BudhibalKi_Lekhak

बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? लेखमालिकेविषयी..

BudhibalKi_Lekhak

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकातच जगात घडलेल्या घडामोडी यापुढचं भविष्य किती गुंतागुंतीचं आणि अनिश्चिततेच्या मार्गाने पुढे जाणारं असेल, याची कल्पना देण्यासाठी पुरेशा आहेत.

२००१ साली अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ वर झालेल्या हल्ल्यामुळे या शतकाचा श्रीगणेशाच असा झाला, की विसाव्या शतकात आकारलेला आलेली जागतिक राजकारणाची घडी पार विस्कळीत झाली.

त्यानंतर इराक – अफगाणिस्तान या देशांवर अमेरिकेने केलेला हल्ला, भारताचा जागतिक राजकारणाच्या पटलावर झालेला ‘नवोदय’, अरब देशांमध्ये फोफावलेला असंतोष आणि त्यातून घडून आलेली ‘अरब स्प्रिंग’ ही क्रांती, कतारच्या रूपाने उदयाला आलेला सौदी – इराण यांच्या बरोबरीचा तिसरा कोन, ‘अब्राहम ऍकॉर्ड’ द्वारे ज्यू आणि अरब यांच्यात आकाराला आलेली नवी समीकरणं, सौदीच्या राजपुत्राची महत्वाकांक्षा आणि त्यातून जन्माला आलेला सौदी अरेबिया या देशाचा कायापालट करण्याचा ‘सौदी व्हिजन २०३० ‘हा प्रकल्प, चीनमधून जगभर फोफावलेला ‘कोविड’ विषाणू आणि त्यामुळे शब्दशः ठप्प झालेलं जग, रशिया – युक्रेन युद्ध, तुर्कस्तानचा नवोदय अशा अनेक घटना एकामागोमाग एक घडत गेलेल्या असताना आपलं जग नक्की कोणत्या दिशेला जात आहे, असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडताना आज दिसतो आहे.

ही लेखमाला आहे अशाच जागतिक घडामोडींवरची. वृत्तपत्रांपासून आणि अन्य प्रसिद्धी माध्यमांतून ठळकपणे आपल्यासमोर आलेल्या (की विशिष्ट पद्धतीने आणल्या गेलेल्या) घडामोडी हे हिमनगाचं केवळ ‘टोक’ आहे, ही बाब अधोरेखित करणारी.

जे आपल्यापर्यंत पोचतं, त्यापेक्षा जे पोचत नाही तेच किती महत्वाचं असतं हे या लेखमालेच्या निमित्तानं वाचकांना समजेल आणि उमगेल अशी लेखकाची आशा आहे.

  • आशिष काळकर

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा?

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *