370 | 978-93-86493-55-2 | Horpal | होरपळ | L.S. Jadhav | ल.सि. जाधव | सोलापूर येथील मातंग वस्तीत ल.सि. जाधव यांचं बालपण गेलं. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घेतलं आणि भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ‘होरपळ’ या आपल्या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात, हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात. त्यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचं त्यांचं सामथ्र्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे. साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारं तसेच वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन होरपळ… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 220 | 21.5 | 14 | 1.3 | 280 | समाजरंग | Biographical | चरित्र-आत्मचरित्र | Social | सामाजिक | 250 | HorpalCover | HorpalBC.jpg |
कस्तुरबा : शलाका तेजाची
[taxonomy_list name=”product_author” include=”346″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
महात्मा गांधी व कस्तुरबा या दोघांनी मिळून अहिंसात्मक चळवळीचा पाया घातला आणि दोघांनी तिला वाहून घेतले. या अलौकिक स्त्रीला कोणताही अडथळा थोपवू शकत नसे. हे पुस्तक म्हणजे महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे फळ आहे. एका देशाच्या जन्मामागील ऐतिहासिक घटना यात आहेत. तशीच ही एक मुग्ध प्रेमकहाणीही आहे. आजपर्यंत गांधींच्या चरित्रकारांनी त्यांच्या सर्वश्रुत आख्यायिकेवर आधारून लेखन केले आहे. हे चरित्र ही या दोन मानवी जीवांची अस्सल कहाणी आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राहिलेले दोन महान जीव !
Reviews
There are no reviews yet.