978-3-92374-75-3 | Gandhiwadacha Chemical Locha | गांधीवादाचा केमिकल लोचा आणि इतर कथा | lakshimikant deshmukh | लक्ष्मीकांत देशमुख | लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या संग्रहातील कथांना तसा कुठलेही स्थानवैशिष्ट्य असलेला एक विशिष्ट असा परिसर नाही. त्या एकूणच भारतीय आणि जागतिकही पटलावरही घडतात. विशेषतः सांस्कृतिक बहुविधता हा आशय असणाऱ्या अनेक कथा या संग्रहात आहेत. ही बहुविधता हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. जाती-धर्माच्या सीमारेषा ओलांडून सर्वांच्या मनाला भिडणारे संगीत, परस्परांमधला सद्भाव, सामाजिक सलोखा राखणारे समाजमन, परधर्मीयांच्या श्रद्धांचा आदर करणारी सामान्य माणसे असा या संग्रहातील कथांचा ऐवज आहे. भारतीय समाजातला मुस्लिम हा समाजघटक) आपल्या कथात्म साहित्यात अभावानेच आढळतो. ती उणीव यातील कथांनी भरून काढली आहे. या कथांमध्ये चित्रित झालेल्या समाजजीवनात भिन्न धर्मीयांचे अस्तित्वही ठळकपणे जाणवते. म्हणून या कथा व्यापक अर्थाने समाजजीवन कवेत घेताना दिसतात. कथात्म साहित्यातूनही लेखकाचा विचार डोकावतो. एका प्रागतिक अशा समाजाचे रेखांकन करणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः सहिष्णुतेचा संकोच होत असलेल्या, एकारलेल्या काळात या कथांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होणारे आहे. – आसाराम लोमटे |
paper back | book | Rohan Prakashan | Marathi | 192 | मोहर | fiction | कथासंग्रह | 295 |
व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग २
मृत्युपत्रानेच घेतला बळी आणि इतर ३ कथा
[taxonomy_list name=”product_author” include=”492″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!
Reviews
There are no reviews yet.