अय्यंगार योग संच

 


बेल्लूर कृष्णमाचारी सुंदरराजन अय्यंगार अर्थात, जगविख्यात योगगुरू बी.के.एस. अय्यंगार यांनी 'अय्यंगार योग’ ही योगशास्त्रामधील एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती विकसित केली. 'योग’ हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे, असा नवा विचार रुजवण्यात आणि भारताबरोबर संपूर्ण जगभर योगविद्या लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अय्यंगारांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी कर्नाटकमधील बेल्लूर येथे झाला. योगशास्त्राचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी त्यांच्या मेहुण्यांकडून म्हैसूर येथे घेतलं. १९३७मध्ये योगशास्त्राचा प्रचार करण्यासाठी पुण्यात वास्तव्यास आल्यानंतर ते योग शिकवू लागले. जगभरातल्या अनेक नामांकित व प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्याकडून योगाभ्यासाचे धडे घेतले आहेत. १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांनी ‘राममणी अय्यंगार मेमोरिअल योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. येथे जनसामान्यांना योगासनाचे धडे दिले जातात. त्याचप्रमाणे हे एक महत्त्वाचं योगविद्या संशोधन केंद्रही आहे. अनेक देशी परदेशी विद्यार्थी इथे योगसाधनेसाठी येतात. संपूर्ण जीवन योगविद्येसाठी वाहून घेतलेल्या या योगतपस्व्याचा २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी मृत्यू झाला.

गीता अय्यंगार यांना योगशास्त्राचा मौल्यवान वारसा, त्यांचे वडील विश्वविख्यात योगतज्ज्ञ श्री. बी. के. एस. अय्यंगार यांच्याकडून मिळाला. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार हे आपल्या विशाल योगतत्त्वज्ञानाच्या कलात्मक आविष्कारासाठी सर्वश्रुत आहेत. गीता अय्यंगार यांचा योगाभ्यासाचा प्रारंभ बालपणापासूनच झाला. १९६२ पासून त्या ‘योग’ हा विषय शिकवत आहेत. त्या ‘तत्त्वज्ञान’ व ‘आयुर्वेद’ या विषयातील पदवीधर आहेत. त्यांच्या योगविषयक ज्ञानाला मिळालेल्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोडीमुळे, त्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन करू शकतात. ‘रमामणि अय्यंगार मेमोरियल इन्स्टिट्युट’च्या त्या एक चालक होत्या. गीता अय्यंगार यांनी योगविषयाच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी भारतात आणि विदेशात सर्वदूर प्रवास केलेला आहे. त्यांची या विषयावरील पुस्तकंही जगन्मान्य आहेत. या क्षेत्रात ज्या काही फार थोड्या स्त्रिया काम करू शकल्या त्या ‘योगशास्त्र’ विषयासंदर्भात त्यांचे नाव अतिशय आदराने व मानाने घेतलं जातं. त्यांच्या ‘स्त्रियांसाठी योग-एक वरदान’ या पुस्तकाच्या मूळ इंग्रजी आवृत्तीचे, या पूर्वी युरोपातील सहा विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. स्वत: एक स्त्री असल्यामुळे स्त्रियांच्या आयुष्यातील अडीअडचणी, आव्हानं, शारीरिक व मानसिक चढउतार हे त्या उत्तमरीत्या जाणू शकतात. स्त्रियांविषयी आंतरिक तळमळ असल्यामुळेच त्यांनी हे पुस्तक अतिशय तपशिलात लिहिलं आहे.


संचातील ७ पुस्तकं
१) योगदीपिका – जगभरातील ४० भाषांमध्ये अनुवादित झालेलं योगाचार्य अय्यंगार यांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुस्तक LIGHT ON YOGA चा मराठी अनुवाद

२) आरोग्य-योग  – आसन-प्राणायाम, धारणा-ध्यान

३) योग सर्वांसाठी – शरीर-व्याधी व ताणतणावांवर उपचार

४) योग एक कल्पतरू – योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग

५) पातंजल योगसुत्र – महर्षी पतंजली रचित योगसूत्रांची प्रारंभिक ओळख

६) योगाचार्य – बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र

७) स्त्रीयांसाठी योग – स्त्रियांना जीवनातील प्रत्येक टप्प्यात साथ देणारा असा योगमार्ग …त्यासाठी सर्वांगीण मार्गदर्शन

 


रु. २१९०  ची पुस्तकं सवलतीत रु. १६९९ मध्ये (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


2,325.00 1,799.00 Add to cart

समर्थ मालिका संच


३ पुस्तकांचा संच


मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते.

नारायण धारप यांची ‘समर्थ’ ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा…

अशोक समर्थ हे एक प्रकारचे ‘पॅरानॉर्मल’ डिटेक्टिव्ह…

सर्वसामान्यांना छळणाऱ्या दुष्ट व अघोरी शक्तींचा आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्याने ते पाडाव करतात.

त्यांच्या डावपेचात ते भौमितिक आकृत्या, रिंगणं, धुपारे अशा सुरक्षासाधनांचाही वापर करतात…


 

1,500.00 Add to cart

विश्राम गुप्ते त्रिधारा

चेटूक – ऊन – ढग


विश्राम गुप्ते हे मराठीतले आघाडीचे कादंबरीकार, समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. धर्म, स्त्री-पुरुष नातेसंबंध, मानवी मन, कुटुंबव्यवस्था हे त्यांच्या चिंतनाचे विषय असून यांबद्दल ते आपल्या कादंबरी तसंच ललितेतर लेखनातून चिकित्सा करत असतात. अभिजात साहित्याबरोबरच मराठीतल्या नव्याने लिहणाऱ्या तरुण लेखकांचं लेखन ते आस्थेने वाचतात. त्याबद्दलही ते चिकित्सक दृष्टिकोन ठेवून टीकात्मक लिहितात. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्कारांबरोबरच इतरही महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

प्रेम…

एक संकल्पना,

कौटुंबिक नातेसंबंध,

आणि

व्यक्तिगत जाणिवांचा

खोलवर शोध…

हे आहे

या त्रिधारेचे सूत्र.

अभिजात

कथनवैशिष्ट्यं असलेली

विश्राम गुप्ते लिखित

संग्राह्य कादंबरीत्रयी…


1,025.00 Add to cart

अरुण टिकेकर ५ पुस्तकांचा संच

 


निश्चित अशी वैचारिक बैठक असलेले आणि अभ्यासक, संशोधक असा डॉ. अरुण टिकेकरांचा नावलौकिक आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक लेखन हा टिकेकरांचा मुख्य लेखन-प्रांत असला तरी त्यांनी ललित लेखनासह लेखनाचे अनेक बंध लीलया पेलले आहेत. मात्र, तसं करताना मांडणीतली शिस्त, शब्दप्रयोगातला काटेकोरपणा आणि भाषेतला प्रभावीपणा कधीच कमी होऊ दिला नाही. सकस आशय हेही टिकेकरांच्या लेखनातलं वैशिष्ट्य राहिलं आहे. लेखन, संपादन, संशोधन यांसोबतच टिकेकरांनी आपली रसिकताही जोपासली. शास्त्रीय संगीतात ते मनापासून रमत असत. पं.कुमार गंधर्व हे त्यांचे आवडते गायक होते. क्रिकेट ही त्यांची विशेष आवड होती. आंतरविद्यापीठीय स्तरावरील सामन्यांत ते खेळलेही आहेत. मधुबाला ही त्यांची आवडती अभिनेत्री होती, तर गीता दत्त हिच्या गाण्यातला दर्द त्यांना भिडायचा. टिकेकरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त, तर चर्या अभ्यासकाची, गंभीर होती. स्वभावाने ते परखड, तर वृत्तीने अलिप्त होते... पण अशा प्रतिमेपलीकडचेही टिकेकर होते... निरागस, हळुवार, भावुक, चोखंदळ... आपल्या आवडत्या माणसांमध्ये मनापासून रमणाऱ्या टिकेकरांचं १९ जानेवारी २०१६ रोजी अकस्मात निधन झालं.

१) POWER, PEN AND PATRONAGE = Rs. 295

२) अक्षरनिष्ठांची मांदियाळी = रु. १९०

३) कालचक्र  = रु. २००

४) कलान्तर =  रु. २००

५) इति – आदि = रु. ५००


रु. १,३८५ ची पुस्तकं सवलतीत रु. ९९९ मध्ये (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


1,385.00 999.00 Add to cart

व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


शरदिन्दु बंद्योपाध्याय यांचा जन्म ३० मार्च १८९९मध्ये उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे झाला. त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९१९ साली प्रसिद्ध झाला. त्या वेळी ते कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील महाविद्यालयात शिकत होते. ते हॅरिसन रोड (आताचा महात्मा गांधी रोड) वरील एका मेसमध्ये राहात होते. मेसमधील त्यांची खोली हे व्योमकेश बक्षीचेही पहिले घर ठरले. कायदेशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आणि नंतर त्यांनी लेखनास वाहून घेतलं. पहिली व्योमकेश बक्षी कथा त्यांनी लिहिली ती १९३२ साली. तोवर ते नामवंत लेखक झालेले होते. १९३८ साली ते मुंबईला आले आणि 'बॉम्बे टॉकीज' व नंतर अन्य कंपन्यांसाठी पटकथा लेखन करू लागले. १९५२पर्यंत ते मुंबईत होते. मग पटकथालेखन त्यांनी थांबवलं आणि पुन्हा ललित लेखनाकडे वळण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांनी पुण्याला स्थलांतर केलं. त्यांनी बंगालीत भूतकथा, ऐतिहासिक प्रणयकथा आणि बालकथा देखील लिहिल्या आहेत. उर्वरीत आयुष्य त्यांनी पुण्यातच व्यतीत केलं आणि २२ सप्टेंबर १९७०मध्ये त्यांचं निधन झालं.

अनुवाद :
'रोहन'चे एक ‘कलंदर’ लेखक. पत्रकारिता, अनुवाद, सदर लेखन ते ललित लेखनामध्ये अनेक वर्षं मुशाफिरी केलेला ‘ज्येष्ठ लेखक’ म्हणून परिचित होते. त्यांना व्यासंगी पत्रकारितेचा चार दशकाहून अधिक अनुभव होता. तसंच त्यांना पालिका बैठकीपासून आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांचे वृत्तांत देण्यापर्यंतचा समृद्ध अनुभव होता. दैनिक सकाळ, तरुण भारत व केसरी या वृत्तपत्रांतून काम केल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून त्यांनी ११ वर्षं काम केलं. तेथून त्यांनी लिहलेली 'राजधानीतून' ही वार्तापत्रं विशेष गाजली. त्यानंतर अनेक वर्षं त्यांनी ‘मटा’चे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. 'कलंदर' या टोपण नावाने 'कानोकानी' हे त्याचं सदरही विशेष लोकप्रिय झालं. अनुवाद क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली असून त्यामध्ये इंदिरा गांधी (पुपुल जयकर), शेषन (के. गोविंदन कुट्टी), इंदिरा अंतिम पर्व (पी. सी. अलेक्झांडर), लता मंगेशकर (हरीश भिमानी), फॅन्टॅस्टिक फेलूदा (सत्यजित रे पुस्तकांची मालिका), लाल बहादूर शास्त्री (पी. एन. धर), कस्तुरबा : एक शलाका (अरुण गांधी), आर. डॉक्युमेंट (आयर्विंग वॉलेस) यांचा समावेश होतो. हे सर्व अनुवाद त्यांना उत्कृष्ट तर होतेच, परंतु ते लोकप्रियही झाले. सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी, राज्य सरकार व अनुवाद सुविधा केंद्र यांचे पुरस्कार त्यांना लाभले. 'कानोकानी' या पुस्तकाला मसापचा चि. वि. जोशी पुरस्कार लाभला.


दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!


960.00 Add to cart

रस्किन बाँड संच

भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता


रस्किन बाँड या एक अँग्लो- इंडियन लेखकचा जन्म 19 मे १९34 रोजी कसौली इथे झाला. चार वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते आपल्या आजीच्या घरी, देहरादूनला गेले. वयाच्या सोळाव्या वर्षी, त्यांनी पहिली लघुकथा लिहिली आणि त्याला पारितोषिकही मिळालं. तेव्हापासून त्यांची लेखणी अविरत साहित्यनिर्मिती करत राहिली. पुढे त्यांनी दोन वर्षांसाठी इंग्लंडला आपल्या मावशीकडे वास्तव्य केलं आणि तिथेच आपल्या पहिल्या कादंबरी लेखनाला सुरुवात केली. या कादंबरीला वाचक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भारतात परतल्यानंतर त्यांनी विविध नियतकालिकांमध्ये लेखन केलं, तसंच काही नियतकालिकांचं संपादनही केलं. मोठ्यांबरोबरच लहान मुलांसाठीही भरपूर साहित्यनिर्मिती केली. आजवर त्यांच्या कथा - कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी चित्रपटही तयार केले आहेत. साहित्यातील भरीव योगदानासाठी त्यांना 'साहित्य अकादमी पुरस्कार', तसंच 'पद्म भूषण पुरस्कार' यांसारखे अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार मिळाले आहेत.

 

अनुवाद :

नीलिमा भावे यांनी कथा, ललित लेख, वैचारिक लेखन, बाल साहित्य, संशोधनपर लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन- मुशाफिरी केली असून त्यांनी बंगालीमधून मराठी अनुवादही केले आहेत. संपादनंही केली आहे. त्याशिवाय त्यांनी विविध नियतकालिकांमधून साहित्य व सामाजिक विषय लेखनही केलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आणि इतरही साहित्य संस्थांचे सन्माननीय पुरस्कार मिळाले आहेत.
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड
यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.
त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,
त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या
कथा-कादंबर्‍यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्‍या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !
तुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल…
तेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम!


900.00 Add to cart

एस. हुसैन झैदी क्राइम सेट


एस. हुसैन झैदी हे शोधपत्रकारिता, तसंच गुन्हेगारी पत्रकारितेतलं मुंबईच्या प्रसारमाध्यमांच्या विश्वातलं विख्यात नाव आहे. एशियन एज वृत्तपत्राचे ते निवासी संपादक होते, तसंच मुंबई मिरर, मिड-डे आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केलं आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘डोंगरी टू दुबई’ ही त्यांची काही बेस्टसेलर्स पुस्तकं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित असलेले चित्रपटही विशेष गाजले. एचबीओ वाहिनीकरता ‘टेरर इन मुंबई’ या चित्रपटासाठी झैदी यांनी साहायक निर्माता म्हणून काम केलं आहे. हा चित्रपट २६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर आधारित होता.

अनुवाद:
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


राजकारण, कल्पनातीत दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण असणारा एस. हुसैन झैदी क्राइम सेट!
१) इलेवन्थ अवर = रु. २५०
२) मुंबई अवेंजर्स = रु. ३९०
३) एन्डगेम = रु. २४०

एकूण संच ८८० रु. घरपोच


880.00 Add to cart

मन:स्वास्थ्य संच

निरोगी मानसिक आरोग्याचा कानमंत्र देणार्‍या ४ पुस्तकांचा संच


डॉ. विजया फडणीस यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५३, रोजी नागपूर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून १९७५ साली एम. ए. (मानसशास्त्र) तसंच १९८३ साली प्रथम श्रेणी प्रथम क्रमाकांत पीएच.डी. केली आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालय, नागपूर, व आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केलं. त्यांचा यशवंत मनोविकास केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक, मानसतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून तसेच नियतकालिकं, दिवाळी अंकांमधून विपुल ललित तसंच मानसशास्त्रीय लेखन केलं आहे. त्यांचे गुजराथी साहित्य व संस्कृतीविषयक अनेक लेख व अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांनी बुद्धिमापन, अभिक्षमता तसंच व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारा मनोमापन, मुलांच्या अभ्यास, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व समस्यांवर समुपदेशन व करिअर मार्गदर्शन, अभ्यास कौशल्यं, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, स्वभावदोषांवर पुष्पौषधी उपचार, प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे. तसंच त्या विविध मंचांवरून आणि आकाशवाणीवरून व्याख्यानं आणि मुलाखती देत असतात. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

मुलांना घडवताना
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समंजस मार्गदर्शन

मनं उलगडताना
मनातल्या गुंतागुंतीवर मनोविकारांवर टाकलेला प्रकाश

सुखाने जगण्यासाठी
सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन

गोष्टी मनाच्या
आनंदी जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन


825.00 Add to cart

यशवंतराव चव्हाण संच

३ बहुमोल पुस्तकांचा संच


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले आदरणीय द्रष्टे व मुत्सद्दी नेते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी केली. सामान्य कुटुंबातून आलेले चव्हाण हे जनसामान्यांचे पुढारी म्हणून ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची पुरेपूर जाणीव असल्याने त्यांनी तत्त्वनिष्ठ व्यवहारवादाचे पालन केले. लोकशाहीच्या शक्तीवर त्यांचा अतूट विश्वास असल्यामुळे त्यांनी न्यायपूर्ण समाजाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या धोरणांबाबत पुढाकार घेऊन त्यांना पाठिंबा दिला. चव्हाण एक समतोल विचारवंत, सिद्धहस्त लेखक, प्रतिभावान वक्ते, चाणाक्ष मुत्सद्दी तसेच द्रष्टे प्रशासक होते व त्यांनी लोकहिताच्या अनेक धोरणांवर आपला ठसा उमटवला. अनलंकृत शैलीत त्यांनी केलेलं लेखन हे मनाला स्पर्श करून जातंच, शिवाय ते आपल्याला समाजकारण, राजकारण यांचं सखोल भानही देतं.

महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!


800.00 Add to cart

आर.के. नारायण संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


आर.के. नारायण यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचं बालपण चेन्नई येथे त्यांच्या आजोळी व्यतीत झालं. त्यांच्या वडिलांची ‘महाराजा हायस्कुल’, म्हैसूर येथे बदली झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह म्हैसूर येथे वास्तव्यास आले. त्यांनी लेखनाची सुरुवात त्यांच्या १९३५ सालच्या ‘स्वामी अँड फ्रेंड्स’ या पुस्तकाने केली. ‘मालगुडी’ या काल्पनिक गावातील सर्वसामान्य माणसांचं आयुष्य सहज, ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून चितारणं ही त्यांची खासियत ! त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. ‘गाइड’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार आणि रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरतर्फे दिलं जाणारं ए.सी. बेन्सन मेडल प्राप्त झालं. अनेक विख्यात विद्यापीठांकडून त्यांना डी.लिट्. ही पदवी बहाल करण्यात आली. १९६४ साली त्यांना पद्मभूषण तर २००० साली पद्मविभूषण सन्मान प्राप्त झाला. १९८९मध्ये त्यांना राज्यसभेचं सभासदत्व बहाल करण्यात आलं. या महान लेखकाचा १३ मे २००१ रोजी वयाच्या ९४व्या वर्षी मृत्यू झाला.

अनुवाद :
पुणे विद्यापिठाच्या 'संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा'त संस्कृत आणि 'ललित कला केंद्रा'त संस्कृत व आनुषंगिक विषयांचं सरोज देशपांडे यांनी अनेक वर्षं अध्यापन केलं. जिज्ञासू तसेच जाणकार अशा सरमिसळ वाचक-वर्गासाठी 'संस्कृत साहित्यशास्त्राची तोंडओळख' हे त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. अनुवाद करणं हा त्यांचा छंद असून त्यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. ’अशी काळवेळ’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकासाठी त्यांना २०१० साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.


‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.

अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.

संचात असलेली ४ पुस्तकं :

१. द इंग्लिश टीचर

२. द बॅचलर ऑफ आर्टस

३. मालगुडीचा नरभक्षक

४. महात्म्याच्या प्रतीक्षेत…


755.00 Add to cart

हृषीकेश गुप्ते लिखित ५ पुस्तकांचा संच


शिक्षणाने आणि व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असलेले हृषीकेश गुप्ते हे मराठी साहित्यातले आजचे आघाडीचे तरुण सर्जनशील लेखक आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावी त्यांच्या जन्म झाला आणि शिक्षणही तिथेच झाले. 2000 सालापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि 2008 सालापासून त्यांचं लेखन विविध नियकालिकांमधून प्रसिद्ध झालं. मनातली भीतीची आदिम भावना, माणसाच्या लैंगिक प्रेरणा, त्याच्या भावभावनांची उलघाल ही त्यांच्या लेखनाची मुख्य आशयसूत्रं होतं. गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा या लेखनवैशिष्ट्यांमुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवतं. 'दंशकाल’, 'चौरंग' या कादंबऱ्या, 'काळजुगारी’, 'हाकामारी' या लघुकादंबऱ्या आणि 'अंधारवारी’, ‘दैत्यालय’, 'घनगर्द’, 'परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष' हे कथासंग्रह अशी त्यांची एकूण साहित्यसंपदा प्रकाशित आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी 'दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटाचं आणि 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या स्वलिखित कथेवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.

गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा ही लेखनवैशिष्टय असलेले लेखक हृषीकेश गुप्ते…

हृषीकेश गुप्ते लिखित ५ पुस्तकांचा संच


१) काळजुगारी :

मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी !

२) हाकामारी :

गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – हाकामारी !

३) परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष :

पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणा‍ऱ्या दोन अनवट दीर्घकथा!

४) घनगर्द :

गूढ मार्गावरून जात ‘घनगर्द’ मनोव्यापारांमध्ये खोल शिरणाऱ्या कथांचा संग्रह…

५) गोठ्ण्यातल्या गोष्टी

व्यक्तिकथा या विस्मृतीत गेलेल्या साहित्यप्रकाराला पुनर्जीवित करणारी अनोखी साहित्यकृती…


रु.९३५ ची पुस्तकं सवलतीत रु. ६९९ (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा !


 

 

935.00 699.00 Add to cart

आजोळचे दिवस मालिका


आजोळचे दिवस…एक समृद्ध सांस्कृतिक वारसा



आजोळ कुणाला प्रिय नसतं ?
आजोळ म्हणजे
प्रेम, माया आणि स्मृतींचं भंडार !

विविध क्षेत्रातील

३८

मान्यवर सांगत आहेत आपल्या

आजोळचा सांस्कृतिक वारसा

१. आठवणी आजीच्या २. आठवणी आजोबांच्या

३. आठवणी मामांच्या ४. हे बंध आठवणींचे

४ पुस्तकांची मालिका आजोळचे दिवस


 

695.00 Add to cart

उद्योग संच

यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली


प्रथितयश उद्योजक आणि प्रेरणादायी बिझनेस लिडर म्हणून सुरेश हावरे परिचित आहेत. त्यांनी नागपूर विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.एससी.टेक. ही पदवी संपादित केली. भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमधून त्यांनी न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये पदव्यूत्तर शिक्षणही पूर्ण केलं. शिवाय त्यांनी इतिहास या विषयात एम.ए. केलं असून नुकतेच त्यांना ‘अ‍ॅफोर्डेबल नॅनो हाऊसिंग' या विषयासाठी मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी. (डॉक्टरेट) या पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे. नागपूर विद्यापीठाचे ते मेरिट स्कॉलर व इंजिनिअरिंगमधील सुवर्णपदक विजेते आहेत. डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जीमध्ये त्यांनी २७ वर्षं वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून सेवा केली आहे. न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये त्यांचे ३७ शोधनिबंध नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. व्हिएन्ना येथील IAEA या अणुशास्त्रातील सर्वोच्च संस्थेत भारतीय शास्त्रज्ञांच्या टीमचं त्यांनी नेतृत्व केलं आहे. याशिवाय गेली २५ वर्षं ते बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. सध्या ते सुप्रसिद्ध ‘हावरे ग्रुप ऑफ कंपनीज्’चे नेतृत्व करत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान असून त्यांना अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवसायिक पुरस्कारही मिळालेले आहेत. जे.एन.पी.टी.चे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे आणि सध्या ते श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे अध्यक्ष आहेत. नुकताच त्यांना ‘महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री’ दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे.

कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी…

उद्योग तुमचा…पैसा दुसऱ्याचा

उद्योगाची उभारणी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग,रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ… नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अनुभवाचे बोल…

 

उद्योग करावा ऐसा…

अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे गुण तरुणांमध्ये रुजवण्यासाठी हावरे यांनी या बिझनेस बाजीगरांशी संवाद साधून तयार केलेलं पुस्तक…

 

स्टार्टअप मंत्र

तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप. एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’!


695.00 Add to cart

ज्येष्ठ नागरिक संच


उत्तरायुष्य गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी 


संचातील पुस्तके:

  • आनंदस्वर ज्येष्ठांसाठीचैतन्यमयी सेकंड इंनिंगसाठी सहज सोपं मार्गदर्शन , लेखिका : रोहिणी पटवर्धन
  • आपल्यासाठी आपणच : लेखिका: रोहिणी पटवर्धन 
  • आजी आजोबा आधार कि अडचण? : लेखक: भा. ल. महाबळ 
  • ज्येष्ठांसाठी ४ गोष्टी युक्तीच्या : लेखक : भा. ल. महाबळ  
  • साठी नंतरचा आहार व आरोग्य : शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं मार्गदर्शन ,लेखक : डॉ वर्षा जोशी 

655.00 Add to cart

डॉ. विजया फडणीस लिखित ५ पुस्तकांचा संच

निरोगी मानसिक आरोग्याचा कानमंत्र देणार्‍या ५ पुस्तकांचा संच


डॉ. विजया फडणीस यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५३, रोजी नागपूर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून १९७५ साली एम. ए. (मानसशास्त्र) तसंच १९८३ साली प्रथम श्रेणी प्रथम क्रमाकांत पीएच.डी. केली आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालय, नागपूर, व आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केलं. त्यांचा यशवंत मनोविकास केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक, मानसतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय आहे. त्यांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून तसेच नियतकालिकं, दिवाळी अंकांमधून विपुल ललित तसंच मानसशास्त्रीय लेखन केलं आहे. त्यांचे गुजराथी साहित्य व संस्कृतीविषयक अनेक लेख व अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांनी बुद्धिमापन, अभिक्षमता तसंच व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारा मनोमापन, मुलांच्या अभ्यास, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व समस्यांवर समुपदेशन व करिअर मार्गदर्शन, अभ्यास कौशल्यं, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, स्वभावदोषांवर पुष्पौषधी उपचार, प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे. तसंच त्या विविध मंचांवरून आणि आकाशवाणीवरून व्याख्यानं आणि मुलाखती देत असतात. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

मुलांना घडवताना
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समंजस मार्गदर्शन

मनं उलगडताना
मनातल्या गुंतागुंतीवर मनोविकारांवर टाकलेला प्रकाश

सुखाने जगण्यासाठी
सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन

गोष्टी मनाच्या
आनंदी जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन

बहर मनाचा 

प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कृतिशील विचार


रु. ९५० ची पुस्तकं सवलतीत रु.६५०  (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


950.00 650.00 Add to cart

डॉ. लिली जोशी लिखित ५ पुस्तकांचा संच


डॉ. लिली जोशी या एम.डी. मेडिसिन आहेत. ज्या काळात ‘लेडी फिजिशियन’ म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं तेव्हापासून म्हणजे १९७६पासून त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव शांत आणि व्यक्तिमत्त्व हसतमुख असून दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. रुग्णांना बरं वाटावं अशी त्यांची आंतरिक तळमळ असल्याने आणि औषधोपचारांपेक्षा जीवनशैली सुधारण्यावर त्यांचा भर असल्याने यातूनच त्यांनी आरोग्यविषयक लेखनाची सुरुवात केली. त्यांनी रुग्णांसाठी मधुमेह, रक्तदाब, अॅगनिमिया, थायरॉइड विकार अशा अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसंच व्यायामाचं महत्त्व कृतीतून सांगणारा ‘वॉक विथ डॉक’ हा टेकडीवरचा उपक्रम आणि अशा अनेक अभिनव गोष्टींचं आयोजन केलं आहे. याचबरोबर संस्कृत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. अगदी अलीकडे त्यांनी संस्कृत साहित्यात बी.ए., एम.ए. आणि पी.एच.डी. या पदव्या विशेष गुणवत्तेसह प्राप्त केल्या आहेत. ट्रेकिंग, जिमिंग, शास्त्रीय संगीत, वाचन, लेखन या गोष्टींची त्यांना मनापासून आवड आहे.

१) पर्यटन एक संजीवनी  = रु २००

२)  प्रतिकार शक्ती कशी वाढवाल = रु ७०

३) तुमच्या आमच्या लेकी  = रु १८०

४) आनंदी शरीर आनंदी मन = रु २५०

५) इन द लॉन्ग रन  = रु २५०


रु. ९४० ची पुस्तकं सवलतीत रु.६४०  (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


 

 

940.00 640.00 Add to cart
1 2 3