्यातून मार्ग काढणारेच यशस्वी आणि पर्यायाने सुखी होतात. मात्र त्यासाठी आवश्यक असतं – निरोगी मन:स्वास्थ्य आणि मनोनियंत्रण ! हे जाणूनच विख्यात मानसतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहात आपलं मन निरोगी राखण्याचे मौलिक मंत्र उदाहरणांसह सांगितले आहेत. तसंच विचार आणि भावना यांवर नियंत्रण ठेवून आपली वर्तणूक कशी ठेवावी याबद्दल अत्यंत मौलिक अशा सूचना केल्या आहेत, तर काही ठिकाणी त्यासाठी आवश्यक अशा युक्त्या-कॢप्त्याही सांगितल्या आहेत. त्यांनी या लेखांमधून मानसशास्त्रीय संकल्पना अत्यंत सोप्या शब्दांत समजावून सांगितल्यामुळे वाचकांना आगळी अंतर्दृष्टीही मिळते. स्वभावातीत त्रासदायक गोष्टी टाळून स्वविकास साधण्यासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयुक्त असा लेखसंग्रह… सुखाने जगण्यासाठी ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 160 | 21.6 | 14 | 0.8 | 180 |
Renowned psychologist counselor Dr. Vijaya Phadnis tells us how to keep our mind healthy and how to maintain the inner peace in today’s stressful and fast lifestyle. She guides us on how to control the negativity in our behavior in order to achieve self-development and change our view towards life.
|
Psychology | मन:स्वास्थ्य | 175 | Sukhane_jaganyasathi | sukhane_jaganyasathiBC.jpg |
हॅपी लग्न.कॉम – १
सहजीवनाची सुरुवात फुलवण्यासाठी…
[taxonomy_list name=”product_author” include=”486″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”494″]
लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी निकोप सहजीवनाकडे वाटचाल होणं म्हणजेच खर्या अर्थाने लग्न यशस्वी होणं, असा कानमंत्र क्वचितच मिळतो. आणि मग बरेच जण ‘पदरी पडलं अन् पवित्र झालं’ म्हणत लग्न रेटत तरी राहतात किंवा मागचा-पुढचा विचार न करता ‘काडीमोड’ तरी करतात.
प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ विजय नागास्वामी यांनी या पुस्तकात लग्न यशस्वी होण्यासाठी लग्नाआधीपासूनच त्याचा पाया भक्कम कसा करावा, सहजीवन कसं ‘फुलवत’ न्यावं, हे सहजसोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. गेल्या काही वर्षांत, स्त्री-पुरुष यांचे संसारातले ‘रोल्स’ बदलल्याने नातेसंबंधांवर झालेल्या परिणामांचाही यात विचार केला आहे. पुस्तकात नागास्वामी यांनी पुढील विषय उदाहरणांसह स्पष्ट केले आहेत :
जोडीदाराची निवड
लग्नाचं बदलतं स्वरूप
व्यक्तिगत स्पेस व मॅरेज स्पेस
भावनिक व लैंगिक नात्यांचा विकास
एकमेकांच्या कुटुंबांशी असलेले नातेसंबंध
करिअर व कुटुंबाचा समतोल इत्यादी…
लग्न झालेल्या किंवा होऊ घातलेल्या अन् सुखी सहजीवनाच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त; आणि हो, भेट देण्यासाठी उत्तम!
Reviews
There are no reviews yet.