Only logged in customers who have purchased this product may leave a review.
सोनेरी किल्ला
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
अनुवाद :
अत्यंत रोमहर्षक अशा या कहाणीत फेलूदा आणि तोपशे मानसशास्त्रज्ञ डॉ. हाजरा आणि मुकुल यांचा पाठलाग करत थेट राजस्थानात पोहोचतात. आपल्याला पूर्वजन्मातील घटना आठवत आहेत असा मुकुलचा दावा असतो. फेलूदा व तोपशे यांना प्रवासात लोकप्रिय रहस्यकथा लेखक जटायू भेटतात. तेही या दोघांच्या साहसात सामील होतात. अखेर मुकुलच्या सोनेरी किल्ल्यापर्यँत ते पोहोचतात. तिथे या गहन, गूढ, गुंतागुंतीच्या प्रकरणातील अनेक धाग्यांची उकल फेलूदा कौशल्याने व हुषारीने करतो. एक खिळवून टाकणारा, अनोखा सोनेरी मोरपिशी प्रवास!
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे तिसरे पुस्तक.
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
Reviews
There are no reviews yet.