कुमारवर्ग नजरेसमोर ठेवून थोडक्यात चरित्रात्मक तपशील आणि ठळक, संक्षिप्त कार्यजीवन अशा पद्धतीनं प्रत्येकाची मांडणी केली आहे.
प्रगत पुस्तकसंस्कृतीचा मनोज्ञ मागोवा
अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे.