कुमारांच्या जाणिवा विस्तारणारी थोरांची ओळख
पृथ्वीच्या पाठीवर माणसाचं पहिलं अस्तित्व उमटलं तेव्हापासून आजपर्यंत भौतिक, सांस्कृतिक, बौद्धिक, वैचारिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक अशा अनेक अंगांनी मानववंशाची प्रगती होत राहिली आहे. अर्थात ही प्रगती आपसूक झालेली नाही. प्रखर बुद्धिमत्ता, व्यासंग आणि ध्येयनिष्ठा आणि उत्कट सामाजिक भान असणाऱ्या अनेक स्त्री-पुरुषांच्या कर्तृत्वामुळे अचंबित व्हायला लावणारा हा प्रवास शक्य झाला आहे. निरनिराळ्या क्षेत्रात इतिहास घडविणाऱ्या या [...]