

श्याम बेनेगल : एक व्यक्ती एक दिग्दर्शक
₹450.00
लेखक : डॉ. सविता नायक मोहिते
श्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट ‘अंकुर’ १९७४ साली प्रदर्शित झाला व चित्रपटांकडून रसिकांना असलेल्या आशा अपेक्षांना नवी पालवी फुटली. त्यानंतर ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ असे सामाजिक समस्याप्रधान व कलात्मकतेने चित्रित केलेले चित्रपट प्रदर्शित होत गेले. विचारप्रवृत्त होता होता, प्रेक्षकांना अभिरुचीसंपन्नतेचाही अनुभव येत गेला आणि ‘समांतर’ चित्रपट मुख्य धारेत येऊ लागले.
एका मासिकासाठी बेनेगलांची मुलाखत घेता घेता, लेखिका डॉ. सविता नायक-मोहिते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने व त्यांच्या चित्रपटांनी इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांचं व्यक्तिमत्त्व व कार्य यावर पुस्तक लिहिण्यासच त्या प्रेरित झाल्या.
बेनेगल ही एक आंतर्बाह्य सद्भाव बाळगून असलेली व्यक्ती असून, त्यांच्या चित्रपटांच्या विषयांत, सादरीकरणात तोच सद्भाव प्रतिबिंबित होतो. एक विशुद्ध मनाची व्यक्ती आणि एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून बेनेगलांची ओळख करून देता देता लेखिका ‘मंडी’, ‘सुसमन’, ‘मम्मो’, ‘जुबैदा’ असे अनेक चित्रपट व ‘भारत एक खोज’, ‘संविधान’ या मालिका आणि काही बायोपिक्स यांचं विश्लेषण करतात. बेनेगल यांच्यासोबतच्या अनेक भेटींमधून आणि संवादातून हे पुस्तक साकार झालं असल्याने या पुस्तकाचं महत्त्व अधिकच अधोरेखित होतं.
हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा प्रवाह निर्माण करणाऱ्या संवेदनशील, प्रयोगशील दिग्दर्शकाचा धांडोळा घेणारं पुस्तक…
श्याम बेनेगल : एक व्यक्ती… एक दिग्दर्शक
Reviews
There are no reviews yet.