

आकाश झेप… तरीही पाय जमिनीवर
₹250.00
लेखिका : उषा पुरोहित
एअरफोर्स ऑफिसरसोबतच्या माझ्या ६४ वर्षांच्या अर्थपूर्ण सहजीवनाची गोष्ट
पुरोहित दाम्पत्याशी माझी पहिली भेट झाली तेव्हा उषाताई पाककलानिपुण आणि पाककलेवर लेखन करणाऱ्या गृहिणी होत्या तर, उत्तमराव हे एअर व्हाइस मार्शल अर्थात भारतीय हवाईदलाचे उच्चाधिकारी (निवृत्त) होते. हरहुन्नरी उषाताईंना मी भेटत होतो ते त्यांच्या नव्या पाककृती पुस्तकांसाठी. पण उत्तमरावांच्या उमद्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याशी पहिल्या भेटीतच स्नेह जुळला, तो अगदी अखेरपर्यंत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका बाजूला ‘एअरफोर्स ऑफीसर’चा करारीपणा होता तर, दुसऱ्या बाजूला अविश्वसनीय असा अंगभूत साधेपणा होता. एका एअर व्हाइस ‘मार्शल’ने घरचं ‘मार्शल’ पद पत्नी उषा हिला दिल्याचं पदोपदी जाणवत होतं.
लष्करातील उच्चाधिकाऱ्यांचं आयुष्य सुख-सोयींनी संपृक्त असतं, असा एक सर्वसाधारण समज असतो. परंतु त्यांच्या कुंटुंबाला प्रत्यक्षात अनेक ताण-तणाव पेलावे लागतात, आव्हानात्मक प्रसंगाना सामोरं जावं लागतं… त्याचीच झलक या रोचक अशा अनुभवकथनात दिसते. सोबत त्यांच्या अर्थपूर्ण, समृद्ध सहजीवनाचे अनेक कंगोरेही दिसून येतात… आणि तेही खुद्द उषाताईंच्या शब्दांत !
प्रदीप चंपानेरकर, प्रकाशक
Reviews
There are no reviews yet.