जयश्री हरि जोशी

कवयित्री व जर्मन भाषा विदुषी म्हणून जयश्री हरि जोशी यांची ख्याती आहे. त्यांचा जन्म व शिक्षण पुण्यात झालं. त्यांनी जे. एन. यू. विद्यापीठ दिल्ली येथून जर्मन साहित्य, संस्कृती व नाट्य शास्त्र यांमध्ये एमए, एमफिल केलं. बेर्टोल्ट ब्रेश्टची नाट्य संकल्पना यांवर तुलनात्मक प्रबंध त्यांनी लिहिला. त्यांनी बरेच अनुवाद केले असून त्यांची चार अनुवादित पुस्तकं प्रकाशित आहेत. तसंच त्यांनी नियतकालिकं आणि वर्तमानपत्रांतही साहित्यविषयक लेखन केलं आहे. त्या ग्योथे इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवन ह्या जर्मन सांस्कृतिक संस्थेत समन्वयक आणि माहिती व ग्रंथालय विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून त्या आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक परिषदेची सदस्यही आहेत.

लेखकाची पुस्तकं

No products were found matching your selection.