ओळख
₹295.00
लेखक : सानिया
अतीव आत्मनिष्ठा अबाधित राखून गेली पाच दशके सानिया यांनी मराठी साहित्याच्या परंपरेत आपले लक्षणीय स्थान निर्माण केले आहे.
अर्थपूर्ण जगण्याच्या कितीतरी वाटा कळत-नकळत दाखवणारे त्यांचे सर्वच लेखन वाचकाची स्वतःविषयी व भोवतालच्या जगाविषयीची समजूत प्रगल्म करणारे आहे. आपल्या वयाच्या व जाणिवेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते वाचनीयच नव्हे तर विचारांना चालना देणारे व अंतर्मुख करणारे ठरते. कदाचित म्हणूनच ‘ओळख’चे आज ३०-३२ वर्षानंतर होणारे पुनर्मुद्रण व त्यातील कथांचे पुनर्वाचन आजही प्रस्तुत ठरते.
जगण्याला बंदिस्त करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या चौकटी शक्य तितक्या नेटाने व निकराने शिथिल करून, जरूर तर त्यांना खिडारे पाडून लेखिका विशेषतः स्त्रियांच्या स्व-तंत्र अस्तित्वाची प्रतिष्ठाच नव्हे तर श्रेयपूर्णता अधोरेखित करते. या कथांमधील नानाविध प्रश्नचिन्हांकीत प्रसंगांनी व त्यातील मूल्यसंघर्षाने कथांतर्गत व्यक्तीच नव्हे तर वाचकदेखील संभ्रमित होतो. किंबहुना ही संदिग्धता व अनाकलनीयता, रूढ तर्काला बगल देणारे पण आंतरिक सुसंगती असलेले निर्णय हे या कथांचे एक मोठे बलस्थान आहे.
परिणामी आपली ‘ओळख’ नव्याने पटविणाऱ्या आणि कलात्मकता व कौशल्यपूर्णता, समकालीनता, सार्वकालीनता आणि विशिष्टता व व्यापकता यांची प्रभावी प्रचीती देणाऱ्या प्रस्तुत कथासंग्रहाची पुनर्भेट संस्मरणीय ठरते, यात शंका नाही.
रेखा इनामदार-साने
















Reviews
There are no reviews yet.