प्रेमलता परळीकर

प्रेमलता परळीकर यांनी मुंबई विद्यापीठाची एम ए ही पदवी संपादन केली असून शिक्षणक्षेत्रात त्यांनी अनेक प्रकारे नावलौकिक मिळवला आहे.
शिक्षिका म्हणून त्यांना १९८५ सालचे 'मेअर अवॉर्ड' मिळाले दूरदर्शन वर त्यांनी सादर केलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 'घरगुती दवाखाना' या कार्यक्रमाला सर्व प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच त्यांनी 'घरगुती औषधउपचार' हे पुस्तक लिहिले.

लेखकाची पुस्तकं

घरगुती औषधोपचार


प्रेमलता परळीकर


दूरदर्शनवर प्रेमलता परळीकर यांच्या ‘घरगुती दवाखाना’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या संग्रहाचा, अभ्यासाचा तसेच अनुभवाचा सर्वांना लाभ व्हावा याच दृष्टीने विस्ताराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे ‘घरगुती औषधोपचार’!
सर्दी खोकला होणे, नाक गळणे, डोळे येणे, कफ होणे, पोटात दुखणे असे किती तरी विकार वेगवेगळया ॠतूत होतच असतात. प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायला वेळही नसतो. म्हणूनच घरातल्या घरात जेवढी औषधे तयार करून घेता येतील, तेवढी आपली आपणच तयार करून घेणे जास्त हितावह आहे. शिवाय स्वयंपाकघरात असणार्‍या, रोजच्या स्वयंपाकासाठी लागणार्‍या पदार्थांचा उपयोग करून आपल्याला वरील विकारांवर औषधे तयार करता येतील. उदाहरणार्थ लसूण, जायफळ, लवंग, वेलची, हळद, मध, हिंग, काळया मनुका असे नानाविध पदार्थ थोडक्यात हे पुस्तक म्हणजे एक घरगुती दवाखानाच आहे हे ध्यानी घ्या.


Original price was: ₹100.00.Current price is: ₹60.00. Add to cart