337 | 978-93-86493-17-0 | Shouryagatha | शौऱ्यगाथा | युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम गाजवणार्या वीरांच्या शौर्यगाथा | Major Gen. Shubhi Sood | मेजर जन. शुभी सूद | Bhagwan Datar | भगवान दातार | या कथा आहेत वीर जवानांच्या…या कथा आहेत त्यांच्या धाडसाच्या, निश्चयाच्या, जिद्दीच्या आणि वचनपूर्तीच्या ! सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी ! या पुस्तकातल्या कथा `सैनिक नावाचं रसायन’ कोणत्या मुशीतून घडतं, याची झलक तर आपल्याला देतातच पण त्याचबरोबर निश्चय आणि कटिबद्धता यांची प्रेरक कहाणीसुद्धा सांगतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेच्या बाजूने लढलेली युद्ध असोत किंवा स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान आणि चीनबरोबर आमने-सामने लढलेली युद्ध असोत… त्याचप्रमाणे प्रचंड उंचीवर लढलेलं कारगील युद्ध असो किंवा शांतता काळातले संघर्ष असोत… प्रत्येक लढाईत, प्रत्येक प्रसंगी वीरजवान जीवावर उदार होऊन लढल्यामुळेच भारताची सुरक्षा अबाधित राहिली. या सर्व युद्धांत दाखवलेल्या असामान्य शौर्यासाठी अनेक लष्करी अधिकारी व जवानांना आजवर विविध सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यापैकी काही वीरांच्या शौर्याची, त्यांच्या नेमक्या कर्तृत्वाची ओळख या पुस्तकात तपशीलांसह व रोचकपणे करून दिली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, या आहेत असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य दाखवणार्या वीरांच्या शौर्यगाथा ! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 184 | 21.5 | 13.9 | 0.9 | 200 |
Shauryugatha is not just a collection of the stories of war. It depicts bravery, presence of mind, meticulous planning and the perfect implementation of the same. War is not fought only physically, it always involves a much more courage and mental strength. The stories in the books tells us a lot about many wars faought by India from pre-independance era to Kargil war, which was fought in 1999. The soldiers of India always remained steadfastly motivated to the right of duty and action alone. These are the stories of their bravery, sacrifice and committment.
|
Informative | माहितीपर | 200 | Shouryagatha | ShauryagathaBC.jpg |
शिष्टाईचे इंद्रधनू
डिप्लोमॅटिक’ विश्वातील रंगतरंग
[taxonomy_list name=”product_author” include=”487″]
शिष्टाईचं अर्थात डिप्लोमसीचं विश्व म्हणजे जणू सप्तरंगी इंद्रधनूच.
या विश्वाचे रंग, ढंग आणि विविध पैलू चार दशकांहून अधिक काळ दिल्लीत वास्तव्य असलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर आणले आहेत.
या पुस्तकात जसा टागोर व मुसोलिनी यांच्या भेटीचा रोचक वृत्तान्त आहे, तसंच औपचारिक प्रसंगी किंवा वाटाघाटी होताना गमतीशीर घटना कशा घडतात याचं खुमासदार शैलीत कथन आहे. अफगाणिस्तानसारख्या देशांत धोके पत्करून परदेश सेवेतील अधिकाऱ्यांना गंभीर प्रसंगांना कसं तोंड द्यावं लागतं, याबद्दलचं विवेचन जसं आहे, तसंच जॉर्ज बुश आणि व्लादिमीर पुतिन या दोन नेत्यांमधल्या कडू-गोड संबंधांचं वर्णनही आहे.
डिप्लोमॅटिक वर्तुळात दीर्घकाळ वावरणाऱ्या एका मुरब्बी पत्रकाराने आपल्यासमोर धरलेला शिष्टाईच्या विश्वाचा कॅलिडोस्कोप म्हणजेच…शिष्टाईचे इंद्रधनू !
Reviews
There are no reviews yet.