‘कल्पी’ या ई-बुकमधील कथेतील निवडक अंश
कल्पी नव्या आणि रंगीबेरंगी साड्या घातलेल्या महिलांची गडबड चालू होती. दुपारची वेळ झाल्यानं देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी त्यांची पळापळ चालू होती. लाल-पिवळ्या-केशरी-आंबा-मोरपंखी-हिरव्या अशा कितीतरी रंगाच्या पैठणी नेसलेल्या सौभाग्यवती नटून थटून मंदिरात नैवेद्य ठेवायला निघालेल्या. घोळक्या घोळक्यानं निघालेल्या त्या बायांकडं पाहताच कल्पीला फुग्यावाल्याची आठवण झाली. यात्रेत येणाऱ्या फुगेवाल्याकडंही अशाच रंगीबेरंगी फुग्यांचा घोळका असतो. स्वत:शीच हसत त्यांच्याकडं पाहत [...]