82 | Gharguti Aushodhopchar | घरगुती औषधोपचार | Premalata Paralikar | प्रेमलता परळीकर | दूरदर्शनवर प्रेमलता परळीकर यांच्या ‘घरगुती दवाखाना’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या संग्रहाचा, अभ्यासाचा तसेच अनुभवाचा सर्वांना लाभ व्हावा याच दृष्टीने विस्ताराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे ‘घरगुती औषधोपचार’! सर्दी खोकला होणे, नाक गळणे, डोळे येणे, कफ होणे, पोटात दुखणे असे किती तरी विकार वेगवेगळया ॠतूत होतच असतात. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायला वेळही नसतो. म्हणूनच घरातल्या घरात जेवढी औषधे तयार करून घेता येतील, तेवढी आपली आपणच तयार करून घेणे जास्त हितावह आहे. शिवाय स्वयंपाकघरात असणार्या, रोजच्या स्वयंपाकासाठी लागणार्या पदार्थांचा उपयोग करून आपल्याला वरील विकारांवर औषधे तयार करता येतील. उदाहरणार्थ लसूण, जायफळ, लवंग, वेलची, हळद, मध, हिंग, काळया मनुका असे नानाविध पदार्थ थोडक्यात हे पुस्तक म्हणजे एक घरगुती दवाखानाच आहे हे ध्यानी घ्या. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 72 | 21.6 | 14 | 0.4 | 100 | Home remedies | Health | आरोग्य | 65 | Gharguti Aushodhopchar.jpg | gharguti aushdhopacharBC.jpg |
बहुगुणी वनौषधी
[taxonomy_list name=”product_author” include=”394″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]
अनेक वनस्पतींमध्ये (Herbs) विविध औषधी गुणधर्म असतात, शरीराची झीज भरून काढण्याची क्षमता असते. तसेच बर्याचशा आधुनिक औषधांचा मूलस्रोत वनस्पतींमध्ये असतो, हे सर्वचजण जाणतात. परंतु त्याची शास्त्रशुध्द मांडणी करणे व जनसामान्यांना
नेमकी माहिती देणे, हे कार्य निष्णात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू सातत्याने करीत आहेत. अनेक व्याधींवर वनौषधी गुणकारी कशा ठरू शकतात याबद्दलची माहिती बाखरू यांनी या पुस्तकात दिली आहे. या वनौषधी सहजपणे उपलब्ध होतात आणि काही तर आपल्या स्वयंपाकघरातच असतात. एकूण शंभरच्यावर उपयुक्त वनौषधींची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. विविध वनस्पतींचे गुणधर्म, त्यांची शास्त्रीय माहिती, झीज भरून काढण्याची त्यांची क्षमता, या वनस्पतींची मात्रा कोणकोणत्या व्याधींवर चालू शकते; याविषयीचे विस्तृत विवेचन या पुस्तकात उपलब्ध होते. उत्तम आरोग्य राखण्यासाठी वनौषधींद्वारे नैसर्गिक उपाय सुचवणारे हे पुस्तक घराघरात पोहोचावे ही अपेक्षा.
Reviews
There are no reviews yet.