Saayad | सायड | रवींद्र पांढरे | प्रत्येक बहराच्या नशिबी पानगळही लिहिलेली असते… दोन शेतकऱ्यांनी मिळून एकमेकांच्या मदतीने आपल्या शेतांची मशागत करून घेणं म्हणजे ‘सायड’. शांती आणि यशवंतानं शेतीसाठी केलेली सायड फक्त शिवारापुरती मर्यादित न राहता त्या दोघांच्या मनापर्यंत पोहोचते. शेतीत एकमेकांना मदत करताना, आधार देताना आणि एकमेकांची सुख-दुःखं ऐकून घेताना हि सायड त्या दोघांना प्रेम व जिव्हाळ्याच्या धाग्यांमध्ये गुंफते. त्यातून दोघांचं फक्त शेत-शिवारच फुलून येत नाही तर, दोघांचं शुष्क, कोरडं आयुष्यही नव्याने रुजतं, आणि अंकुरतं आणि बहरून येतं. पण… प्रगल्भ आणि उत्स्फूर्त अशा सहजीवनाची अनेक पदरी, व्यामिश्र अनुभवांची – ‘जामनेरी बोलीतली कादंबरी सायड ! |
papar back | book | Rohan Prakashan | marathi | 300 |
व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग १
प्राणीसंग्रहालय आणि चित्रचोर
शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : सुनिता जैन
दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Reviews
There are no reviews yet.