महानगर, निम-शहर : सांस्कृतिक पर्यावरणाचा धांडोळा (दिवाळी अंक)
फॉन्ट साइज वाढवा मुंबई : १९८४ माझा जन्म १९५६चा. १९८४ मध्ये अंतिम निर्णय घेतला, कसंही करून मुंबई सोडून बाहेर पडायला हवच. तेव्हा विचार केला, ‘१९५६ ते १९८४ पर्यंतच्या २८ वर्षांच्या वास्तव्यात, मुंबईत जे जे काही चांगलं आहे, ते सर्व मिळून पावलेलो आहे. परंतु, या शहराची गती, विशेष करून प्रचंड गर्दी असलेल्या लोकल ट्रेनमधून दररोज येऊन-जाऊन [...]