अद्भुत आणि रम्य
‘बाकड्यासमोर एक तरुण मुलगा बसला होता - जाडगेला, डोक्याचे संपूर्ण केस भादरलेले आणि अंगावर फाटक्या चिंध्या. मी त्याला बरेचदा पाहिलं होतं. तो वेडा होता बहुधा. लोक त्याला ‘गूंगा’ म्हणत. चहाच्या दुकानात येणारी गिऱ्हाइकं बरेचदा त्याची चेष्टा करत, टर उडवत, त्याच्या डोक्यावर टपली मारत. पण हे गमतीगमतीत बरं का. गूंगालाही त्याचं काही वाटत नसे. तो त्यांच्याकडे [...]