हेरकुन्फ्ट अर्थात…पाळंमुळं
₹500.00
लेखक : साशा स्टानिसिच
मराठी भाषांतर: जयश्री हरि जोशी
आपलं जन्मस्थान, तिथे रुजत गेलेली पाळंमुळं, राजकीय उलथापालथ झाल्यामुळे मायभूमी सोडून केलेलं पलायन आणि दुसऱ्या भूमीशी नाळ जोडून घेतानाचा प्रवास ह्या विस्तीर्ण पटलावर साशा स्टानिसिचची लेखणी लीलया वावरते.
ह्या पुस्तकात कादंबरी, आत्मकथन, स्मृतींचे आरेखन, दस्तावेजीकरण आणि कल्पनाशक्तीचा अद्भुत खेळ ह्या अनोन्याश्रयी क्षेत्रांतून लेखकाच्या मनातील सर्जक आंदोलने उमटलेली आहेत. ह्या लेखनाला विनोद आणि उपरोधाची किनार आहे, त्यामुळे ह्या कथनसूत्राची गुणवत्ता वाढली आहे. शब्द आणि भाषेवरील प्रभुत्व सिद्ध करत जाणारी ही कहाणी वाचकांसाठीही एक साहसपर्व आहे. ह्या पूर्णतः अनोळखी संदर्भकक्षेत वाचक नकळत स्वानुभवाचे ताणेबाणे शोधायला लागतो, हे ह्या कादंबरीचे बलस्थान आहे.
मूळ जर्मन भाषेतील हेरकुन्फ्ट ही कादंबरी आता मराठीत… पाळंमुळं
















Reviews
There are no reviews yet.