विरंगुळा

 

श्री.के. अक्षीकर


आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वत : साठी वेळ काढणं , छंद जोपासणं यासाठी वेळ असतो कुठे ? त्यामुळे अनेकांची सेवानिवृत्तीनंतर करायच्या कामांची मोठी यादीच तयार असते ! श्री.के. अक्षीकर यांनी सेवानिवृत्तीनंतर वेळेचा सुंदर विनियोग करून आपला आवडीचा छंद जोपासायचं ठरवलं ! त्यांचा हा छंद म्हणजे लेखन ! बारा लेखांच्या या संग्रहात दैनंदिन जीवनातील त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती , ओघवती लेखनशैली व परिपक्व वैचारिक बैठक याची प्रचीती येते .


100.00 Add to cart

आणखी कानोकानी

 

Ashok Jain


आणखी कानोकानी ‘ कलंदर’च्या खुमासदार शैलीतील लिखाणाचं पहिलं संकलन ‘ कानोकानी ‘ आणि आता हे दुसरं ‘ आणखी कानोकानी ‘ . या संग्रहात ‘ कलंदर’ने आचार्य अत्रे , पु.ल.देशपांडे , वि . स . खांडेकर , कुसुमाग्रज , जी . ए . कुलकर्णी , मंगेश पाडगावकर अशा प्रथितयश साहित्यिकांच्या संदर्भात खुसखुशीत लेख लिहून ‘ साहित्यिक खळखळाट ‘ निर्माण केला आहे , तर साहित्यक्षेत्रातील अनेक घटनांची , प्रसंगांची विडंबनात्मक उठाठेवही केली आहे . पुस्तकात कलंदराने आर . के . लक्ष्मण ते मधुबाला अशा कलाक्षेत्रातील अनेकांच्या गुणावगुणांवर मिस्किल लिखाण केले आहे , ‘ नाट्यवर्तुळाचा कानोसा घेतला आहे , मराठी भाषेबाबतची अनास्था चव्हाट्यावर आणली आहे आणि ‘ राजकीय कोलाहला’चा मार्मिक उपहासही केला आहे . पहिल्या ‘ कानोकानी’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला होता . त्या संग्रहातील तिरकस बाणांनी वाचकांची वाहवा मिळविली . आता ‘ आणखी कानोकानी’मधील आपल्या लक्ष्यांवर ‘ ना – दुखापत ‘ तत्त्वावर सोडलेली निर्विष क्षेपणास्त्रं ‘ विनोदी साहित्याचा अवकाश निश्चितच प्रकाशमान करतील .


100.00 Add to cart

लोकप्रिय चित्रतरिका

 

डॉ . शुभा चिटणीस


या लोकप्रिय अभिनेत्रीचं बालपण , त्यांची जडण – घडण , त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात आलेले चढ – उतार , यश – अपयश याचा पट वेधकरित्या उलगडून दाखवला आहे डॉ . शुभा चिटणीस यांनी , त्यांना प्रत्यक्ष भेटून , त्यांच्याशी संवाद साधून !


125.00 Add to cart

अनासक्त कर्मयोगी

( कै . गो . ना . अक्षीकरांचे चरित्र )

श्री . के . अक्षीकर


अनासक्त कर्मयोगी ‘ या चरित्राचे लेखक श्री श्रीकृष्ण केशव अक्षीकर हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील शिक्षण विभागातून सहसचिव या सन्मान्य पदावरून सेवानिवृत्त झालेले राजपत्रित अधिकारी आहेत . ते एक चांगले ललित लेखकही आहेत . आजवर त्यांची ‘ कन्सल्टिंग रूम ‘ केशव अक्षीकर ‘ आदरांजली ‘ , ‘ अशी ( ही ) माणसं ‘ , ‘ माझ्या मनातलं ‘ व ‘ रिकामपणाचे उपद्व्याप ‘ ही पाच ललित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत . त्यांनी एके काळी ‘ सुगत ‘ या नावाने वासंतिक व दिवाळी अंकांचे संपादनही केले होते . या चरित्राचे नायक कै . गो . ना . अक्षीकर यांचे ते नातू आहेत . टिळक – आगरकरांच्या अध्यापनाचा लाभ घेत त्यांच्याच ‘ राष्ट्रीय ‘ शाळेतून मॅट्रिक झालेल्या कै . गो . ना . अक्षीकरांनी आपल्या या गुरुद्वयाकडून शिक्षणप्रसाराचा संस्कार कसा घेतला ; दादर , ठाणे व कल्याण या एके काळच्या मागासलेल्या ‘ खेड्यां मध्ये सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी कशा शाळा काढल्या , त्या काळात शिक्षणक्षेत्रात दुर्मीळ असणाऱ्या ‘ रात्रशाळा ‘ व ‘ इंडस्ट्रियल स्कूल ‘ या संकल्पना कशा प्रत्यक्षात आणल्या , हे सर्व करीत असताना देणग्यांवर अवलंबून न राहता स्वत : च आर्थिक पदरमोड कशी केली , यश , कीर्ती , नाव आणि स्वतःचे छायाचित्रही यांपासून ते निष्ठेने कसे अलिप्त राहिले , यांचे एक हृद्य व प्रेरणादायी चित्र या चरित्रात पाहवयास मिळते . योगायोगाने कै . गो . ना . अक्षीकर सुवर्णजयंती वर्ष आणि त्यांनीच स्थापन केलेल्या दादर – मुंबईच्या छबिलदास शाळेची शतकोत्तर रजतवर्षपूर्ती या २०१४ त येणाऱ्या दोन मंगल मुहूर्ताच्या उंबरठ्यावर हे चरित्रपुस्तक प्रकाशित होत आहे . याच्या वाचनाने शिक्षणक्षेत्रातील मंडळींना कार्यऊर्जा प्राप्त व्हावी आणि विद्यार्थ्यांवर ध्येयासक्ती व अनासक्तीचा संस्कार व्हावा , हीच एक इच्छा .

– डॉ . द . दि . पुंडे


125.00 Add to cart

अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर


[taxonomy_list name=”product_author” include=”583″]


अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव’सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज’, `शिक्षण पंढरी’ यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘व्हिजन २०२०’नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५’ डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत.
अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव’पद प्राप्त करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!


160.00 Add to cart

आमचं बालपण


गौरी रामनारायण
अनुवाद : उल्का राऊत


बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर! तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’



175.00 Add to cart

कस्तुरबा : शलाका तेजाची


[taxonomy_list name=”product_author” include=”346″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


महात्मा गांधी व कस्तुरबा या दोघांनी मिळून अहिंसात्मक चळवळीचा पाया घातला आणि दोघांनी तिला वाहून घेतले. या अलौकिक स्त्रीला कोणताही अडथळा थोपवू शकत नसे. हे पुस्तक म्हणजे महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे फळ आहे. एका देशाच्या जन्मामागील ऐतिहासिक घटना यात आहेत. तशीच ही एक मुग्ध प्रेमकहाणीही आहे. आजपर्यंत गांधींच्या चरित्रकारांनी त्यांच्या सर्वश्रुत आख्यायिकेवर आधारून लेखन केले आहे. हे चरित्र ही या दोन मानवी जीवांची अस्सल कहाणी आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राहिलेले दोन महान जीव !



195.00 Add to cart

केवळ मानवतेसाठी

आपलं अवघं आयुष्य मानवसेवेला समर्पित करून सेवा-केंद्रांचं अभूतपूर्व जाळं विणणार्‍या अब्दुल सत्तार इदी यांचं आत्मचरित्र


तेहनिमा दुराणी
अनुवाद :श्रीकांत लागू


अब्दुल सत्तार इदी यांचा जन्म भारतातला. पण फाळणीमुळे किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. गरीब, गरजू आणि आपत्तीग्रस्तांसाठी केलेल्या अभूतपूर्व मदत-कार्यामुळे तिसऱ्या जगतामधील जनतेत त्यांना मसिहाच समजलं जातं. मूळच्या सेवाभावीवृत्तीमुळे १९४८ मध्ये त्यांनी मिठादर येथे धर्मादाय दवाखाना सुरू केला. अल्पावधीतच आपत्कालीनप्रसंगी मदत कार्यासाठी पाकिस्तानात सर्वत्र रुग्णवाहिका व मालवाहू वाहनांच्या सेवेचं जाळं विणलं. त्याचबरोबर शिस्तबध्द सेवाकर्मींची मोठी फळी उभी केली. कालांतराने त्यात हेलिकॉप्टर सेवेचीही भर पडली. पूर, भूकंप किंवा रेल्वे अपघातासारखी कोणतीही आपत्ती असो, इदी फाऊंडेशनचे स्वयंसेवक सरकारी यंत्रणेआधीच मदतीचा हात घेऊन घटनास्थळी पोहोचलेले असतात. झुल्फिकार अली भुट्टो असो किंवा नवाज शरीफ वा आसिफ अली झरदारी असो सर्वच राज्यकर्त्यांनी वेळोवेळी इदींच्या सेवाकेंद्रांची मदत घेतली. इदींनी केलेल्या त्यांच्या सेवाकार्याच्या प्रचंड विस्तारामुळे आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष सेवाभावामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली आहे. सेवाकार्य व मानवता ही मूल्यं आचरणात आणून मानवसेवेसाठी इदींनी स्वत:ला सर्व कुटुंबासह जणू वाहूनच घेतलं! रस्त्यात त्यांनी अक्षरश: भीक मागून विलक्षण अशा भीक अभियानाच्या प्रयोगातून संस्थेसाठी प्रचंड निधी जमा केला. शासनाची दंडेलशाही, धर्मांधांचा विरोध आणि दहशतवाद्यांचा दबाव याला सामोरं जात, त्यांनी आपलं कार्य जिद्दीने पुढे नेलं. त्याचंच हे चित्तवेधक व प्रेरणादायी आत्मकथन… केवळ मानवतेसाठी…!


195.00 Add to cart

एका सेलिब्रिटी डेंटिस्टची बत्तिशी

करियरमधील अनुभव, खुसखुशीत किस्से, निरोगी व सुंदर दातांसाठी टिप्स


संदेश मयेकर
अनुवाद : डॉ. अरुण मांडे 


चंदेरी दुनियेतील सिनेस्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत, दिग्गज उद्योजकांपासून प्रसिद्ध कलावंतांपर्यंत आणि स्टार क्रिकेटर्सपासून रॅम्पवरील मॉडेल्सपर्यंत…
अनेक चेहर्‍याना सुंदर हास्य व मोहक दंतपंक्ती देणारे सेलिब्रिटी डेन्टिस्ट डॉ. संदेश मयेकर सांगताहेत निरोगी आणि सुंदर दातांचं रहस्य…
निरोगी व सुंदर दातांसाठी मार्गदर्शक टिप्स, करियरमधील अनुभव व खुसखुशीत किस्से सांगत अ‍ॅस्थेटिक डेन्टिस्ट्रीची भन्नाट दुनिया उलगडणारं पुस्तक…
एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी !


200.00 Add to cart

मी जयुराणा

…माझी ‘मनोहरी’ कहाणी


जयश्री मनोहर

शब्दांकन : साहिल कबीर


बापू आणि मालिनी यांची ‘मॅनलीवुमन’ असलेली जयुराणा आणि मनोहर यांची जयु… तिच्या आठवांचा हा जागर ! ‘हजारो फुलं बहरू दे’ हा स्त्री चळवळीचा नारा बुलंद करणाऱ्या जयुराणा म्हणजे एक अजब रसायन आहे. आरामात राम नाही आणि दामही नाही, असं म्हणत त्यांनी केलेल्या कष्टाचा, श्रमाचा गंध या आत्मकथनात दरवळत राहतो. माणसांशी गोडवा टिकवणारी माणुसकी, प्रेम आणि प्रामाणिकपणाला सतत महत्त्व देणारी जगण्याची तत्त्वं समान असणारं सासर-माहेर मिळाल्यामुळे त्यांचं जगणं सुखकर कसं झालं याचा हा आलेख खरोखरच मनोहारी आहे.

वाद, भांडण, भीतीच्या पल्याड जाऊन केवळ प्रेम आणि विश्वास यांवरच आपण जिंकू शकतो, ती प्रेमभावना निरागस ठेवत, समजून घेत निबिड अंधारातही उजेडाची प्रकाशरेषा उमटवू शकतो! ही प्रकाशरेषा म्हणजे अस्सल जगण्याचा स्रोत यावर अपार विश्वास ठेवत त्यांनी अखंडपणे माणसं जोडली. दोन महिन्यांच्या माधुरीचा इवलासा जीव भुर्र उडून गेल्यावरचा काळीज-कल्लोळ आणि आत्मिक पूर्तता झालेला सुधारक पुरुष मनोहर यांचा स्वेच्छा मरणाचा निर्धार ऐकल्यावर झालेला जीवाचा थरकाप त्यांनी धीरोदात्तपणे पेलला. जीवे साहिलेल्या या टोकाच्या मरण वेणांनंतर दुःख-गुंत्यातून स्वतःला पार करत त्या सुखाचा धागा शोधत राहिल्या. माणसं जोडतच राहिल्या. या जयुराणाचा जीवनविषयक व्यापक दृष्टिकोन आत झिरपत सहजपणे त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतोय… माणूसमळा जपला जातोय…
डॉ. गीताली वि.म.


 

200.00 Add to cart

मनःपूर्वक खुशवंत

जीवन, मरण आणि त्या दरम्यान…


खुशवंत सिंग
अनुवाद : अभिजित थिटे


* `माझी एकच इच्छा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा तो अगदी सहजतेने यावा. आपण जसं गाढ झोपून जातो ना, तसाच…’

* `मला वाटतं, कामुक विचार करणं, त्याची कल्पना करणं हेही अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही.’

* `शेवटी जाण्याची वेळ झाली की खेद, दु:ख, कोणावरही राग न ठेवता जावं.’

निधनापूर्वी, वयाच्या ९५व्या वर्षी खुशवंत सिंग यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकात त्यांनी सहजसोप्या आणि रोखठोक शैलीत त्यांचं खासगी आयुष्य, विवाह, प्रेम, सेक्स आणि त्यांचं लेखन व संपादनाचं काम यांविषयी ‘बिनधास्तपणे’ लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात ते प्रथमच त्यांचं यश आणि अपयश, क्षमता आणि मर्यादा यांबद्दल खुलेपणाने सांगतात.
आनंद, श्रध्दा, मृत्यू आणि धर्म यांसारख्या विषयांबाबत बोलताना ते चिंतनात्मक होतात; तर जातीयवाद, भारताचं राजकारण, दहशतवाद यांबद्दल बोलताना ते थेट आणि रोखठोक होतात. तसंच इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, लालकृष्ण अडवाणी अशा त्यांच्या स्नेह्यांबद्दलही ते कुठलीही भीडभाड न बाळगता लिहितात.
हे ललितलेखन करताना खुशवंत सिंग यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वेगवेगळे कंगोरेही नोंदवले आहेत. त्यामुळेच मनापासून लिहिलेलं मन:पूर्वक खुशवंत वाचकांना नक्कीच भावेल…!


225.00 Add to cart

प्रज्ञावंत २ : परदेशी

मानवी जीवन समृद्ध करणारे


[taxonomy_list name=”product_author” include=”581″]


गेल्या काही शतकांत असे काही प्रज्ञावंत होऊन गेले आहेत, ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावत अतिशय प्रतिकूल वातावरणात विविध क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलं आहे.
त्यात संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञ अशा सर्वांचाच समावेश होतो. त्यांच्या असामान्य योगदानाचं फलित म्हणजेच आपलं आजचं प्रगत जीवन!
आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक तसंच ऐहिक जीवनाला आकार देणार्‍या अशा काही असामान्य प्रज्ञावंतांचा हा जीवनपट…

* खिस्तोफर कोलंबस * वास्को-द-गामा
* फर्डिनंड मॅगेलेन आणि कॅप्टन जेम्स कुक
* गॅलिलिओ गॅलिली * आयझॅक न्यूटन * अल्बर्ट आईनस्टाईन
* बेंजामिन फ्रँक्लिन * जॉर्ज वॉशिंग्टन * थॉमस जेफर्सन
* अब्राहम लिंकन * सुकार्नो * नेल्सन मंडेला * कार्ल माक्र्स
* व्लादिमीर लेनिन * माओ-त्से-तुंग * हो-चि-मिन्ह
* चे गव्हेरा * फिडेलकॅस्ट्रो


225.00 Add to cart

पर्वतपुत्र शेर्पा

हिमालयातील खरे खुरे साहसवीर


उमेश झिरपे


शिखर खुणावत असतं…

पण मधे असतात अनेक अडथळे… गोठवणारी थंडी, बर्फाखाली गेलेल्या वाटा, खोल-खोल दऱ्या आणि घळी, विरळ होत जाणारा ऑक्सिजन, खड्या चढणी आणि निसरडे उतार, लहरी निसर्ग…!

या सगळ्यावर मात करायला दोनच गोष्टी गिर्यारोहकाला साथ देत राहतात… एक म्हणजे उद्दिष्ट गाठायची जिद्द आणि दुसरी म्हणजे साहसी सोबती शेर्पा अर्थात गिर्यारोहणाची खरी ‘लाइफ लाइन’ !

बर्फातल्या वाटा मोकळ्या करणारे, घळींवर शिड्या टाकणारे, अडकलेल्या गिर्यारोहकांच्या ‘रेस्क्यू’ला धावणारे, त्यांना सकस आहार मिळावा म्हणून स्वत: रांधून खाऊ घालणारे, मणामणांचं ओझं उचलून नेणारे शेर्पा ! हिमालय त्यांना जसा कळतो, तसा इतर कुणालाही कळत नाही आणि म्हणूनच ते गिर्यारोहकांचे खरे पार्थ ठरतात. हिमालयाचे हे खरेखुरे साहसवीर गिर्यारोहकांच्या यशस्वी मोहिमांमध्येही आनंद घेतात. मुख्य म्हणजे आजकाल शेर्पा इतर व्यवसायांतही मुसंडी मारत असून त्यांतही त्यांची कामगिरी उत्तुंग होत आहे.

सुप्रसिद्ध आणि अनुभवी गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या पुस्तकात शेर्पांच्या या खडतर जीवनाचे विविध पैलू रंजकपणे उलगडले आहेत.

शेर्पा म्हणजे केवळ ‘सामान उचलणारे’ नव्हेत, हे सांगून हिमालयातल्या या खऱ्या खुऱ्या साहसवीरांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी अधोरेखित करणारं पुस्तक पर्वतपुत्र शेर्पा…!


Sherpa is the lifeline of mountaineering. Agile and fit Sherpas help mountaineers while trekking. They are versatile and are well capable to handle many tasks. They cook, carry your luggage, they clean the ice to make path for mountaineers, they help them in each respect. A veteran mountaineer himself and a disciplined manager of the groups of mountaineers, Umesh Jhirpe has written about Sherpa community, their way of life, culture, religious beliefs, food, and many other things.



225.00 Add to cart

प्रज्ञावंत १ : भारतीय

मानवी जीवन समृद्ध करणारे


[taxonomy_list name=”product_author” include=”581″]


गेल्या काही शतकांत असे काही प्रज्ञावंत होऊन गेले आहेत, ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावत अतिशय प्रतिकूल वातावरणात विविध क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलं आहे.
त्यात संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञ अशा सर्वांचाच समावेश होतो. त्यांच्या असामान्य योगदानाचं फलित म्हणजेच आपलं आजचं प्रगत जीवन!
आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक तसंच ऐहिक जीवनाला आकार देणार्‍या अशा काही असामान्य प्रज्ञावंतांचा हा जीवनपट…

* जगन्नाथ तथा नाना शंकरशेट * दादाभाई नौरोजी
* बाळ गंगाधर टिळक * लाला लजपत राय
* बिपिनचंद्र पाल * मोक्षगुंडम् विश्वेश्वरैय्या * मादाम कामा
* रवीन्द्रनाथ टागोर * दादासाहेब फाळके
* इ.व्ही. रामस्वामी नायकर * डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
* कॉ. श्रीपाद अमृत डांगे * जे.आर.डी. टाटा
* डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस * डॉ. होमी जहांगीर भाभा
* डॉ. दुर्गाबाई देशमुख * यशवंतराव बळवंतराव चव्हाण
* डॉ. वर्गिस कुरियन * बेंजामिन पेअरी पाल
* एम.एस. स्वामिनाथन * डॉ. कमला सोहोनी
* खान अब्दुलगफ्फार खान


240.00 Add to cart

खरं सांगायचं तर…

AN UNSUITABLE BOY (मराठी अनुवाद)


करण जोहर
अनुवाद : नीता कुलकर्णी


खरं सांगायचं तर…मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार…गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान…!

अशा पार्श्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अ‍ॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘AN UNSUITABLE BOY’ हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत…आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर…’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे… आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन!
– प्रदीप चंपानेरकर
(प्रकाशक)

———-

“पूर्वी मी यशाला फार महत्त्व द्यायचो. आता वाटतं, एखादा सिनेमा पडला तर पडला. पुढचा चालेल.
आता एका अर्थाने, यश आणि अपयश याबाबतीत
माझ्या भावना बधीर झाल्या आहेत.”

“माझे सिनेमे तुम्हाला आवडले नाहीत तर त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नसतं. तुम्हाला माझं काम आवडलंच पाहिजे किंवा मी तुम्हाला आवडलोच पाहिजे, असं माझं अजिबात म्हणणं नाही.”

“रोज सकाळी माझ्या ऑफिसमध्ये अत्यंत उत्साहाने आणि एनर्जीने मी जातो. एकापाठोपाठ एक अविरत काम करण्याची माझी उमेद असते. मी आयुष्य नावाच्या ट्रेडमिलवर सतत धावतो आहे. त्याचे गिअर्स माझ्या डोक्यात आहेत, तर लिव्हर्स माझ्या हातात आहेत.”

“मी जाणीवपूर्वक काही गोष्टी आत्मसात केल्या. मला सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचं होतं. मला सर्वांपासून वेगळा राहणारा, लांब राहणारा चित्रपट दिग्दर्शक-निर्माता बनायचं नव्हतं. मला `सोशलाईट’ दिग्दर्शक बनायचं होतं.”

“मला जे मैदानात खेळांमध्ये करता आलं नाही त्याची कसर मी स्टेज गाजवून पुरेपूर भरून काढली. मी स्पर्धांमधला सर्वोत्तम वक्ता बनलो.”

“आज मागे वळून पाहिलं आणि आयुष्याला निश्चित वळण देणा-या घटना कोणत्या असा विचार केला तर मी बोर्डींग स्कूलमधून परत येणं, माझ्या आईने त्यावरून मला खणखणीतपणे सुनावलेले चार शब्द आणि स्पर्धेत पटकावलेला तो पहिलावहिला पुरस्काराचा कप या तीन गोष्टी सांगाव्या लागतील.”

“मी जसा आहे त्याच्याही पलीकडे सभ्यपणा आणि माणुसकी या दोन महत्त्वाच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मी आता लोकांच्या बोलण्याकडे काही लक्ष देत नाही.”

“व्यभिचार हे आयुष्यातलं वास्तव आहे. ज्यामध्ये, व्यभिचाराला संधी होती पण ते अजिबात बळी पडले नाहीत, असं एक लग्न, एक वैवाहिक नातं मला दाखवावं.”


250.00 Add to cart

होरपळ

ल.सि. जाधव


सोलापूर येथील मातंग वस्तीत ल.सि. जाधव यांचं बालपण गेलं. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घेतलं आणि भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ‘होरपळ’ या आपल्या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात, हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात. त्यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचं त्यांचं सामर्थ्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे.
साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारं तसेच वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन होरपळ…


250.00 Add to cart
1 2 5