माणसांच्या गोष्टी

 


डॉ. छाया महाजन


माणसांच्या गोष्टी

आपल्या अवतीभवती अनेक अनेक ढंगांची, अनेक वृत्ती-प्रवृत्तींची माणसं वावरत असतात. आयुष्याच्या लढाईत आपापल्या परीने सामोरे जाणारे हे चेहेरे, काही हरून गेलेले, काही पिचलेले, काही उमदे, काही नियतीशी तडजोड करणारे, तर काही लढायला उभे ठाकलेले… असे विविध चेहेरे या कथासंग्रहात आपल्याला भेटत राहतात.

डॉ. छाया महाजन यांनी हे चेहरे विविध प्रसंगांतून, निवेदनातून आणि पात्रांमधून साकारले आहेत. रजनी, आसावरी, अमांडा, वसुधा, वच्छी अशा व्यक्तिरेखांमधून मानवी स्वभावाचे कंगोरे, त्याची जीवनावरची आसक्ती आणि नात्यांच्या गहियऱ्या छटा या कथासंग्रहात लेखिका सशक्तपणे रेखाटते.

मानवी नात्यांची वीण उलगडून दाखवणाऱ्या पंधरा कथा… माणसांच्या गोष्टी.


200.00 Add to cart

मोसाद मिशन्स

आशिष काळकर


काटेकोर नियोजन, चतुर, चौकस व देशाशी एकनिष्ठ असलेली हेरयंत्रणा आणि धूर्त, चलाख नेतृत्व यांच्या जोरावर ‘मोसाद’ने तिच्या निर्मितीपासून अशक्य वाटणाऱ्या अनेक मोहिमा तडीस नेल्या. या पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आशिष काळकर यांनी मोसादच्या अशा काही निवडक नाट्यमय मोहिमांचं अथपासून इतिपर्यंत विस्तृत गोष्टीरूप कथन केलं आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मोसादच्या यशस्वी मोहिमांबरोबरच, अयशस्वी मोहिमांचाही आढावा घेतला आहे. याशिवाय इस्त्रायल देशाची स्थापना, मोसादची निर्मिती, तिची गरज अशी पार्श्वभूमीही सांगितली आहे. त्यामुळे मोसादची यंत्रणा कशी काम करते, हे समजून घेण्यास मदत होते. पुस्तकात शेवटी, काळकर यांनी इस्त्रायल-हमास संघर्षाचा इतिहास थोडक्यात सांगून २०२३च्या इस्त्रायल-हमास युद्धामध्ये मोसादने निभावलेली भूमिका विशद केली आहे जगातल्या भल्या भल्या देशांना धडकी भरवणाऱ्या आणि काही वाट्टेल ते झालं तरी हाती घेतलेलं काम पार पाडणाऱ्या एका गुप्तचर यंत्रणेच्या कहाण्या… मोसाद मिशन्स !

240.00 Add to cart

योगोपचार

योगमहती अधोरेखित करत विविध आरोग्यसमस्या निवारणासाठी उपयुक्त मार्गदर्शन


शब्दांकन : गीता अय्यंगार


योग म्हणजे जीवन जगण्याची कला. योगाची अनेक रुपं व पैलू आपल्या जीवनाला समृद्ध करतात. त्यात जगण्यातली सहजता, मोकळेपणा, आल्हाददायकता, सचोटी आणि मनोविकास या पैलूंचा समावेश तर आहेच, परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाचा पैलू योगाबरोबर जोडला गेला आहे, तो म्हणजे आरोग्य!

वयानुसार उद्भवणारे शारीरिक, मानसिक विकार आणि जन्मतःच असणारे दोष, अशा दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. खरं म्हटलं तर योग ही जणू नैसर्गिक देणगीच मानवजातीला लाभलेली आहे. या दृष्टिकोनातून योगमहती सांगता सांगता लेखकाने…

■ लहानपणापासूनच स्वतःला घडवण्याचं तंत्र

■ प्रौढवयात येणारं अग्निमांद्य

■ उच्च रक्तदाब

■ मधुमेह

■ उतारवयात येणारे हृदयरोग

■ त्वचेचे विकार

■ स्त्रियांच्या आरोग्यसमस्या

… अशा अनेक आरोग्यसमस्यांवर प्रचलित योगासनांचे उपचार या पुस्तकात सुचवले आहेत. त्याचबरोबर दैनंदिन वापरातील काही साधनांचा उपयोग करून अथवा आधार घेऊन योग करण्याची क्रिया आणि कृतीही दिल्याने शारीरिक मर्यादा असणाऱ्यांनाही हे योगोपचार अतिशय सुलभतेने आणि उत्तमरीत्या साधता येतील. योगाला आयुष्य वाहिलेल्या योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी मराठी माणसाच्या सोयीसाठी मराठीत साकारलेलं पुस्तक… योगोपचार !


500.00 Add to cart

रुह

लेखक : मानव कौल
अनुवाद : नीता कुलकर्णी


काश्मिरी लोकांच्या आत्म्याला झालेल्या जखमांची हळवी कथा


माझी नजर तिथे खिळून आहे… जिथून तुझा परिमळ दरवळतो आहे… जिथून तू दिलेली हाक मला साद घालते आहे त्याच त्या सफेद भिंतीतल्या निळ्या दरवाजाकडे !


 

295.00 Add to cart

वशाट आणि इतर कथा

सुहास बारटक्के


आपल्या रोजच्या आयुष्यात भावनांचं खमंग मसालेदार मिश्रण असतं… एखादा दिवस रागाचा असतो तर एखादा छानश्या हास्याचा, एखादा नुसताच आठवणींचा आणि एखादा अनाकलनीय भितींचा… या सगळ्या मिश्रभावना आपलं जीवन विविधरंगी बनवत असतात. अशा विविध भावनांची खमंग फोडणी असलेला खुसखुशीत कथासंग्रह सुहास बारटक्के खास वाचकांसाठी घेऊन आले आहेत. यातल्या काही कथा मनसोक्त हसवतात, काही विचारप्रवृत्त करतात, काही कथा वाचून पाठीच्या कण्यातून भीतीची शिरशिरी दौडत जाते, तर काही व्यक्तिरेखात्मक लेख अनोख्या व्यक्तिंशी, प्रसंगांशी भेट घडवून देतात. बारटक्के यांना अनेक वर्षांचा अध्यापनाचा, पत्रकारितेचा आणि लेखनाचा अनुभव आहे. त्यांच्या लेखनातून हे अनुभव समर्थपणे डोकावताना दिसतात.

‘चिनी कम’, ‘नोटबंदीचा दणका’सारख्या नर्मविनोदी कथा मनाला गुदगुल्या करत हसवतात, तर ‘उपाध्येंचा अहंकार’, ‘खिचडी’ आणि ‘वशाट’ सारखी शीर्षक कथा मनाला खोल स्पर्शन जातात. या कथांमुळे वाचकाला वेगळी अनुभूती मिळत जाते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या विविध ढंगांच्या कथांचा संग्रह…

वशाट आणि इतर कथा

150.00 Add to cart

वार्तांच्या झाल्या कथा

राजीव साबडे


मुद्रित माध्यमांचा पूर्ण दबदबा असतानाच्या काळात ३४ वर्षे पत्रकारिता केलेल्या राजीव सावडे यांनी स्थानिक विषयांपासून जागतिक स्तरापर्यंत अनेक घटना, घडामोडींचं प्रत्यक्षदर्शी वार्तांकन केलं. अनेक मोठ्या राजकारणी नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. देश हादरवणाऱ्या अनेक घटना, प्रसंगांचे भीषण परिणाम त्यांनी पाहिले, अनुभवले आणि वार्ताकित केले. पूर्वी केलेल्या आपल्या या वातकिनाच्या संदर्भाना ललित लिखाणाची जोड देऊन त्यांनी केलेल्या लेखांच्या मांडणीमुळे वाचताना ते प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात; मग ते पुण्यात घडलेलं जोशी-अभ्यंकर हत्याकांड असो, राजीव गांधींची हत्या असो, दिल्लीमधील शिखांचं हत्याकांड असो की पोलंडमधील औशवित्झच्या छळ छावणीची भेट असो… साबडे ही सर्व वर्णनं इतकी जिवंत करतात की, काही काळापूर्वी वर्तमानपत्रात वाचलेली ती बातमी आता कथेसमान वाटू लागते. पुस्तकातील इतर लेख जसं की, पुण्याच्या विकासामधील बावाजींचं योगदान, टेल्को आणि पुण्याचं घनिष्ठ नातं, सोनेरी काळ अनुभवलेला रजनीश आश्रम आणि त्याची उत्तरती कळा, अटल बिहारी वाजपेयींसोबत अनुभवलेले मौलिक क्षण असे सर्वच लेख मनाला स्पर्शन जातात आणि तो काळ डोळ्यासमोर उभा करतात. ‘सत्य-असत्याशी मन केले ग्राही, मानियले नाही बहुमता’ या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे या लेखनात त्यांनी अनेकांना न रुचणारं आपलं कर्तव्यकठोर मतप्रदर्शनही केलं आहे. या ‘कथा’ एकमेकांपासून वेगळ्या असल्या तरी त्यातील समान सूत्र चिकित्सक पत्रकाराच्या वेधक दृष्टीचं आहे. अनेकांगी वार्ताकनातून निर्माण झालेल्या गोष्टीरूपी बातम्या अर्थात… वार्तांच्या झाल्या कथा!

495.00 Add to cart

विश्व अलंकाराचं

वैज्ञानिक माहिती व रंजक ज्ञान


डॉ. वर्षा जोशी


विश्व अलंकारांचं

सजण्याची-नटण्याची मानवाची आकांक्षा नैसर्गिक आणि मूलभूत आहे. त्यासाठी विविध धातू, रत्न, शंख-शिंपले आदींचा वापर करून अलंकार तयार करण्याची परंपरा आदिम काळापासून सुरू आहे.

या पुस्तकात या अलंकरांची, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंची, तसंच हिरे-रत्न इत्यादींची ‘ऑथेंटिक’ वैज्ञानिक माहिती देऊन डॉ. वर्षा जोशी थांबत नाहीत, तर त्या इतरही उपयुक्त तसेच रंजक माहिती देऊन अलंकारांचं विश्व आपल्यापुढे उघड करतात.

या पुस्तकातले महत्त्वाचे विषय :

१. शुद्ध सोनं किंवा चांदी मिळवण्याची प्रक्रिया

२. कॅरट म्हणजे काय? त्याचा रंजक इतिहास

३. सोन्या-चांदीचे अलंकार तयार करताना कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात?

४. मीनाकारी, कुंदन इत्यादी शैलीतल्या कलाकुसरी कशा साकारल्या जातात?

५. मोती कसा तयार होतो, त्याचे वेगवेगळे प्रकार

६. नवरत्नांची माहिती, त्यांवर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रिया

७. आपल्या मौल्यवान दागिन्यांची निगा कशी राखावी? आणि बरंच काही…

आपलं सौंदर्य खुलवणाऱ्या कलात्मक साजाची सर्वांगीण माहिती देऊन ज्ञानरंजन करणारं पुस्तक… विश्व अलंकारांचं !


 

225.00 Add to cart
1 7 8